पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी संयुक्तरित्या पशुपतीनाथ धर्मशाळेचे काठमांडू येथे उद्घाटन केले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, ते जेव्हा जेव्हा काठमांडूला येतात, तेव्हा त्यांना येथील लोकांच्या प्रेम आणि स्नेहाची अनुभूती घेतली असून भारताप्रतीचे नेपाळचे हे प्रेम सदैव त्यांना दिसून येते. यावेळी त्यांनी पशुपतीनाथला या अगोदर दिलेल्या भेटींना उजाळा दिला.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारत आणि नेपाळमधील अध्यात्मिक संबंधांना काळ आणि अंतराचे बंधन नाही. ते म्हणाले की, त्यांना हे उद्घाटन करतांना मनस्वी आनंद झाला. मोदी पुढे म्हणाले की, पशुपतीनाथ, मुक्तीनाथ आणि जानकीधाम ही मंदिरे नेपाळच्या विविधतेतील एकतेचे द्योतक आहे. ज्यामुळे भारताबरोबरचे संबंध दृढ व्हायला मदत होते. हिंदूत्व आणि बौद्ध धर्माच्या काठमांडूमधून प्रतीक होणाऱ्या समृद्ध परंपरेचा त्यांनी उल्लेख केला. नेपाळ आणि भारतामध्ये बौद्ध धर्म हा दुव्याचे काम करत आहे, असेही ते म्हणाले. दोन्ही देशांच्या समृद्ध परंपरेच्या अभिमानाचाही त्यांनी उल्लेख केला.
दुर्बल आणि मागास घटकांच्या विकासाप्रती सजग राहण्याच्या गरजेचे महत्त्व त्यांनी विशद केले. भारत आर्थिक विकासाची शिखरे पार करत असतांना त्याने अवलंबलेले ‘सबका साथ सबका विकास’ हे धोरण नेपाळलाही लागू होते, असे ते म्हणाले. नेपाळमधील राष्ट्रीय स्थैर्याप्रती त्यांनी समाधान व्यक्त केले. आणि नेपाळवासियांना सदैव मदत आणि पाठिंब्याची हमी दिली.