महामहिम, पंतप्रधान मार्क रट,
जून २०१५ मध्ये भारतात तुमचे स्वागत करण्याची संधी मला लाभली होती. त्यावेळी मी म्हटले होते की साधारणपणे जून महिन्यात भारतात तीव्र उन्हाळा असतो, खूप गरम होते आणि तरीही भारतात येण्यासाठी तुम्ही हाच महिना निवडलात आणि आपल्या द्विपक्षीय संबंधांप्रति तुमच्या कटिबध्दतेचे ते प्रतीक होते.
आज बरोबर दोन वर्षांनी, मी देखील जून महिन्यात नेदरलँड्सला आलो आहे, मात्र दिल्ली आणि हेग मधील तापमानात नक्कीच खूप फरक आहे. हे दिवस आणि रात्र प्रमाणे आहे. इथली हवा मी पाहतोय, खूपच आल्हाददायक आहे.
सर्वप्रथम सर्व आदरणीय व्यक्ती, मला तुमचे आभार मानायचे आहेत आणि केवळ माझेच नव्हे तर माझ्या संपूर्ण प्रतिनिधिमंडळाचे तुम्ही आपुलकीने स्वागत केलंत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, या स्वागतातून तुम्ही भारतीय जनतेप्रति आपुलकीची भावना व्यक्त केली आहे.
महामहिम, माझा हा नेदर्लंड्सचा दौरा अगदी अचानक ठरला आणि तरीही ज्याप्रकारे या दौऱ्याचे आयोजन केले त्याबद्दल मला बोलायलाच हवे, इतक्या कमी अवधीत तुम्ही या दौऱ्यासाठी केवळ तयारीच दर्शवली नाही तर या कमी कालावधीत अतिशय उत्तम तऱ्हेने कार्यक्रमांची आखणी केलीत आणि हा खूपच फलदायी कार्यक्रम होता. मी तुमच्या नेतृत्वाची प्रशंसा करू इच्छितो आणि मला वाटते तुमच्या उत्कृष्ट नेतृत्वामुळेच हे शक्य झाले.
महामहिम, तुमचे बरोबर आहे, भारत आणि नेदरलँड्स यांच्यात शतकानुशतके संबंध आहेत आणि ते अधिक दृढ करण्याची दोन्ही देशांची इच्छा आहे. यावर्षी, महामहिम जसे तुम्ही म्हणालात, भारत आणि नेदरलँड्स दरम्यान राजनैतिक संबंधांचे ७० वे वर्ष आपण साजरे करत आहोत आणि त्यामुळे आपल्या द्विपक्षीय संबंधांवर अधिक लक्ष देणे स्वाभाविक आहे.
आजचे जग परस्परांवर अवलंबून असलेले आणि परस्परांशी जोडलेले जग आहे, त्यामुळे आपल्या चर्चेमध्ये केवळ द्विपक्षीय मुद्द्यांवरच नाही तर आंतरराष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवर देखील आपली चर्चा होणे स्वाभाविक आहे.
आंतराष्ट्रीय मुद्दयांचा विचार केल्यास, आपल्या दोन्ही देशांच्या मतांमध्ये खूप साधर्म्य आहे. आणि नेदरलँड्सच्या मदतीमुळे भारत गेल्या वर्षी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण प्रणालीचे(एमटीसीआर) सदस्यत्व मिळवण्यात यशस्वी झाला आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो.
द्विपक्षीय गुंतवणुकीचा विचार केला तर, तर आतापर्यंत नेदरलँड्स थेट परदेशी गुंतवणुकीचा पाचवा सर्वात मोठा स्रोत आहे. खरे तर गेल्या तीन वर्षात तो थेट परदेशी गुंतवणुकीचा तिसरा सर्वात मोठा स्रोत बनला आहे.
मला नाही वाटत ही वस्तुस्थिती पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे कि भारताच्या आर्थिक विकासात, आमच्या विकासविषयक प्राधान्यक्रमात नेदरलँड्स हा नैसर्गिक भागीदार आहे.
आज डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याची संधी आम्हाला मिळणार आहे आणि मी आशा व्यक्त करतो भारताबाबत त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन यापुढेही कायम राहील आणि त्यांची मते जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.
आज, नेदरलँड्समध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना भेटण्याची संधी देखील मला मिळणार आहे. इथे राहणारा भारतीय समुदाय उभय देशांना जोडणारा साक्षात दुवा आहे. हे परस्पर संबंध अधिक बळकट करण्याचा आमचा देखील प्रयत्न आहे.
माझ्यासाठी ही खरोखरच सौभाग्याची बाब आहे कि आज मी महामहिम राजे आणि राणी यांना भेटणार आहे आणि त्यांना भेटण्यासाठी मी खूप आतुर आहे. मी पुन्हा एकदा पंतप्रधान मार्क रट, नेदरलँड्सचे सरकार आणि जनतेचे कृतज्ञतापूर्ण आभार मानतो.
धन्यवाद.
Ties between India and Netherlands are very old. Our bilateral relations are very strong: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 27, 2017
The world is inter-dependant and inter-connected. We would discuss both bilateral issues and those concerning the world: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 27, 2017
Netherlands is a natural partner in the economic development of India. Our trade and economic ties are increasing: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 27, 2017