मॉरीशसचे पंतप्रधान प्रविन्द जगन्नाथ जी, मॉरीशसचे वरिष्ठ मंत्री आणि मान्यवर व्यक्ती, विशिष्ट अतिथिगण,मित्रांनो , नमस्कार ! बॉन्जोर! शुभ दुपार
मी मॉरीशसमधल्या आमच्या सर्व मित्रांना खूप खूप शुभेच्छा देतो.
आपल्या देशांसाठी हा संवाद एक खास संधी आहे. आपला सामायिक इतिहास , वारसा आणि सहकार्य यातील हा एक नवा अध्याय आहे. खूप काळ लोटलेला नाही, मॉरिशसने इंडियन ओशन आयलॅण्ड गेम्सचे यजमानपद भूषवले होते आणि यात गौरव प्राप्त केला होता.
दोन्ही देश 'दुर्गा पूजा ' चा उत्सव साजरा करत आहेत आणि लवकरच दिवाळी साजरी करणार आहोत. अशा वेळी या घडामोडी मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन अधिक खास बनवत आहे
मेट्रो, स्वच्छ आणि कुशल परिवहन सुविधा आहे आणि यामुळे वेळेची बचत होईल. हा प्रकल्प आर्थिक घडामोडी आणि पर्यटनात देखील योगदान देईल . आधुनिक ईएनटी रुग्णालय हा दुसरा प्रकल्प आहे ज्याचे आज उदघाटन झाले. हे अद्ययावत हॉस्पिटल दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्यात योगदान देईल. रुग्णालयाची इमारत ऊर्जा कार्यक्षम युक्त आहे आणि कागदविरहित सेवा पुरवेल.
हे दोन्ही प्रकल्प मॉरीशसच्या लोकांना सुविधा पुरवतील. मॉरिशसच्या विकासाप्रति भारताच्या मजबूत कटिबध्दतेचे हे प्रकल्प प्रतीक आहेत.
या प्रकल्पांसाठी हजारो कामगारांनी दिवस-रात्र आणि उन्हा -तान्हात कठोर मेहनत केली आहे.
भूतकाळाच्या एकदम विरुद्ध आज आम्ही आपल्या लोकांच्या उत्तम भविष्यासाठी काम करत आहोत.
मी पंतप्रधान प्रविंद यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची प्रशंसा करतो. त्यांनी मॉरिशस साठी आधुनिक पायाभूत सुविधा आणि सेवाची कल्पना केली आहे.मी त्यांचे आणि मॉरिशसच्या सरकारचे त्यांच्या सक्रिय सहभागासाठी आभार मानतो. त्यांच्यामुळे हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले.
आपल्याला या गोष्टीचा अभिमान आहे कि भारताने जनहिताच्या या आणि अन्य प्रकल्पांमध्ये मॉरिशसबरोबर भागीदारी केली आहे. गेल्या वर्षी एका संयुक्त प्रकल्पाअंतर्गत मुलांना ई-टैबलेट वितरित करण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाची नवी इमारत आणि एक हजार घरांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरु आहे.
मला ही एक गोष्ट जाहीर करताना आनंद होत आहे की प्रधानमंत्री श्री जगन्नाथ यांच्या सूचनेनुसार भारत एक किडणी यूनिट, मेडि -क्लीनिक्स आणि क्षेत्रीय आरोग्य केंद्राच्या बांधकामात सहकार्य करेल.
मित्रांनो,
भारत आणि मॉरीशस दोघेही वैविध्यपूर्ण आणि जीवंत लोकशाहीचे उदाहरण आहेत, जे आपल्या लोकांच्या समृद्धीसाठी आणि आपले क्षेत्र आणि जगात शांतता नांदावी यासाठी कटिबद्ध आहे.
परस्परांप्रति आदर विविध मार्गानी व्यक्त होत आहे.
यावर्षी, पंतप्रधान जगन्नाथ आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते , तसेच माझ्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या उदघाटन समारंभाला देखील उपस्थित होते.
मॉरिशसच्या स्वातंत्र्यदिनाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभाला आपल्या राष्ट्रपतींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. महात्मा गांधींच्या
150 व्या जयंतीदिनी मॉरिशसने त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आणि त्यांच्याबरोबरच्या विशेष नात्याचे स्मरण केले.
मित्रांनो,
हिंद महासागर हा भारत आणि मॉरिशस यांच्यातील एक सेतू आहे. सागरी अर्थव्यवस्था आपल्या लोकांसाठी खूप महत्वपूर्ण आहे.
सागरी अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि आपत्ती जोखिम कमी करण्याच्या सर्व बाबींमध्ये सागर (क्षेत्रात सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास) चे विजन आपल्याला एकत्रितपणे काम करण्यासाठी मार्गदर्शन करत राहील.
आपत्ती प्रतिबंधक पायाभूत संरचना आघाडीत संस्थापक सदस्य म्हणून सहभागी झाल्याबद्दल मी मॉरिशस सरकारचे आभार मानतो.
महामहिम,
महिन्याभरात अप्रवासी घाट या जागतिक वारसा स्थळावर अप्रवासी दिन साजरा केला जाणार आहे. आपल्या शूर पूर्वजांचा यशस्वी संघर्ष या आयोजनात अधोरेखित केला जाईल.
या संघर्षामुळे मॉरीशसला या शतकात मोठे यश मिळाले आहे.
मॉरीशसच्या लोकांच्या अद्वितीय भावनांना आम्ही सलाम करतो.
भारत आणि मॉरीशसची मैत्री अमर राहो.
धन्यवाद, खूप-खूप धन्यवाद.