Technology can be beneficial in reducing poverty to a great extent: PM Modi
High Speed Rail project project would bring in latest technology and ensure fast-paced progress: PM Modi
Whether it is railways, highways, waterways or airways, we are focusing on all areas. Integrated transport system is the dream of new India: PM
Our efforts are to provide benefits of new technology to the common man: PM Modi
Economic development has a direct relation with productivity. Our aim is: More productivity with high-speed connectivity: PM Modi

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानच्या देशातील पहिल्या अतिजलद रेल्वे प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी आज संयुक्तपणे पायाभरणी केली.

 

 

यावेळी अहमदाबाद येथे आयोजित एका विशाल सार्वजनिक सभेत पंतप्रधानांनी नवभारत निर्मितीची महत्वाकांक्षा आणि इच्छाशक्ती व्यक्त केली. पंतप्रधानांनी देशातील जनतेचे अभिनंदन केले आणि हा अतिजलद रेल्वे प्रकल्प गती आणि प्रगतीसह जलद निकाल देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. अतिजलद जोडणीच्या माध्यमातून उत्पादकता वाढविण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी जपानकडून प्राप्त तांत्रिक आणि वित्तीय सहाय्याबद्दल पंतप्रधानांनी जपानचे आभार मानले. फारच कमी अवधीत प्रकल्पाची सुरुवात केल्याबद्दल पंतप्रधान ॲबे यांचे मोदींनी कौतुक केले.

या अतिजलद रेल्वेमुळे केवळ दोन शहरेच जवळ येणार नाही तर शेकडो किलोमीटर अंतरावर राहणारे लोकही एकमेकांच्या जवळ येतील, असे ते म्हणाले. मुंबई-अहमदाबाद कॉरिडोअर परिसरात नवीन अर्थव्यवस्था विकसित होत असून हे संपूर्ण क्षेत्रच एकल आर्थिक क्षेत्र होईल, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्य लोकांना लाभ मिळत असेल तरच ते उपयुक्त आहेत, असे ते म्हणाले. या प्रकल्पातील तंत्रज्ञानामुळे भारतीय रेल्वेचा लाभ होईल आणि मेक इन इंडिया उपक्रमालाही उभारी मिळेल. हा प्रकल्प पर्यावरण स्नेही असण्याबरोबरच मानव स्नेहीसुध्दा असेल. देशातील क्षेत्रांची भविष्यात वेगाने प्रगती होण्याच्या दृष्टीने असे अतिजलद कॉरिडॉर महत्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

भविष्यातील आवश्यकता लक्षात घेत पायाभूत सुविधांचा विकास व्हावा याची खातरजमा करण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. हा प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण एकत्रित काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यापूर्वी बोलतांना भारत-जपान भागिदारी ही विशेष, धोरणात्मक आणि जागतिक असल्याचे जपानचे पंतप्रधान शिंझो अँबे यांनी सांगितले. येत्या काही काळात अतिजलद रेल्वेगाडीच्या खिडकीतून भारतातील सौदर्यांचा आस्वाद घेता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Click here to read full text of speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi