PM Modi lays the foundation stone of Pune metro.
India is urbanising at a very quick pace & thus, its essential to work in 2 directions. 1st is to improve quality of life in villages: PM
Growth of our cities must be adequately planned: PM
The Government of India is actively working on the Rurban Mission: PM
We need to invigorate our villages with good facilities while preserving their character & spirit: PM
After 8th November, urban local bodies' income has increased which can be allocated towards development: PM
In this nation everybody is equal before the law and everyone has to follow the law: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे आज भूमिपूजन केले. भारतात शहरीकरण झपाट्याने होत असल्याने खेड्यातल्या जनतेचे जीवनमान उंचावणे आणि शहरी भागातल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दूरवरचा विचार करणे अशा दोन मार्गांनी काम करणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी विशाल जनसमुदायाला संबोधित करतांना सांगितले.

भविष्यासाठी आखणीकरणे गरजेचे आहे असे सांगतांना प्रत्येक गोष्ट राजकीय दृष्टीकोनातून पाहिली जाऊ शकत नाही, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. शहरांची वाढ लक्षात घेऊन पर्याप्त नियोजन असायला हवे, असेही पंतप्रधान म्हणाले. झपाट्याने शहरीकरण होणाऱ्या गावांसाठी सरकार रुर्बन मिशनवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

हाती घेतलेले प्रकल्प नियोजित वेळेतच पूर्ण होतील, याकडेही सरकारचा कटाक्ष असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गॅस ग्रीड, वॉटर ग्रीड, डिजिटल नेटवर्क, अंतराळ तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर यासाठी सरकार कार्यरत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

कायद्यासमोर प्रत्येक जण समान आहे आणि प्रत्येकाला कायद्याचे पालन करायला हवे, असे सांगून भ्रष्टाचार आणि काळ्यापैशाचा नायनाट याआधीच केला गेला असता, तर आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला नसता, असेही पंतप्रधान म्हणाले.

पुणे ही विद्यानगरी असून, ऑनलाईन बँकिंग आणि उपलब्ध सुविधांचा शोध घेण्यातही या शहरांने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी विकास मंत्री वेंकय्या नायडू, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, अनिल शिरोळे, शिवाजीराव अढळराव पाटील, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे हे खासदार आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाविषयी :-

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत येणाऱ्या आणि पुणे महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी 11 हजार 420 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 31.254 किलोमीटर लांबीच्या 2 कॉरीडॉरचा विकास करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा 16.589 किलोमीटर (11.57 किलोमीटर उन्नत आणि 5.019 किलोमीटर भूमीगत) आणि वनज ते रामवाडी या 14.665 किलोमीटर संपूर्ण उन्नत मार्गांचा या दोन कॉरीडॉरमधे समावेश आहे.

झपाट्याने वाढणाऱ्या शहराच्या शाश्वत विकासासाठी हा प्रस्तावित प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. वाहतुकीच्या इतर साधनांशी आणि महत्त्वाच्या प्रवासी स्थानकांशी संलग्न अशी स्थानकांची ठिकाणे ठेवण्यात आली आहेत. वाहतूक कोंडीच्या मार्गावरुन जाणाऱ्या या मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी आवश्यक असणारी सुलभता मिळणार आहे. या मेट्रो कॉरीडॉरमुळे 50 लाख लोकांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi