पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशातल्या बारीपाडाला भेट दिली.

प्राचीन हरीपूरगड किल्यातल्या रसिका रे मंदिराचे जतन आणि विकासकामांची सुरुवात दर्शवणाऱ्या डिजिटल पट्टिकेचे पंतप्रधानांनी अनावरण केले.

तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमीपूजनही पंतप्रधानांनी केले.

आयओसीएलच्या पारादीप-हल्दीया-दुर्गापूर एलपीजी गॅस वाहिनीच्या बालासोर-हल्दीया-दुर्गापूर विभागाचे लोकार्पण पंतप्रधानांनी केले. बालासोर येथे मल्टिमोडल लॉजिस्टीक पार्कचे आणि सहा पारपत्र सेवा केंद्रांचे उद्‌घाटनही त्यांनी केले.

टाटा नगर ते बदाम पहाड दरम्यानच्या दुसऱ्या प्रवासी रेल्वेगाडीलाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.

|

सुमारे 4,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि भूमीपूजन आज करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी जनसभेत बोलताना दिली.

केंद्र सरकार पायाभूत विकासांवर लक्ष केंद्रीत करत असून यामुळे जनतेच्या जीवनात मूलभूत परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बालासोर-हल्दीया-दुर्गापूर गॅस वाहिनीमुळे ओदिशा आणि पश्चिम बंगालमधल्या भागात एलपीजीचा सुरळीत पुरवठा होईल. यामुळे वाहतुकीचा खर्च आणि वेळही वाचेल.

|

21 व्या शतकात संपर्काच्या महत्वावर त्यांनी भर दिला. भारतात आधुनिक पायाभूत सुविधा आणि संपर्क क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करण्यात येत आहे. ओदिशातही रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्कावर भर ध्‍देण्यात येत आहे. रेल्वे संपर्क वाढवल्यामुळे खनिज संसाधनांचा उद्योगांना सुलभ पुरवठा होईल आणि जनतेलाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे सोपे होईल असे पंतप्रधान म्हणाले.

पायाभूत सुविधांच्या विस्ताराचा जास्तीत जास्त फायदा मध्यमवर्ग आणि मध्यम उद्योग क्षेत्राला होईल. आधुनिक रस्ते, स्वच्छ रेल्वेगाड्या आणि किफायतशीर हवाई प्रवास यामुळे मध्यमवर्गाचे जीवनमान अधिक सुलभ होईल असे पंतप्रधान म्हणाले.

|

गेल्या साडे चार वर्षात केंद्र सरकारने जनतेला पारपत्र मिळवण्यात येत असलेल्या समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आज उद्‌घाटन करण्यात आलेली सहा पारपत्र सेवा केंद्र हे या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे तसेच ही केंद्र म्हणजे जीवनमान अधिक सुलभ करण्यासाठीचा आणखी एक प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देशाचा वैभवशाली सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठीही केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. श्रद्धेच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या स्थळांचा तसेच योग आणि आयुर्वेदाच्या ज्ञानाचा प्रसार करण्यात येत असून प्रोत्साहनही देण्यात येत आहे. या संदर्भात रसिका रे मंदीर कामाचा आणि हरीपूरगड इथल्या प्राचीन किल्ल्याच्या उत्खननकार्याचा त्यांनी उल्लेख केला. सरकारच्या अशा प्रयत्नामुळे पर्यटनाला चालना मिळण्यासाठी मदत होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Terror Will Be Treated As War: PM Modi’s Clear Warning to Pakistan

Media Coverage

Terror Will Be Treated As War: PM Modi’s Clear Warning to Pakistan
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 10 मे 2025
May 10, 2025

The Modi Government Ensuring Security, Strength and Sustainability for India