The nation is now moving towards Gas Based Economy, says PM Modi
City Gas Distribution network will play a major role in achieving Clean Energy solutions: PM Modi
Government would strive to fulfil the targets for Clean Energy and Gas Based Economy: PM Modi

नवी दिल्लीतल्या विज्ञानभवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नगर गॅस वितरणच्या (सीजीडी) 9व्या बोलीतील कामांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पायाभरणी झाली. पंतप्रधानांनी 10 व्या नगर गॅस वितरण बोलींच्या फेरीचा प्रारंभही केला.

सीजीडी बोलींच्या 9व्या फेरीअंतर्गत 129 जिल्ह्यात नगर गॅस वितरण जाळे उभारण्यासाठी कामाची सुरुवात झाल्याचे, पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. सीजीडी बोलींच्या 10 व्या फेरीनंतर 400 हून अधिक जिल्हे, नगर गॅस वितरण जाळ्यांतर्गत येतील. सुमारे 70 टक्के लोकसंख्येसाठी हे जाळे उपलब्ध होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

देश आता गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. यावर जोर देत पंतप्रधान म्हणाले की, गॅस आधारित अर्थव्यवस्थेच्या सर्व पैलूंवर केंद्र सरकार लक्ष देत आहे. यासाठी देशात पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेल्या विविध पावलांची, विशेषत: एलएनजी टर्मिनल्सची संख्या वाढवणे, राष्ट्रव्यापी गॅस ग्रीड आणि नगर गॅस वितरण जाळ्याची निर्मिती याबाबत मोदी यांनी माहिती दिली.

स्वच्छ ऊर्जेसाठी गॅस आधारित अर्थव्यवस्थेची भूमिका पंतप्रधानांनी उलगडून सांगितली. स्वच्छ ऊर्जेसाठी सीजीडी जाळे महत्वाची भूमिका बजावेल. स्वच्छ ऊर्जेसाठी केंद्र सरकारचे प्रयत्न व्यापक आहेत, असे त्यांनी सांगितले. स्वच्छ ऊर्जेसाठी इथेनॉल संमिश्रण, संपीडित जैववायू संयंत्रे, एलपीजी अधिकाधिक लोकांपर्यंत उपलब्ध होणे, वाहनांसाठी बीएस-6 इंधन सुरु करणे यासारख्या विविध उपक्रमांचा उल्लेख पंतप्रधानांनी यासंदर्भात केला.

गेल्या 4 वर्षात 12 कोटींहून अधिक लोकांना एलपीजी जोडणी देण्यात आली आहे. शहरांमध्ये गॅस नेटवर्कसमुळे नवी परिसंस्था निर्माण झाली असून, यामुळे गॅस आधारित उद्योगांना सक्षम केले आहे, युवा पिढीसाठी रोजगार निर्माण केला आहे आणि नागरिकांचे जीवन सुलभ केले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

स्वच्छ ऊर्जा आणि गॅस आधारित अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत राहील. अशी उद्दिष्टे पूर्ण करणे केवळ आपल्यासाठीच आवश्यक नसून, संपूर्ण मानवता आणि भावी पिढ्यांसाठी ते आवश्यक आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.



 

Click here to read PM's speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
‘Make in India’ is working, says DP World Chairman

Media Coverage

‘Make in India’ is working, says DP World Chairman
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi condoles loss of lives due to stampede at New Delhi Railway Station
February 16, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the loss of lives due to stampede at New Delhi Railway Station. Shri Modi also wished a speedy recovery for the injured.

In a X post, the Prime Minister said;

“Distressed by the stampede at New Delhi Railway Station. My thoughts are with all those who have lost their loved ones. I pray that the injured have a speedy recovery. The authorities are assisting all those who have been affected by this stampede.”