पंतप्रधानांचा सुरत दौरा

Published By : Admin | January 30, 2019 | 13:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरतला भेट दिली तसेच सुरत आणि दक्षिण गुजरात विभागाला जोडणाऱ्या सुरत विमानतळ टर्मिनल इमारतीच्या विस्तार प्रकल्पाची कोनशीलाही ठेवली.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पंतप्रधान म्हणाले की, “व्यवसाय सुलभीकरणासाठी देशातील पायाभूत सेवांमध्ये वृद्धी होणे आवश्यक असून सुरत विमानतळाचे विस्तारीकरण हा एक या दिशेने केलेला प्रयत्न आहे.” सुरत विमानतळ टर्मिनल इमारत विस्तारीकरणाचे बांधकाम मूल्य 354 कोटी रुपये असून 25,500 स्क्वेअर मीटर क्षेत्रात हे व्यापलेले आहे. ही पर्यावरण स्नेही, शाश्वत इमारत असून सर्वदूर एलईडी आणि सौर ऊर्जेचा वापर केला आहे. जेंव्हा या नवीन प्रकल्पाचे काम पूर्ण होईल तेंव्हा वर्तमान चार लाखाच्या तुलनेत 26 लाख प्रवासी क्षमता वाढेल. पंतप्रधान पुढे म्हणाले की, सुरत ते शारजा दरम्यान एअर इंडिया एक्स्प्रसे विमान सेवेला लवकरच सुरुवात होईल. जी पहिल्यांदा सुरुवातीला आठवड्याला दोन उडाण असतील आणि यानंतर आठवड्याला चार पर्यंत उड्डाणांची संख्या वाढेल.

पंतप्रधानांनी सांगितले की, ‘उडाण’ योजनेअंतर्गत, जास्तीत जास्त विमानतळांना प्रोत्साहनाच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली असून यामुळे लोकांना त्यांच्या निश्चित स्थानी पोहोचण्यास मदत होईल. ते म्हणाले की, प्रत्येकाला विमान सेवा सोयीस्कर झाली पाहिजे अशी आमची इच्छा असून भारतातील विमान जोडणीसाठी उडाण योजना मदतपूर्ण आहे. भारताच्या नकाशावर 40 विमानतळे उडाणमध्ये समाविष्ठ करण्यात आली असून देशभरात विविध ठिकाणी ही सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.

सरकारने हाती घेतलेल्या विकासकामांसंदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्राच्या विकासकार्यासाठी त्यांचे सरकार तात्काळ आणि कठीण निर्णय घेत असून तुम्ही दिलेल्या पूर्वीच्या बहुसंख्य प्रतिसादामुळे आम्ही असे कठीण निर्णय घेऊ शकतो असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी चार वर्षात 1.30 कोटी घरांची बांधणी झाल्याचे सांगितले तसेच 400 पारपत्र कार्यालयं नव्याने स्थापित झाल्याचेही सांगितले.

सरकारने हाती घेतलेल्या विकासकामांसंदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्राच्या विकासकार्यासाठी त्यांचे सरकार तात्काळ आणि कठीण निर्णय घेत असून तुम्ही दिलेल्या पूर्वीच्या बहुसंख्य प्रतिसादामुळे आम्ही असे कठीण निर्णय घेऊ शकतो असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी चार वर्षात 1.30 कोटी घरांची बांधणी झाल्याचे सांगितले तसेच 400 पारपत्र कार्यालयं नव्याने स्थापित झाल्याचेही सांगितले.

सुरत येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पंतप्रधानांनी काही लाभार्थ्यांना किल्ल्या सुपूर्द केल्या. ते म्हणाले की, आमचे सरकार गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी राहणीमानातील सहजता निपजत आहे. 

सुरत स्वातंत्र्य चळवळीसंदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, या शहराचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग उल्लेखनीय असून सर्वाधिक विकासात्मक शहरांमधील सुरत हे एक जागतिक पातळीवरील गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्वाचे शहर आहे.

पंतप्रधानांनी सर्वसोयीयुक्त रसिलाबेन सेवंतीलाल शाह वेनस रुग्णालय सुरतचे उद्‌घाटन केले. सार्वजनिक सभेला संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, ‘आयुष्मान भारत’ ही योजना आरोग्य सेवा देत आहे. जनेरिक औषधे लोकांपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत असून या औषधांचा फायदा केवळ किंमतीच्या दृष्टीनेच नाही तर अनेक लोकांचे प्राण वाचवण्यासाठी झाला आहे असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान दांडी येथून परतल्यानंतर संध्याकाळी सुरत येथे न्यू इंडिया युथ परिषदेला संबोधित करतील. दांडी येथे त्यांनी राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मरणार्थ प्रकल्पाचे अनावरण केले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage