Woman power in Manipur has always been a source of inspiration for the country: PM Modi
India’s growth story shall never be complete until the eastern part of our country progresses at par with the western part: PM Narendra Modi

खुरुमजारी

ईक-होइगी सरकार-बूथाजा-बिरिबा मणिपुर-गी प्रजा पुम-नामाकू थागत-चारी

सर्व प्रथम मणिपूरच्या जनतेचे अभिनंदन

मुख्यमंत्री एन बिरेनसिंह यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने काल एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला.शासनाचा कारभार कसा चालवला जातो,विकास योजनांवर कसे काम केले जाते,स्थैर्याचा अर्थ काय,केंद्र आणि राज्य सरकार यांनी एकत्र येऊन काम केले तर त्याचा प्रभाव कसा दिसून येतो,या सर्वांचे उत्त्तर आज मणिपूरचे हे भव्य चित्र देत आहे.

राज्य सरकार किती उत्तम काम करत आहे हे तुमच्या डोळ्यातली चमक, तुमचा आनंदच सांगतोय.दूर दूरवरून आपण मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद द्यायला इथे आलात याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे आभारी आहोत.

मणिपूरची जनता,इथले प्रशासन आणि राज्य सरकार यांनी गेल्या एक वर्षात केलेले कार्य, त्यांनी केलेली कामगिरी याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

मला आठवते आहे,मागच्या वर्षी फेब्रुवारीत मी इथे आलो होतो तेव्हा मी म्हटले होते की 15 वर्षात कॉंग्रेस सरकार जे करू शकले नाही ते आमचे राज्य सरकार15 महिन्यात करून दाखवेल.15 महिने पूर्ण व्हायला अजून 3 महिने बाकी आहेत मात्र मणिपुरचेबदललेले चित्र आताच स्पष्ट दिसत आहे.आधीच्यासरकारची धोरणे आणि निर्णयांमुळे समाजात जी नकारात्मक मानसिकता झाली होती ती बिरेन सरकारने बदलली आहे.कायदा सुव्यवस्था असो,भ्रष्टाचार निर्मुलन असो किंवापायाभूतसुविधेशी निगडीत काम असो, प्रत्येक आघाडीवर मणिपूर सरकार वेगाने काम करत आहे.

मित्रहो,

मणिपूरच्या विकासासाठी सुमारे साडेसातशे कोटी रुपयांच्या योजना सुरु करण्याचे किंवा त्यांचे लोकार्पण करण्याचे भाग्य आज मला लाभले आहे. इथल्या युवकांची स्वप्ने,त्यांची प्रतिभा, रोजगार, महिला सबलीकरण आणि इतर क्षेत्राशी या योजना थेट जोडलेल्या आहेत.या योजना राज्याच्या विकासाला नवा आयाम देतील असा मला विश्वास आहे.

बंधू-भगिनीनो,

क्रीडा क्षेत्र सध्या केवळ मनोरंजन आणि तंदुरुस्त राहण्याचे साधन राहिले नाही तर हे क्षेत्र म्हणजे उद्योग ठरले आहे.आजकाल हे पूर्णवेळ करियरही बनले आहे.देशातल्या युवकांना क्रीडा क्षेत्रातल्या अत्याधुनिक प्रशिक्षणासहसर्व सुविधा देण्यासाठी आमच्या सरकारचा प्रयत्न आहे.विशेषतः ईशान्येकडच्या लाखो युवकांचे सामर्थ्य आणि प्रतिभा लक्षात घेऊन केंद्र सरकारने 500 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला.या जानेवारीपासून इथे दोन अभ्यासक्रम सुरूही झाले आहेत याचा मला आनंद आहे.आज ज्या परिसराचे मी भूमी पूजन केले आहे, त्याचे काम पूर्ण झाल्यावर इथल्या युवकांना, त्यांच्यातले क्रीडा कौशल्य दाखवायला आणि त्यांना प्रशिक्षण द्यायला आणखी मदत होईल.

बंधू-भगिनीनो,

देशाला क्रीडा क्षेत्रातली महाशक्ती बनण्याचा आमच्या सरकारचा संकल्प आहे.क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आम्ही नुकताच खेलो इंडिया नावाचा कार्यक्रम सुरु केला आहे.खेलो इंडिया कार्यक्रमाअंतर्गत देशातल्या निवडक एक हजार एथलीटसाठी दर वर्षी 5 लाख रुपये खर्च केले जातील.मणिपूरच्या युवकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मी त्यांना करतो.शालेय स्तरावर कौशल्यहेरून त्याची जोपासना करून तेवृद्धिंगत करण्यावर आम्हीलक्ष केंद्रित केले आहे.या कार्यक्रमाअंतर्गत दिल्लीत नुकत्याच शालेय स्तरावरच्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.यामध्येही मणिपूरने आपली छापउमटवत पदक तालिकेत पाचवे स्थान मिळवले याचा मला आनंद आहे.देशातल्या मोठ्या राज्यांना मागे टाकत मणिपूरने 13 सुवर्ण पदकांसह 34 पदके पटकावली. याबद्दल मी इथल्या युवा वर्गाचे खूप खूप अभिनंदन करतो.केवळ मणिपूरच नव्हे तर ईशान्येकडीलबाकीच्या राज्यांनीही या क्रीडा स्पर्धात सरस कामगिरी केली.

मित्रहो,

क्रीडा क्षेत्राशी निगडीत आणखी एका मोठ्या प्रकल्पाचे आज लोकार्पण करण्यात आले.मणिपूरचे पहिले बहुविध क्रीडा संकुल आता युवकांकडे सोपवण्यात आले आहे.या बहुविध क्रीडा संकुलात युवकांना केवळ प्रशिक्षणच नव्हे तर स्पर्धाही आयोजित करता येईल.

बंधू-भगिनीनो,

मणिपूर देशातले असे राज्य आहे ज्याने क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून महिला सबलीकरण सिध्द करून दाखवले आहे. इथल्या महिला खेळाडूंनी ऑलिंपिकपासून ते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धापर्यंत देशाचे नाव उज्वल केलेआहे.फुटबॉल,कुस्ती,मुष्टीयुध्द, भारत्तोलन,धनुर्विद्या यासारख्या क्रीडा स्पर्धात मेरी कोम,मीराबाई चानू,बॉमबायला देवी,सरिता देवी असे अनेक क्रीडापटू दिले.या राज्यातली स्त्री शक्ती नेहमीचे देशाच्या स्फूर्तीचा स्त्रोत राहिला आहे.या प्रसंगी मी महानक्रांतिकारक आणि राष्ट्राची कन्या राणी गैदिन्लू यांना अभिवादन करतो. त्यांच्या नावाच्या एका उद्यानाचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले.

मित्रहो,

मुलींचे शिक्षण हा महिला सबलीकरणाचा पाया आहे.काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने देशव्यापी बेटी

बचाओ, बेटी पढाओ अभियानाची सुरवात केली.या अभियानालादेशभरात सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.डोंगराळ आणि आदिवासी भागातल्या मुलींना शिक्षणासाठीयेणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे.आदिवासी भागात राज्य सरकारनेमुलींसाठी वसतिगृह बांधण्याचे काम हाती घेतले आहे.अशा एका वसतिगृहाचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले.कृषी क्षेत्रापासून ते हस्तकले पर्यंत मणिपूरच्या महिला आघाडीवर आहेत. महिलाना त्यांची उत्पादने विकण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी महिला बाजारपेठेची संकल्पना विकसित करण्यात येत आहे.बिरेनजी यांच्या नेतृत्वा खालींल सरकार, संपूर्ण मणिपूर मध्ये अशा बाजारपेठाविकसित करत आहे. अशा एका बाजारपेठेचे मी नुकतेच उद्घाटन केले.राज्यात सरकारी ई बाजारपेठ लोकप्रिय करण्याची विनंती मीबिरेनजी यांना करतो.या मंचावरून आपण सरकारला आपली उत्पादने विकू शकतो.या मंचापासून मणिपूरच्या महिलांना मोठा फायदा मिळू शकतो.आज 1000 आंगणवाडी केंद्रांचेही मी उद्घाटन केले.हजारोमाता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याचे माध्यम म्हणून ही केंद्रे काम करतील.

महिला दिनी सुरु झालेल्या राष्ट्रीय पोषण अभियानाचाही त्यांना लाभ होईल.पोषक आहार,स्वच्छता,लसीकरण यावर लक्ष केंद्रित करण्याचे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

दुर्गम आणि डोंगराळ भागात नियुक्त झालेले डॉक्टर,शिक्षक आणि परिचारिका यांना त्या त्या ठिकाणी राहण्याच्या योग्य सुविधा नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.हे लक्षात घेऊन दुर्गम आणि डोंगराळ भागात, शिक्षक,डॉक्टर आणि परिचारिकांसाठीच्या19 ठिकाणच्या निवासाचे भूमिपूजन आज मी केले.यामुळे या भागातल्या जनतेला समर्पित सेवा देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळेल याची मला खात्री आहे.

मित्रहो,

ईशान्येसाठी, वाहतूकसुविधाद्वारे परिवर्तन हा आमच्या सरकारचा दृष्टीकोन आहे.दळणवळणावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.मणिपूर मधला दुर्गम भाग हेलिकॉप्टर सेवेद्वारे जोडण्यासाठीचे काम प्रगती पथावर आहे. विविधरस्ते प्रकल्पांवरही सरकारचे काम सुरु आहे.महत्वाच्या रस्ते प्रकल्पाचे भूमिपूजनही मी आज केले.

पर्यटन आघाडीवर, मणिपूर कडे खूप काही आहे,वने आणि वन्य जीवन,हिरव्यागार दऱ्या,डोंगर,चित्रवत चहाचे मळे आणि वैविध्यपूर्ण संस्कृती. या भागातल्या उच्च शिक्षित युवा वर्गामुळेआदर्श पर्यटक ठिकाण म्हणून मणिपूरचा विकास व्हायला मदत होणार आहे. याचा योग्य आणि पुरेपूर वापर केल्यास या भागात हे क्षेत्र सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून उदयाला येईल.

इंफाळ जवळच्यालोकप्रियचेरावचिंगपर्वता जवळ इको टुरिझमची कोनशीला अनावरण आज मी केले.गुहा पर्यटन प्रकल्पासाठीही मी भूमी पूजन केले.

मित्रहो,

देशाच्यापश्चिम भागाइतकाच पूर्व भागाचा विकास झाल्याशिवाय भारताची यशोगाथा पूर्ण होणार नाही असे मी नेहमीच सांगितले आहे.ईशान्य भारत हा भारताच्या विकासाचे नवे इंजिन ठरू शकेल.देशाच्या इतर भागांप्रमाणेच हा भागही विकसित व्हावा यासाठी ईशान्य भागाच्या विशेष गरजांची आम्ही दखल घेत आहोत.

विविधमंत्रालये त्यांच्या सध्याच्या योजनेत ईशान्य भागासाठी विशेषतरतूद पुरवत आहेत.प्रत्येक मंत्रालयाने त्यांच्या अंदाजपत्रकापैकी 10 % खर्चईशान्येसाठी करणे अनिवार्य आहे आणि त्याचा पुरेपूर वापर ही माझ्या सरकारची जबाबदारी आहे.मंत्री मंडळातल्या माझ्या सहकाऱ्यांनी या भागाला नियमित भेट देऊन सबंधित योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेणे मीअनिवार्य केले आहे.आतापर्यंत केंद्रीय मंत्र्यांनी या भागाला 200 पेक्षा जास्त वेळा भेटी दिल्या आहेत. गेल्या चार वर्षात मी सुद्धा 25 पेक्षा जास्त वेळा ईशान्य भागाला भेट दिली आहे.

या भागात पायाभूत सोयी सुविधा सुधारण्याचाकेंद्र सरकारचा मोठा प्रयत्न आहे. गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारने ईशान्य भागात रेल्वे जाळेसुधारण्यासाठीवार्षिक सुमारे 5300 कोटी रुपये खर्च केला आहे,गेल्या पाच वर्षातल्या एकूण खर्चाच्या अडीच पटहा खर्च आहे.मणिपूर मधले जीरीबाम स्थानक ब्राड गेजरेल्वेजाळ्याशी2016 मध्ये जोडण्यात आले. मे 2016 मध्ये जीरीबामला जाणाऱ्या पहिल्या प्रवासी रेल्वे गाडीला मी हिरवा झेंडा दाखवला होता. सध्या ईशान्येकडील आठपैकी सात राज्ये रेल्वेने जोडली गेली आहेत. इम्फाळ सहईशान्येकडच्या उर्वरित राज्यांच्या राजधान्या ब्राड गेजने जोडण्याचे काम सुरु आहे.

जगातल्यासर्वात जास्त उंच पाया असलेल्या पुलांपैकी एक पूल,म्हणजे 141 मीटर उंची असलेला पूल जीरीबाम-इम्फाळ न्यू लाइन प्रोजेक्ट वर बांधण्यात आला आहे.याच मार्गावर11.55 किलो मीटर लांबीचा बोगदा म्हणजे या प्रकल्पातला आणखी एक महत्वाचाटप्पा आहे.

2014 च्या सुरवातीला राज्यात केवळ 1200 किलो मीटरचे जाहीर केलेले राष्ट्रीय महामार्ग होते.मात्र गेल्या चार वर्षात आणखी 460 किलोमीटरचे रस्ते, राष्ट्रीय महामार्गम्ह्णून आम्ही जाहीर केले,म्हणजेच ही 38 % वाढ आहे.येत्या तीन चार वर्षात केंद्र सरकार मणिपूर मध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि इतर महत्वाच्या रस्त्यांच्या विकासासाठी30000कोटीची गुंतवणूक करणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग बांधण्याबरोबरच, पंतप्रधानग्रामीण सडक योजनेद्वारे ग्रामीण भागातले रहिवासी मुख्य रस्त्याशी जोडण्यावर आम्ही लक्षकेंद्रित करत आहोत.या योजने अंतर्गत राज्याला गेल्या चार वर्षात 1000कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरीत केला आहे. या काळात 150वस्त्याआम्ही जोडल्या आहेत. हे सर्व प्रयत्न, राज्यात रस्ते विकासासाठी आमची कटी बद्धता दर्शवतात.

केंद्र सरकारने,ईशान्य विशेष पायाभूत विकास योजना हीनवी केंद्रीय योजना मंजूर केली आहे.विशिष्ट क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा निर्मितीतली तफावत भरून काढायला यामुळे मदत होणार आहे.

मित्रहो,

2014 मध्ये गुवाहाटीत झालेल्या पोलीस महासंचालकांच्या वार्षिक परिषदेत मी व्यापक स्तरावर पोलीस भर्ती करण्याचे आवाहन केले होते.त्याला अनुसरून, दिल्ली पोलीसांचे सर्व समावेशक स्वरूप कायम ठेवण्यासाठी, ईशान्येकडील भागातल्यापोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी पाऊले उचलली.2016 मध्ये,ईशान्येकडून 136 महिला उमेदवारांसह,438उमेदवार दिल्ली पोलिसात भर्ती झाले आहेत हे सांगायला मला आनंद होत आहे. यापैकी 49 उमेदवार मणिपूरचे आहेत.

केंद्र सरकारने नुकतीच ईशान्येकडील राज्यांसाठीदहा भारतीय राखीव बटालियन मंजूर केल्या, त्यापैकी दोन बटालियन मणिपूरच्या आहेत.या दोन बटालियन राज्यातल्या 2000 युवकांना रोजगाराच्या थेट संधी प्रदान करेल.

नागरिक केन्द्री प्रशासन आम्ही प्रस्थापित करत आहोत आणि जनतेशी नियमित संवाद प्रक्रिया आम्ही सुरु केली आहे.मणिपूरच्या इतिहासात असे याआधी घडल्याचे ऐकिवात नाही.मियामगी नुमित आणि हिल लीडर दिन हे याच प्रयत्नांचा भाग आहेत. असे 24 संवाद झाले असून 19 हजार पेक्षा जास्त लोकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मला देण्यात आली आहे.

जनतेच्या तक्रारींची राज्य सरकार गंभीर दखल घेत आहे. मुख्यमंत्री कार्यालयात मोफतदूरध्वनी क्रमांकासह तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती मला देण्यात आली आहे.

डोंगरांळ भागांकडे चला हा सरकारचा उपक्रम म्हणजे स्तुत्य पाऊल आहे. जनतेला प्रशासना जवळ आणण्यासाठी मुख्यमंत्र्यानी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह सगळ्या डोंगराळ भागात प्रवास केला आहे.

मणिपूरने एकदा निश्चय केला की ती गोष्ट करण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही. 1944 च्या एप्रिलमध्ये मणिपूरच्या या भूमीवर नेताजी बोस यांच्या आयएनएने स्वातंत्र्याचीनिर्णायकहाकदिली होती. त्यामुळे राष्ट्रात चैतन्य निर्माण होऊन स्वातंत्र्य लढ्याला स्फूर्ती मिळाली.

आज मणिपूर ने नव भारताच्या उदयातमहत्वाची भुमिका निभावण्याचा प्रण केला आहे. गेल्या एक वर्षात विकासासाठी राजकारण आणि उत्तम प्रशासन म्हणजे काय याचे दर्शन मणिपूरने घडवले आहे.

मित्रहो,

एका वर्षापूर्वी आपण जो स्नेह दिलात त्याचा परिणाम म्हणून आज आम्ही हे सर्व काम करू शकत

आहोत.

मी आपल्याला खात्री देतो की बिरेन सिंह यांच्या चमूला माझ्याकडून संपूर्ण सहकार्य मिळत राहील.

राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, राज्यातल्या जनतेला विशेषतः इथल्या युवकांना विकासाच्या या योजनांबद्दल मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.

आपणा सर्वांना पुन्हा एकदा अनेक धन्यवाद.

मयामबू

थागत-चारी.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi congratulates hockey team for winning Women's Asian Champions Trophy
November 21, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi today congratulated the Indian Hockey team on winning the Women's Asian Champions Trophy.

Shri Modi said that their win will motivate upcoming athletes.

The Prime Minister posted on X:

"A phenomenal accomplishment!

Congratulations to our hockey team on winning the Women's Asian Champions Trophy. They played exceptionally well through the tournament. Their success will motivate many upcoming athletes."