पंतप्रधानांचा आगरतळा दौरा

Published By : Admin | February 9, 2019 | 18:51 IST
QuoteHIRA model of development - Highway, I Way, Railway, Airway is on in Tripura, says PM

आसाम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुराच्या आपल्या दौऱ्याच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पंतप्रधानांनी आज, आगरतळा येथे भेट दिली. त्यांनी गर्जी-बेलोनिया रेल्वेमार्गाचे आणि राज्यातल्या इतर विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन केले.

आगरतळा इथल्या महाराज वीर विक्रम विमानतळावर, महाराज वीर विक्रम माणिक्य बहादूर यांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांनी अनावरण केले. महाराजांकडे त्रिपुराच्या विकासासाठी दूरदृष्टी होती आणि आगरतळा या शहराच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान राहिल्याचे प्रशंसोद्‌गार पंतप्रधानांनी काढले. या पुतळ्याचे अनावरण करतांना अभिमान वाटत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

|

त्रिपुराचा विकास आता नवी मार्गक्रमणा करत असल्याचे त्यांनी या राज्याच्या विकासाबाबत बोलताना सांगितले.त्रिपुराच्या विकासासाठी केंद्र सरकारने, गेल्या साडे चार वर्षात आवश्यक तो निधी मंजुर केला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच पीक खरेदी किमान आधारभूत किंमतीनुसार झाल्याचे आपण ऐकले आहे असे पंतप्रधान म्हणाले.

|

स्वामी विवेकानंद स्टेडिअम येथे फलकाचे अनावरण करुन पंतप्रधानांनी गर्जी-बेलोनिया रेल्वेमार्गाचे उद्‌घाटन केले. या मार्गामुळे त्रिपुरा, दक्षिण आणि आग्नेय आशियाचे महाद्वार म्हणून ठरणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. नरसिंहगड इथे त्रिपुरा तंत्रज्ञान संस्थेच्या नव्या संकुलाचे पंतप्रधानांनी उद्‌घाटन केले. निवडणुकीच्या दौऱ्यादरम्यान, आपण विकासाच्या हिरा मॉडेल म्हणजे हायवे अर्थात महामार्ग, आयवे,रेल्वे आणि एअरवे म्हणजे हवाई मार्ग याची प्रशंसा केली होती याचे स्मरण पंतप्रधानांनी केले.

|

आगरतळा सबरुम, राष्ट्रीय महामार्ग, हमसफर एक्स्प्रेस, आगरतळा देवघर एक्स्प्रेस, आगरतळा येथे विमानतळाचे नवे टर्मिनल हा याचाच भाग आहे.

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
From Ghana to Brazil: Decoding PM Modi’s Global South diplomacy

Media Coverage

From Ghana to Brazil: Decoding PM Modi’s Global South diplomacy
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 जुलै 2025
July 12, 2025

Citizens Appreciate PM Modi's Vision Transforming India's Heritage, Infrastructure, and Sustainability