QuoteIn the coming years, Bihar will be among those states of the country, where every house will have piped water supply: PM Modi
QuoteUrbanization has become a reality today: PM Modi
QuoteCities should be such that everyone, especially our youth, get new and limitless possibilities to move forward: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये 'नमामि गंगे' योजना आणि 'अमृत' योजनेंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. आज उद्‌घाटन झालेल्या चार योजनांमध्ये पाटणा शहरातील बेऊर आणि करम-लेचक येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प तसेच सिवान आणि छपरा येथील 'अमृत'' योजनेंतर्गत पाण्याशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. त्याशिवाय मुंगेर व जमालपूर येथील पाणीपुरवठा प्रकल्प व मुजफ्फरपूरमधील नमामि गंगे अंतर्गत रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट योजनांसाठी आज पायाभरणी करण्यात आली.

कोरोनाच्या काळातही बिहारमध्ये विविध विकास प्रकल्पांची कामे अखंडपणे सुरू होती असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

अलीकडच्या काळात राज्यात शेकडो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन झाले ज्याचा पायाभूत सुविधांच्या विकासासह बिहारच्या शेतकऱ्यांना फायदा होईल असे पंतप्रधान म्हणाले.

|

आधुनिक भारतातील प्रख्यात नागरी अभियंता सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या अभियंता दिनानिमित्त  पंतप्रधानांनी देशाच्या विकासात केलेल्या अभियंत्यांनी केलेल्या योगदानाचे कौतुक केले. लाखो अभियंते तयार करून बिहारनेही देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले.

बिहार ऐतिहासिक शहरांची भूमी आहे आणि हजारो वर्षांचा समृद्ध वारसा आहे, असे मोदी म्हणाले.  स्वातंत्र्यानंतर, बिहारचे नेतृत्व दूरदर्शी नेत्यांनी केले होते ज्यांनी गुलामगिरीच्या काळात निर्माण झालेल्या विकृतींना दूर करण्याचा प्रयत्न केला. ते पुढे म्हणाले की त्यानंतर बदललेल्या प्राधान्यक्रमांसह एकांगी विकास झाला ज्यामुळे शहरी पायाभूत सुविधांचा नाश झाला आणि राज्यातील ग्रामीण पायाभूत सुविधा कोलमडून गेली.

जेव्हा स्वार्थ, प्रशासनापेक्षा वरचढ होते आणि व्होट बँकेचे राजकारण अस्तित्त्वात येते तेव्हा आधीच दुर्लक्षित आणि वंचित लोकांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होईल असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, बिहारमधील जनतेने अनेक दशकांपासून ही वेदना सहन केली जेव्हा पाणी आणि सांडपाणी यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

|

लोकांना दूषित पाणी पिऊन आजारांचा सामना करावा लागतो आणि त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा उपचारासाठी जातो. अशा परिस्थितीत, बिहारमधील एका बऱ्याच मोठ्या भागाने कर्ज, रोग, असहाय्यता, अशिक्षित या गोष्टींना आपले नशिब मानले होते असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या काही वर्षांपासून ही व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न सुरू असून समाजातील सर्वात जास्त फटका बसलेल्या या घटकामध्ये पुन्हा आत्मविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ज्या प्रकारे मुलींच्या शिक्षणाला  प्राधान्य देण्यात आले आहे, पंचायती राजसह स्थानिक संस्थामध्ये वंचित असलेल्यांचा सहभाग वाढत आहे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे.

2014 पासून, पायाभूत सुविधा संबंधित योजनांचे संपूर्ण नियंत्रण ग्रामपंचायतींना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहे. आता, नियोजन ते अंमलबजावणी आणि योजनांच्या देखभालीपर्यंत स्थानिक संस्था स्थानिक गरजा भागवू शकतील आणि हेच कारण आहे की बिहारमधील शहरांमध्ये पिण्याचे पाणी व सांडपाणी या मूलभूत सुविधांच्या पायाभूत सुविधांमध्ये सतत सुधारणा होत आहेत.

पंतप्रधान म्हणाले, गेल्या 4 ते 5 वर्षांत मिशन अमृत आणि राज्य सरकारच्या योजनांतर्गत लाखो कुटुंबांना बिहारच्या शहरी भागात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे असे पंतप्रधान म्हणाले. येत्या काही वर्षांत बिहार हे देशातील अशा राज्यांपैकी एक असेल जिथे प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा होईल. हे मोठे ध्येय साध्य करण्यासाठी बिहारच्या लोकांनी कोरोनाच्या या संकटातही सतत काम केले आहे. बिहारमधील ग्रामीण भागात इतर राज्यातून परत आलेल्या परप्रांतीय कामगारांच्या कामामुळे पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार अभियानात गेल्या काही महिन्यांत 57 लाखाहून अधिक कुटुंबांना पाण्याचे कनेक्शन देण्यात मोठी भूमिका होती, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

|

पंतप्रधान म्हणाले की हे जल जीवन मिशन बिहारच्या या कष्टकरी सहकाऱ्यांना समर्पित आहे. आज, दररोज सुमारे एक लाखाहून अधिक घरे नळाद्वारे पाण्याच्या नवीन कनेक्शनने जोडली जात आहेत. स्वच्छ पाणी केवळ गरीबांचे जीवन सुधारत नाही तर बर्‍याच गंभीर आजारांपासून त्यांचे संरक्षण करते. ते म्हणाले, शहरी भागातही, अमृत योजनेंतर्गत बिहारमधील 12 लाख कुटुंबांना शुद्ध पाणी देण्याचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे आणि त्यापैकी 6 लाख कुटुंबांना यापूर्वीच कनेक्शन दिले गेले आहे.

पंतप्रधान म्हणाले की शहरी वस्तीची संख्या वेगाने वाढत आहे आणि शहरीकरण आज एक वास्तविकता बनले आहे परंतु अनेक दशकांपर्यंत शहरीकरण हा अडथळा मानला जात असे. बाबासाहेब आंबेडकर, जे शहरीकरणाचे मोठे समर्थक होते, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की, आंबेडकरांनी शहरीकरणाला समस्या मानले नाही तर, शहरीकरण म्हणजे अशी जागा  जिथे गरीब लोकांनासुद्धा संधी मिळते आणि जीवन सुधारण्याच्या मार्ग खुला करतात.

ते पुढे म्हणाले की शहरे अशी असावीत की प्रत्येकाने, विशेषत: आपल्या तरुणांना पुढे जाण्यासाठी नवीन आणि अमर्याद संधी मिळव्यात. अशी शहरे असावीत जिथे प्रत्येक कुटुंब समृद्धी आणि आनंदाने जीवन जगू शकेल. अशी शहरे असावीत जिथे प्रत्येकजण, गरीब, दलित, मागास, महिलांना सन्मानाने जगता येईल.  आज देशात आपण नवीन शहरीकरणाचे साक्षीदार आहोत आणि शहरेही आज आपले अस्तित्व निर्माण करत आहेत असे पंतप्रधान म्हणाले. काही वर्षांपूर्वी शहरीकरण म्हणजे काही निवडक शहरांमध्ये काही क्षेत्रे विकसित करणे असे होते. पण आता ही विचारसरणी बदलत आहे. आणि भारताच्या या नव्या शहरीकरणासाठी बिहारचे लोक आपले पूर्ण योगदान देत आहेत. ते म्हणाले की आत्मा-निर्भर बिहार, आत्मा-निर्भर भारत या अभियानाला चालना देण्यासाठी  सध्याच्या नव्हे तर भविष्याच्या  गरजांनुसार शहरे तयार करणे फार महत्वाचे आहे असे पंतप्रधान म्हणाले.

|

या विचारसरणीने, अमृत मिशन अंतर्गत बिहारमधील अनेक शहरांमध्ये मूलभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे.

बिहारमध्ये 100 हून अधिक नगरपालिकांमध्ये 4.5 लाखाहून अधिक एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले.  यामुळे आपल्या छोट्या शहरांच्या रस्त्यावर व गल्लीतील दिवे बसवण्यात आले असून शेकडो कोटी रुपयांची वीज बचत होत असून लोकांचे जीवन सुलभ होत आहे. ते म्हणाले की, राज्यातील सुमारे 20 मोठी आणि महत्त्वाची शहरे गंगा नदीच्या काठावर आहेत. गंगा नदीची स्वच्छता, गंगा पाण्याच्या स्वच्छतेचा थेट परिणाम या शहरांमध्ये राहणाऱ्या कोट्यावधी लोकांवर पडतो. गंगा नदीची स्वच्छता लक्षात घेऊन बिहारमध्ये 6000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 50 हून अधिक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की, गंगेच्या काठावरील सर्व शहरांमध्ये, गलिच्छ नाल्यांचे पाणी थेट गंगेमध्ये जाऊ नये यासाठी सरकार अनेक जलशुद्धीकरण प्रकल्प बसविण्याचे प्रयत्न करीत आहे.

आज उद्‌घाटन झालेल्या पाटणा येथील बेउर आणि करम-लिच्छक योजनेचा या भागातील कोट्यवधी लोकांना फायदा होईल. यासह गंगाच्या काठावरील गावेही 'गंगा ग्राम' म्हणून विकसित केली जात आहेत.

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
In Mann Ki Baat, PM Stresses On Obesity, Urges People To Cut Oil Consumption

Media Coverage

In Mann Ki Baat, PM Stresses On Obesity, Urges People To Cut Oil Consumption
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 फेब्रुवारी 2025
February 24, 2025

6 Years of PM Kisan Empowering Annadatas for Success

Citizens Appreciate PM Modi’s Effort to Ensure Viksit Bharat Driven by Technology, Innovation and Research