आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज राजस्थानमध्ये झुनझुनु येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राष्ट्रीय पोषण मोहिमे’चे उद्घाटन केले आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमाचा विस्तार केला.
यावेळी पंतप्रधानांनी संबंधित जिल्ह्यांमध्ये जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमातील लाभार्थी महिला आणि बालिकांशीही पंतप्रधानांनी संवाद साधला.
बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.
एका महत्वपूर्ण योजनेचे उद्घाटन करण्यासाठी आणि दुसऱ्या योजनेचा विस्तार करण्यासाठी पंतप्रधानांनी राजस्थानची निवड केली, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, असे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी यावेळी सांगितले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान करत असलेल्या प्रयत्नांना राजस्थान नेहमीच सहाय्य करेल, असेही त्या म्हणाल्या.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण देश झुनझुनुशी जोडला गेला आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. बेटी बचाओ बेटी पढाओ चळवळ पुढे नेणाऱ्या झुनझुनु जिल्ह्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. लिंगाधारीत भेदभावाचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले.
मुलांप्रमाणेच मुलींनाही सगळीकडे दर्जेदार शिक्षण मिळणे महत्वाचे आहे, असे पंतप्रधानांनी आग्रहपूर्वक सांगितले.
मुलगी हे ओझे नाही, असे सांगत अनेक क्षेत्रांमध्ये मुलींनी आपल्या कर्तृत्वाने देशाचा सन्मान आणि गौरव वाढवला आहे, असे ते म्हणाले.
बालकांना योग्य पोषण प्राप्त होण्याच्या महत्वाबाबतही पंतप्रधानांनी आग्रही मत व्यक्त केले. मिशन इंद्रधनुष्यने महिला आणि बालकांच्या आयुष्यात अतिशय सकारात्मक बदल घडवून आणल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
With the power of technology the entire nation is connected with Jhunjhunu.
— PMO India (@PMOIndia) March 8, 2018
I am here in Jhunjhunu to commend this district for furthering the #BetiBachaoBetiPadhao movement: PM @narendramodi https://t.co/GV4fRhII6B #NariShakti4NewIndia
There is no question of discrimination based on gender. Everyone is equal: PM @narendramodi in Rajasthan #NariShakti4NewIndia
— PMO India (@PMOIndia) March 8, 2018
Important that girls get access to quality education, just like boys do: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 8, 2018
'बेटा-बेटी एक' भाव के लिए हमें एक सामाजिक और जन आंदोलन खड़ा करने की जरूरत : PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 8, 2018
A daughter is not a burden.
— PMO India (@PMOIndia) March 8, 2018
Please look around us- see how girls are bringing pride and glory for our nation. They are excelling in several fields: PM @narendramodi #NariShakti4NewIndia
बेटी बोझ नहीं, बेटी पूरे परिवार की आन-बान और शान होती हैं : PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 8, 2018
Important to provide proper nutrition to children: PM @narendramodi #NariShakti4NewIndia
— PMO India (@PMOIndia) March 8, 2018
Mission Indradhanush has brought an extremely positive change in the lives of women and children: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 8, 2018