Youngsters are filled with energy and enthusiasm... What they need is encouragement, mentorship and institutional support: PM Modi 
Intent leads to ideas, ideas have the power to drive innovation and innovation ultimately will lead to the creation of a New India: PM Modi 
Never stop dreaming and never let the dreams die. It is good for children to have high curiosity quotient: PM 
Need of the hour for is to innovate and come up with solutions to the problems the world faces. Innovate to transform lives of the commons: PM Modi to youngsters 
Thank PM of Israel for the desalinisation motorable machine, it will benefit people in border areas: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी अहमदाबाद उपनगरामध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘आयक्रिएट’ या सुविधेचे आज लोकार्पण केले. नवद्योजकांना निर्मिती, नवकल्पना, अभियांत्रिकी, उत्पादन रचना आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा ‘आयक्रिएट’मुळे मिळणार आहे. अन्नसुरक्षा, पाणी, दूरसंचार व्यवस्था, सायबर सुरक्षा, माहिती आणि तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा, जैव वैद्यकीय साधने आणि यंत्रे यांची निर्मिती ‘आयक्रिएट’च्या माध्यमातून करून भारतात पर्यावरण प्रणाली विकसित करतानाच उच्च गुणवत्ता असलेले नवउद्योजक निर्माण करण्याचा उद्देश आहे.

यावेळी दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विविध तंत्रज्ञानाच्या आणि नवकल्पनांच्या स्टॉल्सना भेटी दिल्या.

भारत आणि इस्रायल या दोन्ही देशातील लोकांना एकमेकांच्या अधिक जवळ आणण्यासाठी नवकल्पना महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे, असे मत पंतप्रधानांनी यावेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. तंत्रज्ञान क्षेत्रात इस्रायलनी केलेली भरीव कामगिरी आणि दाखवलेले कौशल्य यांची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

भारतीय युवकांमध्ये अमाप ऊर्जा आणि उत्साह आहे. त्यांना आता प्रोत्साहन देण्याबरोबरच संस्थात्मक पातळीवर पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

सरकारला संपूर्ण कार्यपद्धतीच नवकल्पनांनीयुक्त असावी असे वाटतेय, असं सांगून पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, वेगवेगळ्या कल्पनांमधूनच नवनवीन कल्पना येतात आणि नवकल्पनांमधूनच नवभारत निर्माण होण्यासाठी मदत मिळणार आहे. 

 यश मिळवायचे असेल तर त्यासाठी आधी धाडस दाखवण्याची आवश्यकता आहे, असे सांगून पंतप्रधानांनी ‘आयक्रिएट’मध्ये सहभागी होण्याचे धाडस दाखवणाऱ्या युवकांचे अभिनंदन केले.

रुढी, परंपरा आणि नवकल्पना यांच्यातील कोंडी फोडण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगताना पंतप्रधानांनी कालिदासाच्या श्लोकाचे उदाहरण दिले आणि भारतीय युवकांनी देशाला आज भेडसावत असणाऱ्या प्रश्नांना, आव्हानांना तोंड देण्यासाठी नवउद्योजक म्हणून पुढे यावे. सर्वसामान्य जनतेच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी कमीत कमी खर्चात सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

अन्नधान्य, पाणी, आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रात भारत आणि इस्रायल यांच्यात सहकार्य करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. या उभय देशांमध्ये होत असलेले सहकार्य म्हणजे 21 व्या शतकातील मानवजातीच्या इतिहासातील नव्या अध्याय आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi