PM Modi applauds doctors, Medical Staff, Para-Medical Staff, sanitation workers in hospitals and everyone associated with Corona Vaccine
PM Modi complements Corona warriors for their authentic communication about the pandemic and vaccination
World's largest vaccination programme is going on in our country today: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील कोविड लसीकरण मोहिमेच्या लाभार्थी आणि लस देणाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

पंतप्रधानांनी वाराणसीच्या जनतेला तसेच या कार्यक्रमात सहभागी सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, निम-वैद्यकीय कर्मचारी, रुग्णालयांमधील स्वच्छता कर्मचारी आणि कोरोना लसीशी संबंधित प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या.  कोविडमुळे या प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबाबत त्यांनी असमर्थता दर्शवली. ते म्हणाले की आज जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आपल्या देशात सुरु आहे. पहिल्या दोन टप्प्यात 30 कोटी देशवासियांना लस देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की आज देशाकडे स्वतःची लस बनवण्याची इच्छाशक्ती आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जलद गतीने लस पोहोचण्यासाठी आज प्रयत्न केले जात आहेत. आज भारत जगाच्या या सर्वात मोठ्या गरजेबाबत पूर्णपणे स्वावलंबी आहे आणि भारत अनेक देशांना मदत देखील करत आहे.

पंतप्रधानांनी गेल्या सहा वर्षात वाराणसी व आजूबाजूच्या परिसरातील वैद्यकीय पायाभूत सुविधांमधील बदलाची दखल घेतली ज्यामुळे कोरोना काळामध्ये संपूर्ण पूर्वांचलला मदत झाली. आता वाराणसी, लसीकरणाबाबतही तीच गती  दाखवत आहे. वाराणसीमध्ये 20 हजाराहून अधिक आरोग्य व्यावसायिकांचे लसीकरण केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी 15 लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या व्यवस्थेबद्दल कौतुकही केले.

ते म्हणाले की, लसीकरण मोहिमेची व्यवस्था व त्याबाबत काही समस्या असल्यास त्या जाणून घेणे हा आजच्या संवादाचा उद्देश होता. लसीकरण मोहिमेत सहभागी असलेल्या लोकांशी ते बोलले. वाराणसीकडून मिळालेल्या  अभिप्रायामुळे इतरत्र देखील परिस्थिती समजून घेण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी मॅट्रॉन, एएनएम कामगार, डॉक्टर आणि लॅब तंत्रज्ञांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी त्यांच्याप्रति देशाची कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधानांनी वैज्ञानिकांचे भिक्षूसमान  समर्पणाबद्दल कौतुकही केले. स्वच्छतेची संस्कृती रुजवणाऱ्या स्वच्छता अभियानात केलेल्या उपाययोजनामुळे साथीच्या रोगाचा सामना करण्यास देश अधिक सज्ज झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. महामारी आणि लसीकरणाच्या विश्वासार्ह संप्रेषणाबद्दल पंतप्रधानांनी कोरोना योद्ध्यांची प्रशंसा केली.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi