For the last four years, efforts are being made to develop Kashi in accordance with the requirements of the 21st century: PM
New Banaras - a blend of spirituality and modernity - is being developed, for a New India: PM Modi
Kashi is emerging as an important international tourist destination, says PM Modi
Work is in full swing for an Integrated Command and Control Centre, that would make Varanasi a Smart City: PM
Smart City Initiative is not just a mission to improve infrastructure in cities, but also a mission to give India a new identity: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतील एकूण ९०० कोटी रुपये लागत मूल्य असलेल्या विविध प्रकल्पचे उदघाटन करून कोनशिला ठेवली. यामध्ये वाराणसी सिटी गॅस वितरण प्रकल्प, वाराणसी-बलिया एमईएमयू रेल्वे अशा दोन प्रकल्पांचा समावेश असून या प्रकल्पांचे उदघाटन ही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. तर पंचक्रोशी परिक्रमा मार्ग, स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत विविध प्रकल्प आणि नमामीगंगे या अंतर्गत अनेक प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. पंतप्रधानांनी वाराणसीमधील आंतरराष्ट्रीय परिषद केंद्राची कोनशीलाही ठेवली.

एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी युवा खेळाडू हिमा दास हिचे20 वर्षांखालील विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत 400 मीटरच्या उपांत्यपूर्व फेरीत सुवर्ण पदक जिंकल्या बद्दल अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून 21 व्या शतकाच्या आवश्यकतेनुसार काशी शहर विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू असून नूतन भारतासाठी नवी बानारस – आध्यात्मिकता आणि आधुनिकतेचा मिलाफ – अतिशय सुंदर रित्या विकसित होत आहे.

ते म्हणाले की, नवीन बनारसची आजची झलक सर्वत्र पसरलेली आहे. गेल्या चार वर्षात वाराणसीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली असून सुमारे 1000 कोटी रुपयांचे प्रकल्प उदघाटीत करण्यात आले आहेत, ज्याची कोनशिला आजच ठेवण्यात आली, जो कि या प्रकल्पाचा एक कार्य भाग आहे. असेही पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी ट्रान्सफॉर्नेशनच्या वाहतूकीच्या विस्तारा बाबतचा दृष्टिकोन सांगितला तसेच आजमगढ येथील पूर्वांचल एक्स्प्रेस वे ची पायाभरणी हि सुद्धा या कार्याचा एक भाग असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी सांगितले की वाराणसी हे वैद्यकीय शास्त्रातील उभरते केंद्र म्हणून उदयास येत असून, बीएचयू हि संस्था एम्ससह कार्य करेल जी जागतिक दर्जाची आरोग्य संस्था म्हणून विकसित होईल.

पंतप्रधानांनी वाराणसी आणि आजूबाजूच्या प्रदेशांना जोडण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराविषयी प्रशंसा केली. ते म्हणाले की, काशी हे एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून उदयास येत आहे. या संदर्भात त्यांनी आज इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर च्या पायाभरणी समारंभाचा उल्लेख केला. वाराणसीच्या लोकांना भेटल्या बद्दल जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांचे आभारपंतप्रधानांनी मानले. त्यांनी भारत सरकार आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारने एकत्रितरित्या पर्यटन क्षेत्र आणि पर्यटकांसाठी घेतलेल्या पुढाकाराची तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या कामाची प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी चार वर्षांपूर्वी असलेली वाराणसीमधील रस्त्यांची दुर्गती आणि इतर पायाभूत सुविधांची खराब स्थिती नमूद केली. ते म्हणाले की शहराचा कचरा गंगा नदी मध्ये न बघता टाकण्यात येत होता. परंतु आज गंगोत्री ते महासागरापर्यंत गंगा स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

 

त्यांनी सांडपाणी कायम उपचारासाठी विविध प्रकल्पांची चर्चा केली. ते म्हणाले की, या सर्व प्रयत्नांचे फळ भविष्यात मिळतील. एकात्मिक व्यवस्थापन आणि नियंत्रणासाठी हे काम झपाट्याने करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे वाराणसीला एक स्मार्ट सिटी बनवता येईल. ‘स्मार्ट सिटी इनिशिएटिव्ह’ केवळ शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठीच नव्हे तर भारताला एक नवीन ओळख देण्याचे हे एक ध्येय आहे. असे ते म्हणाले. त्यांनी आपल्या औद्योगिक धोरण आणि गुंतवणूक वातावरणासाठी राज्य सरकारची प्रशंसा केली, त्याचे परिणाम स्पष्ट होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले. नोएडामध्ये अलीकडेच सॅमसंगच्या मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा शुभारंभ झाल्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, मोबाईल उत्पादक कंपन्या लाखो रोजगार निर्मिती करीत आहेत.

शहर वायू वितरण प्रकल्पा संबंधी बोलतांना, पंतप्रधान म्हणाले की, वाराणसीमधील ८००० घरांना या आधिच गॅस पाईप जोडणी मिळाली असून, त्यांनी शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी इंधन म्हणून सीएनजीचा वापर देखील केला आहे असेही त्यांनी सांगितले.

वाराणसी शहराने जपानी पंतप्रधान शिंजो आबे आणि फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे स्वागत अतिशय उत्साहात केल्याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. वाराणसी मध्ये प्रवासी भारतीय दिनानिमित्त जानेवारी २०१९ मध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

 

 

 
Click here to read PM's speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi