हरिद्वार येथे उमिया धाम आश्रमाचे आज उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या समुदायाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
सामाजिक सुधारणांचे प्रसार केंद्र म्हणून भारतात आध्यात्मिक संस्थांनी कार्य केले आहे. भारतात पर्यटनाची खूप प्राचीन संकल्पना आहे, त्याचबरोबर आध्यात्मिक परंपराही आहे. आज उद्घाटन करण्यात आलेल्या आश्रमाचा हरिद्वारला येणाऱ्या भाविकांना, यात्रेकरुनां चांगला लाभ होणार आहे, असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले की, यात्रा हे आपल्या संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. यात्रेमुळेच देशाच्या विविध भागातील चालीरिती, प्रथांचा परिचय आपल्याला होतो.
या उमिया यांच्या भक्तांनी केलेल्या कार्यामुळे अनेकांच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला आहे. त्यांनी लिंग समानतेचा सातत्याने प्रचार करुन जागरुकता निर्माण केली, असे नमूद करुन मोदी यांनी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या मोहिमेचा प्रसार करणाऱ्या मेहसाणा जिल्हयातल्या महिलांचे विशेष आभार मानले.
या उमिया यांच्या अनुयायांनी स्वच्छाग्रही बनावे आणि स्वच्छ भारत मोहिमेला अधिक बळकटी दयावी, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
The Ashram being inaugurated today will benefit the pilgrims coming to Haridwar: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 5, 2017
The idea of a 'Yatra' existed as an integral part of our culture. Through a Yatra we get acquainted with various parts of the country we may never have seen otherwise: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 5, 2017
The work being done by devotees of Maa Umiya has touched the lives of several people. They have also spread awareness on gender equality: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 5, 2017
I want to specially thank women of Mehsana District, who have furthered the message of 'Beti Bachao, Beti Padhao' : PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 5, 2017
I appeal to all devotees of Maa Umiya, to become Swachhagrahis and add strength to the Swachh Bharat Mission: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 5, 2017