QuotePM Modi inaugrates SUMUL cattle feed plant, lays Foundation Stone for three Lift Irrigation Schemes
QuoteSUMUL has empowered several people, benefited the tribal communities of Gujarat: PM Modi
QuoteSUMUL is an example of positive results that can be achieved when Sahkar and Sarkar work together: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दक्षिण गुजरातमधल्या बाजीपूरा येथिल सूरत डिस्ट्रीक्ट को-ऑपरेटीव्ह मिल्क प्रोड्यूसर्स युनियन लिमिटेड अर्थात एसयूएमयूएल’च्या वैरण कारखान्याचे उद्‌घाटन केले. तसेच त्यांनी तीन उपसा सिंचन योजनांची पायाभरणीही केली आणि तापी जिल्ह्यातल्या व्यारा शहर आणि जेसिन्हपूर-दोलवण समूहासाठीच्या पिण्याचे पाणी पुरवठा योजनांचा शुभारंभही केला.

|

 

|

 

|

 

|

 

|

जनसभेला संबोधित करतांना या भागात अनेक वर्ष केलेल्या कामाच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. एसयूएमयूएलमुळे जवळपासच्या भागातील अनेक लोकांचे सक्षमीकरण झाल्याचेही ते म्हणाले. उंबरगांव ते अंबाजीपर्यंतच्या भागाचे परिवर्तन झाले असून, याचा फायदा गुजरातमधल्या आदिवासी जमातींना झाला असल्याचे त्यांनी सांगितले. एसयूएमयूएलमुळे सहकार आणि सरकार यांनी एकत्रित कार्य केल्यास सकारात्मक परिणाम साध्य होऊ शकतात, हे दिसून आले आहे असे ते म्हणाले. शेतकरी आणि दुग्धशाळा यांनी एकत्रित काम केल्यास चांगले परिणाम कसे होतात हे देखिल एसयूएमयूएलमुळे अधोरेखित झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

|

 

|

 

|

तापी जिल्हा हा गुजरातमधील नव्याने निर्मित झालेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे, असे सांगून या जिल्ह्याने साधलेल्या लक्षणीय विकासामुळे आनंद होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

|

कृषी क्षेत्रात मूल्यवर्धन होण्याची गरज असल्याचे सांगून प्रति माणसी दुध उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
India’s urban boom an oppurtunity to build sustainable cities: Former housing secretary

Media Coverage

India’s urban boom an oppurtunity to build sustainable cities: Former housing secretary
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 जुलै 2025
July 13, 2025

From Spiritual Revival to Tech Independence India’s Transformation Under PM Modi