We must demonstrate strong collective will to defeat terror networks that cause bloodshed and spread fear: PM
Silence and inaction against terrorism in Afghanistan and our region will only embolden terrorists and their masters: PM Modi
We should all work to build stronger positive connectivity between Afghanistan and other countries of the region: PM Modi
On India’s part, our commitment to our brave Afghan brothers and sisters is absolute and unwavering: PM Modi
The welfare of Afghanistan and its people is close to our hearts and minds: PM Modi
We also plan to connect Afghanistan with India through an air transport corridor: Prime Minister Modi

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष, महामहिम, डॉ.मोहंमद अश्रफ घनी, अफगाणिस्तानचे पराष्ट्र व्यवहार मंत्री सलाहुद्दीन रब्बानी, मंत्रिमंडळातले माझे सहकारी अरुण जेटली, परराष्ट्र व्यवहार मंत्री, शिष्टमंडळाचे प्रतिनिधी, पुरुष आणि महिला वर्ग,

नमस्कार, सत श्री अकाल

हार्ट ऑफ आशिया, अफगाणिस्तानसंदर्भातली इस्तंबूल प्रोसेस, 6 व्या मंत्रीस्तरीय परिषदेच्या उदघाटन सत्रात आपले विचार मांडायची संधी मिळणे हा सन्मान आहे. आपले मित्र आणि भागीदार, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्यासमवेत या परिषदेचे संयुक्त उदघाटन करणे ही विशेष आनंदाची बाब आहे. माझे निमंत्रण स्वीकारून या परिषदेला उपस्थित राहून परिषदेची शोभा वाढवल्याबद्दल घनी यांचे मी आभार मानतो.

सुवर्ण मंदिराबरोबरच साधेपणा, सौदर्य, आणि अध्यात्म यांचा वसा लाभलेल्या अमृतसरमधे तुम्हा सर्वांचे स्वागत करताना मला अधिकच आनंद होत आहे. शीख गुरुनी पवित्र केलेले हे ठिकाण शांतता आणि मानवतेचे प्रतीक आहे, जनतेसाठी, सर्व धर्मांसाठी खुले आहे. इथले रस्ते, बागा आपल्याला थोर पराक्रम आणि महान त्यागाच्या कहाण्या सांगतात.

इथल्या रहिवाशांनी आपल्या जाज्वल्य देशभक्ती आणि निःस्वार्थी परोपकारी वृत्तीने शहराची जडणघडण केली आहे. उद्यमशीलता, सृजनशीलता आणि कठोर परिश्रमाने अमृतसरने, अफगाणिस्तानबरोबरचे जुने संबंध आणि स्नेह जोपासला आहे. पहिले शीख गुरु,बाबा गुरु नानक देव जी यांच्या शिष्यात अफगाणीचा समावेश होता, ज्यांनी 15 व्या शतकात काबूलमध्ये उपदेश केला.

अफगाणी मूळ असलेले सुफी संत बाबा हजरत शेख यांचा पंजाबमध्ये असलेला दर्गा आजही अफगाणिस्तानमधल्या लोकांसह सर्व पंथासाठी वंदनीय आहे.

माणसाची ये-जा, व्यापाराचा ओघ या सर्वांचा तिठा म्हणजे अमृतसरमधला ग्रँड ट्रंक रोड, हा रस्ता म्हणजे जणू काही आशियाची सर्वात जुनी आणि सर्वात मुख्य धमनीच आहे. अफगाणिस्तानचा विकास, आर्थिक प्रगती आणि स्थैर्य यासाठी मोलाचे असणारे दळणवळण अमृतसर मजबूत करते.

महामहिम, उपस्थित स्त्री-पुरुषहो,

या शतकाच्या सुरवातीला आंतरराष्ट्रीय समूह व्यापक प्रमाणात अफगाणिस्तानशी संलग्न राहिला.

जगातल्या प्रमुख सत्ता, संबंधित देशांनी राजकीय, सामाजिक, लष्करी, आर्थिक, तसेच विकासात्मक बहुविध कार्यक्रमाद्वारे अफगाणिस्तानला सहकार्य केले.

आज इथे जमलेले सर्वजण, अफगाणिस्तानमधल्या राजकीय स्थैर्य आणि चिरकालीन शांततेसाठी कटिबद्धताच दृढ करत आहेत. हे अपूर्ण कार्य प्रगतीपथावर नेण्यासाठी आपली कृती आणि वक्तव्य केंद्रित असले पाहिजे.

आणि अफगाणिस्तानच्या मदतीसाठी :

* सामाजिक,राजकीय आणि संस्थागत वीण निर्माण करून ती मजबूत करेल ;

* त्यांचा प्रदेश तसेच नागरिकांचे बाह्य धोक्यापासून संरक्षण करेल,

* त्यांच्या आर्थिक तसेच विकासात्मक घडामोडीना चालना देईल ,

* त्यांच्या जनतेच्या उज्वल भविष्यासाठी कार्यरत राहते .

” समस्यांचे निराकरण; समृद्धी प्राप्त करणे” ही या परिषदेची संकल्पना तिचा उद्देश निश्चितच स्पष्ट करते. आव्हानांच्या व्याप्तीची आम्हाला निश्चितच जाणीव आहे. मात्र यशस्वी होण्याचा आमचा निर्धार आहे.

आमच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम संमिश्र आहे .काही महत्वपूर्ण यश नक्कीच प्राप्त झाले आहे मात्र अजूनही बरेच करायचे बाकी आहे.

आपल्या निर्धारावर ठाम राहून प्रयत्न सुरु ठेवणे ही आताच्या घडीची गरज आहे. गत 15 वर्षात जे कमावले आहे ते राखून पुढे जावे लागेल, कारण केवळ अफगाणिस्तानच्या भविष्याचा हा प्रश्न नाही तर संपूर्ण प्रांताच्या शांतता आणि स्थैर्याशी निगडित आहे.

अफगाणिस्तानमध्ये तिथले नागरिक शांतता आणि आर्थिक विकासात स्वयंपूर्ण होण्यासाठी, आपण आणखी काय करायला हवे आहे आणि काय टाळायला हवे आहे हे कृतीतून तातडीने प्रतिबिंबित करू या. उत्तरे तिथेच आहेत. प्रश्न आहे तो निर्धार आणि कृतीचा आणि अफगाणिस्तान आणि तिथल्या जनतेला प्राधान्य देण्याचा. यासाठी सर्वप्रथम अफगाणची स्वतःची, अफगाण नियंत्रित प्रक्रिया ही गुरुकिल्ली आहे. समस्यांच्या चिरकालीन तोडग्याची ती हमी आहे. दुसरे म्हणजे रक्तपात आणि दहशत पसरवणारे दहशतवादाचे जाळे उखडून टाकण्यासाठी आपण सर्वानी दृढ एकत्रित इच्छा प्रदर्शित केली पाहिजे.

दहशतवाद आणि अस्थिरतेसाठी मिळणारी बाह्य चिथावणी हा अफगाणिस्तानच्या शांतता, स्थैर्य आणि भरभराटीसाठी असणारा सर्वात मोठा धोका आहे. वाढत्या दहशतवादी हिंसाचाराने संपूर्ण प्रदेशालाच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये शांतता नांदावी यासाठी केवळ शाब्दिक पाठिंबा उपयोगाचा नाही. त्याला कठोर कृतीची जोड हवी. फक्त दहशतवादाविरोधात ही कृती पुरेशी नाही तर जे दहशतवादाला पोसतात, त्याला आसरा देतात, प्रशिक्षण देतात, आर्थिक पाठबळ पुरवतात त्यांच्या विरोधातही कारवाई हवी.

अफगाणिस्तान आणि आपल्या प्रदेशातल्या दहशतवादाविरोधातले मौन आणि निष्क्रियता यामुळे दहशतवादी आणि त्यांच्या सूत्रधारांचे दुःसाहस वाढेल. तिसरे म्हणजे अफगाणिस्तानच्या विकासासाठी आणि मानवी गरजांसाठी सामग्री साहाय्य करण्यासाठीची आपली द्विपक्षीय आणि प्रादेशिक कटिबद्धता जारी ठेवून त्यात वाढ करायला हवी.

अफगाणिस्तानमधे आपले सहकार्यात्मक प्रयत्न हे त्या देशाच्या पायाभूत सुविधा आणि संस्थागत क्षमता तसेच स्वयंपूर्ण विकासात योगदान देणारे असावेत.

चौथे, अफगाणिस्तान आणि या प्रदेशातल्या इतर राष्ट्रांबरोबर मजबूत आणि सकारात्मक दळणवळण निर्माण करण्यासाठी आपण सर्वानी काम करायला हवे.

दळणवळण जाळ्याच्या परिघावर नव्हे तर केंद्रस्थानी अफगाणिस्तान हवा. दक्षिण आशिया आणि मध्य आशिया यांच्यातले दळणवळण संबंध मजबूत करणारे केंद्र म्हणून आम्ही अफगाणिस्तानकडे पाहतो.

प्रादेशिक व्यापार, बाजारपेठानी जास्तीतजास्त जोडला गेलेला अफगाणिस्तान म्हणजे त्या देशाचा विकास आणि प्रगतीची हमी. आपल्या भागातल्या इतर भागीदारांसमवेत व्यापार आणि वाहतूक संबंध मजबूत करण्याला प्राधान्य देण्याबाबत मी आणि राष्ट्राध्यक्ष घनी एकत्र आलो आहोत.

महामहिम, महिला आणि पुरुषहो

शूर अफगाणी बंधू-भगिनीप्रती भारताची कटिबद्धता संपूर्ण आणि अढळ आहे. अफगाणिस्तान आणि तिथल्या जनतेचे कल्याण यांना आमच्या मनात निकटचे स्थान आहे.

अफगाणिस्तानमधल्या मोठ्या तसेच लहान प्रकल्पातली आमची यशस्वी भागीदारी यासंदर्भात बोलकी आहे. जनतेला केंद्र स्थानी ठेवणे हा आमच्या सहकार्याचा नेहमीच मुख्य पैलू राहिला आहे.

आमचे संयुक्त प्रयत्न :

*अफगाणिस्तानच्या युवा पिढीला शिक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याची जोपासना

*आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातही सुधारणा

*पायाभूत सुविधा आणि संस्था उभारणी आणि

*अफगाणिस्तानमधल्या व्यापारी आणि लघु व्यावसायिकांना भारतातल्या वाणिज्यिक आणि आर्थिक संधींशी जोडण्यासाठी

काही महिन्यापूर्वी उदघाटन झालेले भारत-अफगाणिस्तान मैत्री धरण, जे सलमा धरण म्हणूनही ओळखले जाते, या धरणामुळे तिथल्या जनतेच्या आर्थिक विकासाला पुनरुज्जीवन मिळेल.

अफगाणिस्तानमधले संसद भवन, अफगाणिस्तानच्या लोकशाहीच्या भविष्याविषयी आमची दृढ कटिबद्धता दर्शवते. झेरांज – देलेराम महामार्ग आणि चाबहार बंदराविषयी भारत-अफगाणिस्तान-इराण सहकार्य यामुळे अफगाणिस्तानला आपली अर्थव्यवस्था, दक्षिण आशियातल्या मजबूत आर्थिक विकास केंद्रांशी जोडता येणार आहे. हवाई वाहतूक कॉरिडॉरमार्फत भारताशी अफगाणिस्तानला जोडण्याचा आमचा विचार आहे.

उभय देशातले सहकार्य आणखी घनिष्ठ करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष घनी आणि मी अतिरिक्त उपाययोजनांची चर्चा केली. अफगाणिस्तानमधे क्षमता वृद्धीसाठी भारताने राखून ठेवलेल्या अतिरिक्त 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा उपयोग करण्यासाठी विकासात्मक आराखडा तयार करण्यात आम्ही प्रगती करत आहोत.

जल व्यवस्थापन, आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि कौशल्य विकास यासारख्या क्षेत्रात सहकार्याचा विस्तार केला जाईल. आपली अतिरिक्त बांधिलकी भारत जपत असतानाच अफगाणिस्तानच्या विकासासाठी समविचारी भागीदारांसमवेत काम करण्याची भारताची तयारी आहे.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या ब्रसेल्स परिषद आणि यावर्षी झालेल्या नाटोच्या वॉर्सा परिषदेतल्या आंतरराष्ट्रीय प्रतिबद्धतेची दखल घेताना आम्हाला आनंद होत आहे.

अफगाणिस्तानला मदत करण्याची आमची आकांक्षा आणि निष्ठा वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.

महामहिम आणि उपस्थित स्त्री-पुरुषहो,

अफगाणिस्तानमध्ये यशस्वी राजकीय, आर्थिक संक्रमणासाठी आपण केलेली मदत म्हणजे आपल्या प्रदेशात आणि जगातही शांतता नांदण्यासाठी आपणच आपल्याला मदत करत आहोत ही बाब लक्षात घ्यायला हवी. तुमची चर्चा, कृतीसाठी, भरीव आणि भविष्यासाठी मार्गदर्शन करणारा असा मार्ग दाखवेल अशी आशा मी करतो :

*संघर्षाच्या ठिकाणी सहकार्याला प्रोत्साहन देईल,

* गरजेच्या जागी विकास आणि दहशतवादाच्या ठिकाणी सुरक्षितता
अफगाणिस्तान, शांततेचे भौगोलिक ठिकाण व्हावे यासाठी पुन्हा कटिबद्ध होऊ या. असे ठिकाण जिथे शांतता नांदते, जिथे प्रगती आणि भरभराट कायम राहते आणि लोकशाही आणि बहुविधता विजयी होते.

धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage