Film and society are a reflection of each other: PM Modi
New India is confident and capable of taking issues head on and resolving them: PM Modi
Indian Cinema has a big role in enhancing India’s soft power: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्‌घाटन केले.

राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री कर्नल (निवृत्त) राज्यवर्धन राठोड आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

तरुण पिढीला भारतीय सिनेमाबाबत जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी उत्तम संधी, भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयामुळे उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले. भारतीय मनोरंजन उद्योगाच्या इतिहासावरील सविस्तर माहिती, या क्षेत्रातील व्यक्तींच्या गोष्टी, संघर्ष यांची सविस्तर माहिती या संग्रहालयात असेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

चित्रपट आणि समाज एकमेकांची प्रतिबिंब असतात, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. समाजात जे काही घडते त्याचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये दिसून येते तसेच चित्रपटातल्या प्रतिमा समाजात दिसून येतात, असे ते म्हणाले.

सध्या पूर्वीच्या तुलनेत असे अनेक चित्रपट आहेत, ज्यात समस्या आणि त्यावरील तोडगा दोन्हीही दर्शवलेले असते, हे सकारात्मकतेचे चिन्ह आहे. पूर्वी बऱ्याचदा अगतिकताच दाखवली जायची, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांवर स्वत:च तोडगा काढण्याचा आत्मविश्वास आता भारताकडे आहे. समस्या सोडवण्याची क्षमता आणि आत्मविश्वास असलेल्या नवभारताचे हे द्योतक आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भारतीय सिनेमाची वैश्विक व्यापकता अधोरेखित केली. यासंदर्भात भारतीय गाणीही गाऊ शकणाऱ्या विविध जागतिक नेत्यांसोबतच्या संवादाचा त्यांनी उल्लेख केला.

तरुण पिढीच्या कल्पनांना अचूक पकडणाऱ्या व्यक्तिरेखा निर्माण केल्याबद्दल पंतप्रधानांनी चित्रपट उद्योगाचे कौतुक केले. या व्यक्तिरेखा वैश्विक स्तरावर भावत असल्यामुळे भारतीय युवापिढी केवळ बॅटमॅनचीच चाहती न राहता बाहुबलीचीही चाहती झाली, असे त्यांनी सांगितले.

भारताची सुप्त शक्ती वृद्धिंगत करण्यात तिची विश्वासार्हता आणि जगभरात भारताचा ब्रँड पोहोचवण्यात भारतीय चित्रपटांची मोठी भूमिका राहिल्याचे पंतप्रधान म्हणाले. चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक मुद्दे जसे की, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, खेळ इत्यादी लोकांपर्यंत पोहोचत आहेत, असे त्यांनी सांगितले. राष्ट्र उभारणीत आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही भावना वृद्धिंगत करण्यात चित्रपट महत्वाची भूमिका बजावतात.

देशाच्या पर्यटन क्षेत्राच्या विकासात योगदान देण्याची मोठी क्षमता चित्रपट उद्योगात असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

देशाच्या विविध भागात चित्रिकरणांच्या मंजुरीसाठी एकल खिडकी मंजुरी यंत्रणेद्वारे, चित्रपट निर्मिती सुलभ करण्याची सुविधा पुरवण्याकरीता सरकार काम करत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. चित्रपट पायरसीच्या समस्येला आळा घालण्याकरीता सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 मध्ये सुधारणा करण्यासंदर्भात सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस, गेमिंग आणि कॉमिक्स यातील उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय केंद्र स्थापन करण्यासाठी सरकार काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. संज्ञापन आणि मनोरंजन यासाठी पूर्णपणे समर्पित विद्यालय ही काळाची गरज असून, त्यासाठी सूचना आणि योगदान देण्याचे आवाहन त्यांनी चित्रपटकर्मींना केले.

दावोस परिषदेप्रमाणे भारतीय चित्रपटांसाठी बाजारपेठ विस्तारण्यावर लक्ष्य केंद्रित करणारी जागतिक चित्रपट परिषद भरवण्याची संकल्पनाही पंतप्रधानांनी यावेळी सुचवली.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

Prime Minister visited the Indian Arrival monument at Monument Gardens in Georgetown today. He was accompanied by PM of Guyana Brig (Retd) Mark Phillips. An ensemble of Tassa Drums welcomed Prime Minister as he paid floral tribute at the Arrival Monument. Paying homage at the monument, Prime Minister recalled the struggle and sacrifices of Indian diaspora and their pivotal contribution to preserving and promoting Indian culture and tradition in Guyana. He planted a Bel Patra sapling at the monument.

The monument is a replica of the first ship which arrived in Guyana in 1838 bringing indentured migrants from India. It was gifted by India to the people of Guyana in 1991.