पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्ण झालेल्या भागाचे उद्घाटन झाले. नव्याने सुरू झालेल्या या सेवेचे उद्घाटन आणि पाहणी केल्यानंतर लगेचच, पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत मेट्रोतून प्रवास केला.
“अत्याधुनिक अशा कानपूर मेट्रोतून प्रमुख विकास कामांच्या शुभारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जात आहे,” असे ट्विट पंतप्रधानांनी मेट्रोत बसल्यानंतर केले. पंतप्रधान मोदींनी आयआयटी मेट्रो स्टेशन पासून गीता नगरपर्यंत मेट्रोतून प्रवास केला.
कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्ण झालेल्या भागाचे उद्घाटन हे शहरातील वाहतूक अधिक जलद होण्यासाठी आणि कानपूरच्या लोकांचे जीवनमान अधिक सुकर करण्यासाठी उचललेले एक पाऊल आहे.
On board the state of the art Kanpur metro. Heading to the programme where key development works will be launched. pic.twitter.com/vnlVGPqTAm
— Narendra Modi (@narendramodi) December 28, 2021