आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आरोग्यविषयक कार्यक्रम आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राचे उद्घाटन करून शुभारंभ केला. छत्तीसगडमधल्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी बिजापूर जिल्ह्यात ‘जांगला विकास हब’मध्ये या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
सुमारे एक तासाच्या अवधीत पंतप्रधानांनी अनेक जणांशी संवाद साधला तसेच या विकास हबमधल्या विविध विकासात्मक उपक्रमांबाबत माहितीही घेतली.
या आरोग्य आणि कल्याण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी ‘आशा’ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आदर्श आंगणवाडी केंद्राला भेट देऊन त्यांनी आंगणवाडी कार्यकर्ते आणि पोषण अभियानाच्या लाभार्थी बालकांशीही संवाद साधला. ‘हाट आरोग्य किओस्कर’ला भेट देऊन आरोग्य कार्यकर्त्यांशी पंतप्रधानांनी बातचीत केली. मुद्रा योजनेअंतर्गत निवडक लाभार्थींना त्यांनी कर्जमंजुरी पत्रांचं वाटप केले आणि जांगला येथे बँक शाखेचे उद्घाटनही केले. ग्रामीण बीपीओ कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
त्यानंतर पंतप्रधानांनी जनसभेला संबोधित केले. आदिवासी जमातींच्या सबलीकरणासाठी जन धन योजनेचा प्रारंभ पंतप्रधानांनी केला. या योजनेअंतर्गत किरकोळ वन उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत आणि मूल्य साखळी विकासाद्वारे विपणन यंत्रणा अंतर्भूत आहे.
भानूप्रतापपूर-गुड्म रेल्वे मार्गाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग त्यांनी लोकार्पण केले. दाल्लीराजहारा आणि भानूप्रतापपूर दरम्यानच्या रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. बिजापूर रुग्णालयात त्यांनी डायलिसीस केंद्राचे उद्घाटन केले.
नक्षल प्रभावित भागात पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत 1988 किलोमीटरच्या रस्ते बांधकामाचे नक्षल प्रभावित भागांना जोडणाऱ्या इतर रस्ते प्रकल्प, बिजापूर येथे पाणीपुरवठा योजना आणि दोन पुलांचे त्यांनी भूमीपूजन केले.
जनसभेला संबोधित करताना ब्रिटीश साम्राज्य वादाविरोधात लढा देताना या भागात हौतात्म्य पत्करलेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.
छत्तीसगडमधून केंद्र सरकारने याआधी शामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन आणि प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या दोन महत्त्वाकांक्षी विकास योजनांचा शुभारंभ केला. आज आयुष्मान भारत आणि ग्राम स्वराज अभियानाचा या राज्यातून प्रारंभ होत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारने गेल्या चार वर्षात राबवलेल्या विकासविषयक सर्व उपक्रमांचे लाभ, समाजातल्या गरीब आणि वंचितापर्यंत पोहोचण्याची खातरजमा ग्रामस्वराज अभियानाद्वारे केली जात आहे. करोडो लोकांच्या मनात आकांक्षा फुलवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
विकासाच्या प्रवासात मागे राहिलेल्या आणि आता हा अनुशेष भरून काढण्यासाठी निवडलेल्या देशातल्या 100 विकासाकांक्षी जिल्ह्यापैकी, बिजापूर हा एक जिल्हा आहे. या जिल्ह्यांची मागास ही ओळख पुसून त्यांचे महत्त्वाकांक्षी जिल्ह्यात रुपांतर करण्याची आपली आकांक्षा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हे जिल्हे आता मागास राहणार नाहीत अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनता या सर्वांनी या सामूहिक चळवळीत आपले योगदान दिले तर अभूतपूर्व यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या 115 जिल्ह्यांप्रती सरकारने आगळा दृष्टीकोन अंगीकारला आहे. या प्रत्येक जिल्ह्याला स्वत:ची वेगळी आव्हाने आहेत म्हणूनच या प्रत्येक जिल्ह्यांप्रती वेगवेगळ्या धोरणाची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
‘आयुष्मान भारत’ योजनेमुळे देशात सामाजिक न्यायाची खातरजमा होण्याबरोबरच सामाजिक असमतोल नष्ट होईल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्राथमिक आरोग्य सुविधात परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. देशातील दीड लाख प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे आता आरोग्य आणि कल्याण केंद्रे म्हणून विकसित केली जातील. 2022 पर्यंत हे साध्य करण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे. ही केंद्र, गरीबांसाठी फॅमिली डॉक्टरप्रमाणे काम करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
गरीबांना वैद्यकीय उपचाराकरीता पाच लाखापर्यंत वित्तीय सहाय्य करणे हे आयुष्मान भारताचे यापुढचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.
गेल्या 14 वर्षात मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी राज्यात केलेल्या विकास कामांबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांची प्रशंसा केली. सुकमा, दंतेवाडा आणि बिजापूर या दक्षिणी जिल्ह्यातल्या विकास उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली.
आर्थिक केंद्र म्हणून बस्तर लवकरच ओळखले जाईल. प्रादेशित असमतोल दूर करण्यासाठी दळणवळण सुविधांच्या महत्वावर त्यांनी भर दिला. यासंदर्भात, त्यांनी आजच्या दळणवळण प्रकल्प शुभारंभाचा उल्लेख केला.
केंद्र सरकारेन घेतलेले निर्णय आणि उपक्रम समाजाच्या गरीब आणि दुर्बल घटकांप्रती सरकारच्या कटिबद्धतेचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात, आदिवासी जमातींच्या लाभासाठीच्या जन धन योजनेचा त्यांनी उल्लेख केला. स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ-बेटी पढाओ, उज्ज्वला योजना यासारख्या योजनांमुळे महिला वर्गाचा लाभ झाला आहे.
लोकसहभाग ही सरकारची शक्ती असून ही शक्ती 2022 पर्यंत न्यू इंडिया अर्थात नव भारत निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
14 अप्रैल का आज का दिन देश के सवा सौ करोड़ लोगों के लिए बहुत महत्वपूर्ण है। आज भारत रत्न बाबा साहब भीमराव आंबेडकर की जन्म जयंती है। आज के दिन आप सभी के बीच आकर आशीर्वाद लेने का अवसर मिलना, मेरे लिए बहुत सौभाग्य की बात है: PM
— PMO India (@PMOIndia) April 14, 2018
विकास की दौड़ में पीछे छूट गए और पीछे छोड़ दिए गए समुदायों में आज जो चेतना जागी है, वो चेतना बाबा साहब की ही देन है। एक गरीब मां का बेटा, पिछड़े समाज से आने वाला आपका ये भाई अगर आज देश का प्रधानमंत्री है, तो ये भी बाबा साहेब की ही देन है: PM
— PMO India (@PMOIndia) April 14, 2018
आज बाबा साहेब की प्रेरणा से, मैं बीजापुर के लोगों में, यहां के प्रशासन में, यही भरोसा जगाने आया हूं। ये कहने आया हूं कि केंद्र की आपकी सरकार, आपकी आशाओं-आकांक्षाओं, आपकी ‘aspirations’ के साथ खड़ी है: PM
— PMO India (@PMOIndia) April 14, 2018
स्वतंत्रता के बाद, इतने वर्षों में भी ये जिले पिछड़े बने रहे, इसमें उनकी कोई गलती नहीं। बाबा साहेब के संविधान ने इतने अवसर दिए, आगे बढ़ने के लिए प्रेरित किया, लेकिन फिर भी बीजापुर जैसे जिले, विकास की दौड़ में पीछे क्यों छूट गए?: PM
— PMO India (@PMOIndia) April 14, 2018
क्या इन जिलों में रहने वाली माताओं को ये अधिकार नहीं था, कि उनके बच्चे भी स्वस्थ हों, उनमें खून की कमी न हो, उनकी ऊँचाई ठीक से बढ़े?
— PMO India (@PMOIndia) April 14, 2018
क्या इन जिलों के लोगों ने, आपने, देश से ये आशा नहीं रखी थी उन्हें भी विकास में साझीदार बनाया जाए?: PM
क्या इन क्षेत्रों के बच्चों को, बेटियों को, पढ़ाई का, अपने कौशल के विकास का अधिकार नहीं था, उम्मीद नहीं थी?: PM
— PMO India (@PMOIndia) April 14, 2018
मैं आज इसलिए आया हूं, ताकि आपको बता सकूं, कि जिनके नाम के साथ पिछड़ा जिला होने का लेबल लगा दिया गया है, उनमें अब नए सिरे से, नई सोच के साथ बड़े पैमाने पर काम होने जा रहा है।
— PMO India (@PMOIndia) April 14, 2018
मैं इन 115 Aspirational Districts को सिर्फ आकांक्षी नहीं, महत्वाकांक्षी जिले कहना चाहता हूं: PM
तीन महीने का हमारा अनुभव कहता है कि अगर जिले के सभी लोग, जिले का प्रशासन, जिले के जन प्रतिनिधि, हर गली-मोहल्ला,गांव, इस अभियान में साथ आ जाए, एक जनआंदोलन की तरह हम सब इसमें योगदान करें, तो वो काम हो सकता है, जो पिछले 70 वर्षों में नहीं हुआ: PM
— PMO India (@PMOIndia) April 14, 2018
आयुष्मान भारत योजना के पहले चरण को शुरू किया गया है जिसमें प्राथमिक स्वास्थ्य से जुड़े विषयों में बड़े बदलाव लाने का प्रयास किया जाएगा। देश की हर बड़ी पंचायत में, लगभग डेढ़ लाख जगहों पर सब सेंटर और प्राइमरी हेल्थ सेंटर्स को हेल्थ एंड वेलनेस सेंटर के रूप में विकसित किया जाएगा: PM
— PMO India (@PMOIndia) April 14, 2018
कुछ देर पहले मुझे यहां के जिला अस्पताल में डायलिसिस यूनिट का शुभारंभ करने का अवसर मिला।प्रधानमंत्री डायलिसिस योजना के तहत अब देश के 500 से ज्यादा अस्पतालों में मुफ्त डायलिसिस की सुविधा उपलब्ध कराई जा रही है। इसका लाभ लगभग ढाई लाख मरीज उठा चुका हैं: PM
— PMO India (@PMOIndia) April 14, 2018
बस्तर नेट परियोजना के माध्यम से 6 जिलों में लगभग 400 किलोमीटर लंबा ऑप्टिकल फाइबर नेटवर्क बिछाया गया है। मुझे अभी जांगला के ग्रामीण बीपीओ में भी दिखाया गया है कि कैसे इसका इस्तेमाल लोगों की आय तो बढ़ाएगा ही, उनकी जिंदगी को आसान बनाने का भी काम करेगा: PM
— PMO India (@PMOIndia) April 14, 2018
आज मुझे सविता साहु जी के ई-रिक्शा पर सवारी का अवसर भी मिला। सविता जी के बारे में मुझे बताया गया कि उन्होंने नक्सली - माओवादी हिंसा में अपने पति को खो दिया था। इसके बाद उन्होंने सशक्तिकरण का रास्ता चुना, सरकार ने भी उनकी मदद की और अब वो एक सम्मान से भरा हुआ जीवन जी रही हैं: PM
— PMO India (@PMOIndia) April 14, 2018