Metro in Delhi has positively impacted the lives of citizens: PM Modi
There is a direct link between connectivity and development; Metro will mean more employment opportunities for the people: PM
Union Government has brought out a policy relating to Metros, to bring uniformity and standardization in metro rail networks across the country: PM
Our aim is also to boost “Make in India” by making metro rail coaches in India itself: PM Modi
Metro systems are an example of cooperative federalism, the Centre and the respective State Govts are working together: PM Modi
New India requires new and smart infrastructure, Union Government is working on roads, railways, highways, airways, waterways and i-ways: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहादूरगड-मुंडका मेट्रो मार्गाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटन केले. दिल्ली मेट्रोच्या या नव्या भागाच्या उद्‌घाटनाच्या वेळी त्यांनी हरियाणा आणि दिल्लीच्या जनतेचे अभिनंदन केले. बहादूरगड, दिल्ली मेट्रोशी जोडले गेल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. गुरुग्राम आणि फरिदाबादनंतर हरियाणातले हे तिसरे ठिकाण आता दिल्ली मेट्रोशी जोडले गेले आहे.

दिल्लीमधल्या मेट्रोसेवेमुळे तिथल्या नागरिकांच्या जीवनावर झालेल्या सकारात्मक परिणामाबाबत पंतप्रधानांनी भाष्य केले. बहादूरगडमधे झपाट्याने आर्थिक विकास पहायला मिळत असून इथे अनेक शैक्षणिक केंद्रेही आहेत, याशिवाय इथले विद्यार्थी दिल्लीलाही शिक्षणासाठी येतात, त्यांच्यासाठी मेट्रो सोयीची ठरणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

कनेक्टिव्हिटी अर्थात दळणवळणाची साधने आणि विकास यांचा थेट संबंध आहे. मेट्रो म्हणजे त्या भागातल्या जनतेसाठी रोजगाराच्या अधिक संधी असे पंतप्रधान म्हणाले.

देशभरातल्या मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये एकसूत्रता आणि प्रमाणिकरणासाठी केंद्र सरकारने मेट्रो रेल्वेसंदर्भात एक धोरण केले आहे. आपल्या शहरांमधे सोयीची, आरामदायी आणि किफायतशीर नागरी वाहतूक यंत्रणा उभारणे हा या मागचा उद्देश आहे. मेट्रो रेल्वेच्या डब्यांची भारतात निर्मिती करुन मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्याचा हेतू असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

मेट्रो व्यवस्था निर्मितीची प्रक्रिया ही सहकार्यात्मक संधीयवादाशी जोडली गेली आहे. भारतात ज्या शहरात मेट्रो बांधण्यात येत आहेत, तिथे केंद्र आणि संबंधित राज्य एकत्र येऊन काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

नव्या भारतासाठी नव्या आणि स्मार्ट पायाभूत सुविधांची गरज आहे, असे सांगून केंद्र सरकार, रस्ते, रेल्वे, महामार्ग, हवाई, जलमार्ग आणि आय-वे साठी काम करत आहे. दळणवळणावर भर देण्यात आला असून, विकास प्रकल्प नियोजित वेळेतच पूर्ण करण्यावर सरकारचा कटाक्ष आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

Prime Minister Shri Narendra Modi met with the Prime Minister of Dominica H.E. Mr. Roosevelt Skeritt on the sidelines of the 2nd India-CARICOM Summit in Georgetown, Guyana.

The leaders discussed exploring opportunities for cooperation in fields like climate resilience, digital transformation, education, healthcare, capacity building and yoga They also exchanged views on issues of the Global South and UN reform.