2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाला पक्के घर देण्याचे माझे स्वप्न : पंतप्रधान मोदी
एप्रिल 2019 ते मार्च 2020 हा कालावधी बांधकाम तंत्रज्ञान वर्ष म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधान मोदी म्हणतात की घर म्हणजे फक्त भिंतींच नाही, तर स्वप्न पाहण्याची शक्ती आणि आकांक्षा पूर्ण होण्याची जागा असते
गेल्या चार वर्षांत घरे आणि घरांसाठीच्या जागेचा दर्जा सुधारला आहे :पंतप्रधान नरेंद्र मोदी
सरकारने 1.3 कोटी घर बांधले आहेत आणि मागील सरकारने केवळ 25 लाख घर बनवले आहेतः पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आज  विज्ञान भवन येथे बांधकाम तंत्रज्ञान भारत कार्यक्रम २०१९ ला संबोधित केले. 
प्रत्येक कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार करण्याच्या केंद्र सरकारच्या कटिबद्धतेवर पंतप्रधानांनी भर दिला.
भारतात वेगाने होत असलेले शहरीकरण पाहता जागतिक गृहनिर्माण तंत्रज्ञानाच्या आव्हानाची गरज भासत आहे असे पंतप्रधान म्हणाले.  प्रधानमंत्री आवास योजना, हृदय आणि अमृतसह अनेक योजनामधील घटक गृहनिर्माण क्षेत्राच्या परिवर्तनासाठी आहेत असे ते म्हणाले. विविध भौगोलिक परिस्थितीशी जुळणारे तंत्रज्ञान स्वीकारणे हे एक आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.  

 पंतप्रधान म्हणाले की परवडणारी घरे, गृहनिर्माण क्षेत्र, कौशल्य विकास आणि बांधकाम तंत्रज्ञान यावर विशेष भर देण्यात आला आहे.

2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाला पक्के घर देण्याच्या आपल्या स्वप्नाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की त्यांच्या कार्यकाळात 1.3 कोटी घरे बांधण्यात आली. क्षमता वाढवण्यासाठी आणि गरीबांना मदत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी सर्वाना केले.

 सरकार कर आणि अन्य प्रोत्साहनांच्या माध्यमातून लोकांना घराची खरेदी करणे सुलभ व्हावे यासाठी  प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गृहनिर्माण (नियमन  आणि विकास ) कायदा , (रेरा) ने ग्राहकांचा विकसकांमधील विश्वास वाढवला आहे आणि गृहनिर्माण क्षेत्रात पारदर्शकता आणली आहे. 

 

ते म्हणाले की  विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात आले आहे. बांधकाम क्षेत्रात आता आपत्ती विरोधी उपाययोजना, ऊर्जा कार्यक्षमता आणि स्थानिक संशोधनावर अधिक भर दिला जात आहे असे ते म्हणाले.

 

 

जागतिक गृहनिर्माण तंत्रज्ञान आव्हान हा एक मंच आहे जो भारताच्या बांधकाम व्यवस्थेला आंतरराष्ट्रीय दर्जा गाठून देण्यात सहाय्य करेल असे पंतप्रधान म्हणाले. 
एप्रिल  2019 ते मार्च 2020 हा कालावधी बांधकाम तंत्रज्ञान वर्ष म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Andhra Pradesh meets Prime Minister
December 25, 2024

Chief Minister of Andhra Pradesh, Shri N Chandrababu Naidu met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister's Office posted on X:

"Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn, met Prime Minister @narendramodi

@AndhraPradeshCM"