नागरी हवाई क्षेत्रासाठी प्रादेशिक दळणवळण योजना उडानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिमला विमानतळावर उद्घाटन केले. या योजनेअंतर्गत सिमला, नांदेड आणि कडप्पा विमानतळावरुन विमान उड्डाणे आजपासून सुरु झाली आहेत. हिमाचल प्रदेशातल्या बिलासपूर इथल्या हायड्रो इंजिनियरिंग महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभासाठी ई-फलकाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले.
सिमला विमानतळावरच्या उपस्थितांना त्याचबरोबर नांदेड आणि कडप्पा विमानतळावरच्या उपस्थितांना पंतप्रधानांनी व्हिडीओद्वारे संबोधित केले.
मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात परिवर्तन घडत असून, त्यांच्या आशा-आकांक्षा वाढत आहेत. त्यांना योग्य ती संधी मिळाल्यास ते किमया घडवू शकतात. भारतीय हवाई क्षेत्रात असंख्य संधी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘उडे देश का आम नागरिक’ अर्थात ‘उडान’ या योजनेचा उल्लेख करत हवाई प्रवास हा काही निवडक लोकांची मक्तेदारी मानली जात असे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. नव्या नागरी हवाई धोरणामुळे भारतीय जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी प्राप्त झाली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरे विकासाची इंजिने ठरत असून, या शहरांमधले वाढते हवाई दळणवळण लाभदायी ठरणार आहे. ‘उडान’ योजना हिमाचल प्रदेशातल्या पर्यटन क्षेत्रासाठी उपयोगी ठरणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
The lives of the middle class are being transformed and their aspirations are increasing. Given the right chance they can do wonders: PM
— PMO India (@PMOIndia) April 27, 2017
The aviation sector in India is filled with opportunities: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 27, 2017
Earlier aviation was considered to be the domain of a select few. That has changed now: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 27, 2017
We had the opportunity to frame a civil aviation policy, which caters to aspirations of the people of India: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 27, 2017
Tier-2 & Tier-3 cities are becoming growth engines. If aviation connectivity is enhanced in these places, it will be beneficial: PM
— PMO India (@PMOIndia) April 27, 2017
UDAN Scheme is going to help tourism sector in Himachal Pradesh: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 27, 2017