पंतप्रधानांचा वारणसी दौरा

Published By : Admin | December 29, 2018 | 17:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वारणसीला भेट दिली.

वाराणसी इथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचा अर्थात (आय आर आर आय चा) परिसर त्यांनी राष्ट्राला अर्पण केला. संस्थेच्या विविध प्रयोगशाळांनाही यावेळी पंतप्रधानांनी भेट दिली.

दीनदयाळ हस्तकला संकुलात, पंतप्रधानांनी ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ प्रदर्शनाला भेट दिली.

व्यापक निवृत्तीवेतन व्यवस्थापन योजनेचा त्यांनी प्रारंभ केला. वाराणसी इथे त्यांनी विविध प्रकल्पांचे भूमीपूजन तर काही प्रकल्पांचे लोकार्पणही केले.

आज भूमीपूजन करण्यात आलेल्या सर्वच प्रकल्पांमागे एक सामाईक संकल्पना आहे आणि ती म्हणजे ‘जीवन उंचावणे आणि व्यवसाय सुलभता’ असे पंतप्रधान म्हणाले. उत्तर प्रदेश सरकारची ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ ही योजना म्हणजे ‘मेक इन इंडिया’चा विस्तार असल्याचे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशमधे लघु आणि मध्यम उद्योग हे पंरपरेचे भाग आहेत. यासंदर्भात त्यांनी भादोई इथल्या गालिचा उद्योगाचा, मेरठ इथल्या क्रीडा साधने उद्योगाचा आणि वारणसी इथल्या रेशीम उद्योगासह इतर उद्योगांचाही उल्लेख केला. वारणसी आणि पूर्वांचल ही हस्तकला आणि कलेची केंद्रे असल्याचे ते म्हणाले. वाराणसी आणि आजुबाजुच्या परिसरातल्या दहा उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. 

एक जिल्हा, एक उत्पादन योजनेच्या माध्यमातून, उत्तम यंत्रे, प्रशिक्षण आणि विपणन सहाय्याद्वारे या कलांचे फायदेशीर व्यापारात रुपांतर होईल असे पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमादरम्यान 2000 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला देण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले.

उत्पादन निर्मात्यांना सर्वसमावेशक उपयायोजना पुरवण्यावर या योजनेत भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दीनदयाळ हस्तकला संकूल आपले उद्दिष्ट आता पूर्ण करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि व्यवसाय सुलभेतसाठी केंद्र सरकार काम करत आहे.

आज सुरु करण्यात आलेल्या सिस्टिम फॉर ॲथॉरिटी ॲन्ड मॅनेजमेंट ऑफ पेन्शन, ‘संपन्न’ या यंत्रणेमुळे दूरसंवाद क्षेत्रातल्या निवृत्ती वेतनधारकांना मोठी मदत होणार असून यामुळे निवृत्ती वेतनाचे वेळेवर वितरण होण्यासाठी मदत होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

नागरिक केंद्रीय सेवा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात आणि जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार तंत्रज्ञानाचा उपयोग करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. टपाल कार्यालयांद्वारे बँकींग सेवांचा विस्तार करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा उपयोग करण्यात येत आहे. 

ग्रामीण भागातल्या जनतेला डिजिटल माध्यमातून सेवा पुरविण्यासाठी तीन लाख सामाईक सेवा केंद्रांचे जाळं उपयुक्त ठरत आहे. देशातल्या इंटरनेट जाळ्याची व्यापकता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

 

देशातल्या एक लाख पंचायत ब्रॉडबॅन्डच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. डिजिटल इंडिया, जनतेचे जीवन सुलभ करण्याबरोबरच सरकारी कामाकाजात पारदर्शकता आणणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठीही उपयुक्त ठरत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

यासंदर्भात त्यांनी सरकारच्या ई बाजारापेठांचा उल्लेख केला. एमएसएमई अर्थात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी या ई बाजारपेठा अतिशय उपयुक्त ठरतील असे पंतप्रधान म्हणाले. एमएसएमईच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. या उद्योगांसाठी पतपुरवठा सुलभ करुन त्याद्वारे व्यवसाय सुलभता आणली जात आहे.

देशाच्या पूर्वेकडच्या भागात एलएनजी द्वारे आधुनिक सुविधा आणि उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. याचा एक फायदा म्हणजे वाराणसीतल्या हजारो घरांना आता स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध झाला आहे.

वाराणसीतल्या आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था परिसराचा उल्लेख करत, हे केंद्र म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करत शेती अधिक फायदेशीर करण्याच्या आपल्या सरकारच्या प्रयत्नांचा परिपाक आहे.

काशी नगरीचे परिर्वतन आता दृष्टीपथात आहे. यासंदर्भात आज अनावरण करण्यात आलेले विकास प्रकल्प आणखी उपयुक्त ठरतील. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जनतेचा पाठिंबा उपयुक्त ठरत आहे.

वाराणसीमध्ये आयोजित होणारा आगामी प्रवासी भारतीय दिन यशस्वी ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 

Click here to read PM's speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi