"नवीकरणीय उर्जेच्या क्षेत्रामध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठी आम्ही सहमत आहोत, आम्ही आंतरराष्ट्रीय सौर अलायन्समध्ये सौदी अरेबियाचे स्वागत करतोः पंतप्रधान मोदी "
"गेल्या आठवड्यात पुलवामा येथे झालेला भीषण दहशतवादी हल्ला मानवताविरोधी आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी "
"दहशतवादाचा ढाचा आणि दहशतवादी संघटनांचे समर्थन करणाऱ्यांचा बिमोड करणे अत्यंत महत्वाचे आहे: पंतप्रधान "

आदरणीय मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजिज सौद,

सद्देकी,

मरहबा बिकुम फिल हिंद.

 

मित्रहो,

पहिल्यांदाच भारताच्या राजकीय भेटीवर आलेले सौदी अरेबियाचे राजकुमार आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत करताना मलाअतिशय आनंद होतो आहे. भारत आणि सौदी अरब यांच्यात शतकांपूर्वीपासून आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. हेसंबंध नेहमीच सौहार्दाचे आणि मैत्रीचे राहिले आहेत. आपल्या दोन्ही देशांमधील नागरिकांचे परस्परांशी असणारे घनिष्ठ आणिनिकटचे संपर्क हा आपल्या देशासाठी एक सजीव सेतू आहे. सौदी अरबचे राजे आणि राजकुमार, आपले वैयक्तिक स्वारस्य आणिमार्गदर्शनामुळे आपल्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ, मधुर आणि सशक्त झाले आहेत. आज एकविसाव्या शतकात सौदी अरब हाभारताचा सर्वात मूल्यवान धोरणात्मक भागीदारांपैकी एक आहे. हा आमचा शेजारी देश आहे, जवळचा मित्र आहे आणि भारताच्याऊर्जा सुरक्षेचा एक महत्त्वपूर्ण स्रोत सुद्धा आहे. 2016 साली सौदी अरब येथील माझ्या दौऱ्यादरम्यान आम्ही परस्पर संबंधांनाविशेषतः ऊर्जा आणि सुरक्षा क्षेत्रात अनेक नवी पावले उचलली होती. अर्जेंटिना येथे दोन महिन्यांपूर्वी आपल्याशी झालेल्या भेटीच्यापरिणामी सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात आपल्यातील धोरणात्मक भागीदारीचा नव्याने विस्तार झाला आहे. आपल्यासुचवलेल्या  आराखड्यानुसार द्वैवार्षिक शिखर परिषद आणि धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या स्थापनेसाठी आपल्यात सहमतीझाली, याचा मला आनंद वाटतो. यामुळे आपल्यातील संबंध अधिक दृढ आणि गतिमान होतील, तसेच त्यांना प्रगतीचे लाभ प्राप्तहोतील.

मित्रहो,

आज आम्ही द्विपक्षीय संबंधाशी निगडित सर्व विषयांबाबत व्यापक आणि सार्थक अशी चर्चा केली आहे. आमच्यातील परस्परआर्थिक सहकार्य नव्या उंचीवर नेण्याचा निश्चयही आम्ही केला आहे. आमच्या अर्थतंत्रात सौदी अरबमधून होणारी संस्थात्मकगुंतवणूक अधिक सुकर करण्यासाठी एक आराखडा स्थापन करण्याबाबत आमच्यात सहमती झाली आहे. भारताच्या पायाभूत सुविधाक्षेत्रात सौदी अरबच्या गुंतवणुकीचे मी स्वागत करतो.

आदरणीय महोदय,

आपले ‘व्हीजन 2030’ आणि आपल्या नेतृत्वाखाली होत असलेल्या आर्थिक सुधारणा, भारताच्या “मेक इन इंडिया” तसेच “स्टार्टअपइंडिया” सारख्या मुख्य कार्यक्रमांना पूरक आहेत. आपल्यातील ऊर्जा संबंध धोरणात्मक भागीदारीत परिवर्तित करण्याची वेळ आताआली आहे. जगातील सर्वात मोठी रिफायनरी आणि धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यामध्ये सौदी अरबची भागीदारी, आमच्यातील ऊर्जासंबंधांना विक्रेता आणि खरेदीकर्ता या नात्याच्या फार पुढे घेऊन जाणारी आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य अधिक दृढकरण्याबाबतही आमच्यात सहमती झाली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये आम्ही सौदी अरबचे स्वागत करतो. अणुऊर्जेच्याशांततापूर्ण वापरासाठी विशेषतः वॉटर डिसिमेशन आणि आरोग्यासाठी आमच्या परस्पर सहकार्यामुळे आमच्यातील संबंधांना एक नवाआयाम लाभेल. आमच्यातील धोरणात्मक वातावरणासंदर्भात आम्ही, परस्पर संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत आणि त्याचाविस्तार करण्याबाबत यशस्वी चर्चा केली आहे. गेल्या वर्षी भारताला सौदी अरबमध्ये आयोजित, प्रतिष्ठित जनाद्रियाह समारंभातगेस्ट ऑफ ऑनरचा सन्मान लाभला होता. आज आम्ही आमच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याचे ध्येय निश्चित केलेआहे. व्यापार आणि पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने सौदी अरबच्या नागरिकांसाठी ई व्हिसा सुविधेचा विस्तार केला जात आहे.भारतीयांसाठीच्या हज कोट्यामध्ये वाढ केल्याबद्दल आम्ही आदरणीय राजे आणि राजकुमार यांचे आभारी आहोत. 2.7 दशलक्षभारतीय नागरिकांचे सौदी अरबमधील शांततापूर्ण आणि उपयुक्त वास्तव्य, हा आमच्यातील एक महत्त्वपूर्ण दुवा आहे. आदरणीयराजेसाहेबांनी सौदी अरबच्या प्रगतीमध्ये त्यांच्या सकारात्मक योगदानाची प्रशंसा केली आहे. आपण नेहमीच त्यांच्या कल्याणाचीकाळजी घेतली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार आणि आशीर्वाद कायम आपल्यासोबत असतील.

मित्रहो,

मागच्या आठवड्यात पुलवामा येथे झालेला क्रूर दहशतवादी हल्ला, हे मानवताविरोधी संकटामुळे जगभर ओढवणाऱ्या समस्यांचेप्रातिनिधिक उदाहरण आहे. या संकटाशी प्रभावीपणे दोन हात करण्यासाठी, दहशतवादाला कोणत्याही प्रकारे समर्थन देणाऱ्या देशांवरसर्व प्रकारे दबाव वाढवण्याच्या आवश्यकतेबाबत आम्ही सहमत आहोत. दहशतवादाच्या पायाभूत सुविधा नष्ट करणे, त्याला मिळणारेसमर्थन समूळ नष्ट करणे तसेच दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना शिक्षा देणे, अतिशय गरजेचे आहे. त्याचबरोबरअतिरेकीवादाविरोधात सहकार्य आणि त्यासाठी एक सक्षम कार्ययोजना आवश्यक आहे, जेणेकरून हिंसा आणि दहशतवादासारख्याअपप्रवृत्ती आमच्या तरुणांची दिशाभूल करू शकणार नाहीत. सौदी अरब आणि भारत यांचे याबाबतीतले विचार जुळत असल्याबद्दलमला आनंद वाटतो.

मित्रहो,

पश्चिम आशिया आणि आखाती देशांमध्ये शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यात आमच्या दोन्ही देशांचे हित आहे. आज आमच्याचर्चेदरम्यान या क्षेत्रांत आमच्या प्रयत्नांमध्ये ताळमेळ आणणे आणि आमच्यातील भागीदारी अधिक वेगाने वाढवण्याबाबत सहमतीझाली आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्याबरोबरच सागरी सुरक्षा आणि सायबर सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये अधिक दृढ द्विपक्षीयसहकार्य, दोन्ही देशांसाठी लाभदायक ठरेल, याबाबतही आमच्यात सहमती झाली आहे.

आदरणीय राजकुमार,

आपल्या भारत भेटीमुळे आपल्यातील परस्पर संबंध वेगाने विकसित करण्याला एक नवा आयाम लाभला आहे. आमचे आमंत्रणस्वीकारल्याबद्दल मी पुन्हा एकदा आदरणीय राजकुमार यांचे आभार मानतो. भारतातील त्यांचा आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळातीलसर्व सदस्यांचा प्रवास सुखद व्हावा, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.

अनेकानेक आभार!!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
How PM Modi’s Policies Uphold True Spirit Of The Constitution

Media Coverage

How PM Modi’s Policies Uphold True Spirit Of The Constitution
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Maharashtra meets PM Modi
December 27, 2024

The Governor of Maharashtra, Shri C. P. Radhakrishnan, met Prime Minister Shri Narendra Modi today.

The Prime Minister’s Office handle posted on X:

“Governor of Maharashtra, Shri C. P. Radhakrishnan, met PM @narendramodi.”