आदरणीय मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजिज सौद,
सद्देकी,
मरहबा बिकुम फिल हिंद.
मित्रहो,
पहिल्यांदाच भारताच्या राजकीय भेटीवर आलेले सौदी अरेबियाचे राजकुमार आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत करताना मलाअतिशय आनंद होतो आहे. भारत आणि सौदी अरब यांच्यात शतकांपूर्वीपासून आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. हेसंबंध नेहमीच सौहार्दाचे आणि मैत्रीचे राहिले आहेत. आपल्या दोन्ही देशांमधील नागरिकांचे परस्परांशी असणारे घनिष्ठ आणिनिकटचे संपर्क हा आपल्या देशासाठी एक सजीव सेतू आहे. सौदी अरबचे राजे आणि राजकुमार, आपले वैयक्तिक स्वारस्य आणिमार्गदर्शनामुळे आपल्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ, मधुर आणि सशक्त झाले आहेत. आज एकविसाव्या शतकात सौदी अरब हाभारताचा सर्वात मूल्यवान धोरणात्मक भागीदारांपैकी एक आहे. हा आमचा शेजारी देश आहे, जवळचा मित्र आहे आणि भारताच्याऊर्जा सुरक्षेचा एक महत्त्वपूर्ण स्रोत सुद्धा आहे. 2016 साली सौदी अरब येथील माझ्या दौऱ्यादरम्यान आम्ही परस्पर संबंधांनाविशेषतः ऊर्जा आणि सुरक्षा क्षेत्रात अनेक नवी पावले उचलली होती. अर्जेंटिना येथे दोन महिन्यांपूर्वी आपल्याशी झालेल्या भेटीच्यापरिणामी सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात आपल्यातील धोरणात्मक भागीदारीचा नव्याने विस्तार झाला आहे. आपल्यासुचवलेल्या आराखड्यानुसार द्वैवार्षिक शिखर परिषद आणि धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या स्थापनेसाठी आपल्यात सहमतीझाली, याचा मला आनंद वाटतो. यामुळे आपल्यातील संबंध अधिक दृढ आणि गतिमान होतील, तसेच त्यांना प्रगतीचे लाभ प्राप्तहोतील.
मित्रहो,
आज आम्ही द्विपक्षीय संबंधाशी निगडित सर्व विषयांबाबत व्यापक आणि सार्थक अशी चर्चा केली आहे. आमच्यातील परस्परआर्थिक सहकार्य नव्या उंचीवर नेण्याचा निश्चयही आम्ही केला आहे. आमच्या अर्थतंत्रात सौदी अरबमधून होणारी संस्थात्मकगुंतवणूक अधिक सुकर करण्यासाठी एक आराखडा स्थापन करण्याबाबत आमच्यात सहमती झाली आहे. भारताच्या पायाभूत सुविधाक्षेत्रात सौदी अरबच्या गुंतवणुकीचे मी स्वागत करतो.
आदरणीय महोदय,
आपले ‘व्हीजन 2030’ आणि आपल्या नेतृत्वाखाली होत असलेल्या आर्थिक सुधारणा, भारताच्या “मेक इन इंडिया” तसेच “स्टार्टअपइंडिया” सारख्या मुख्य कार्यक्रमांना पूरक आहेत. आपल्यातील ऊर्जा संबंध धोरणात्मक भागीदारीत परिवर्तित करण्याची वेळ आताआली आहे. जगातील सर्वात मोठी रिफायनरी आणि धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यामध्ये सौदी अरबची भागीदारी, आमच्यातील ऊर्जासंबंधांना विक्रेता आणि खरेदीकर्ता या नात्याच्या फार पुढे घेऊन जाणारी आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य अधिक दृढकरण्याबाबतही आमच्यात सहमती झाली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये आम्ही सौदी अरबचे स्वागत करतो. अणुऊर्जेच्याशांततापूर्ण वापरासाठी विशेषतः वॉटर डिसिमेशन आणि आरोग्यासाठी आमच्या परस्पर सहकार्यामुळे आमच्यातील संबंधांना एक नवाआयाम लाभेल. आमच्यातील धोरणात्मक वातावरणासंदर्भात आम्ही, परस्पर संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत आणि त्याचाविस्तार करण्याबाबत यशस्वी चर्चा केली आहे. गेल्या वर्षी भारताला सौदी अरबमध्ये आयोजित, प्रतिष्ठित जनाद्रियाह समारंभातगेस्ट ऑफ ऑनरचा सन्मान लाभला होता. आज आम्ही आमच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याचे ध्येय निश्चित केलेआहे. व्यापार आणि पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने सौदी अरबच्या नागरिकांसाठी ई व्हिसा सुविधेचा विस्तार केला जात आहे.भारतीयांसाठीच्या हज कोट्यामध्ये वाढ केल्याबद्दल आम्ही आदरणीय राजे आणि राजकुमार यांचे आभारी आहोत. 2.7 दशलक्षभारतीय नागरिकांचे सौदी अरबमधील शांततापूर्ण आणि उपयुक्त वास्तव्य, हा आमच्यातील एक महत्त्वपूर्ण दुवा आहे. आदरणीयराजेसाहेबांनी सौदी अरबच्या प्रगतीमध्ये त्यांच्या सकारात्मक योगदानाची प्रशंसा केली आहे. आपण नेहमीच त्यांच्या कल्याणाचीकाळजी घेतली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार आणि आशीर्वाद कायम आपल्यासोबत असतील.
मित्रहो,
मागच्या आठवड्यात पुलवामा येथे झालेला क्रूर दहशतवादी हल्ला, हे मानवताविरोधी संकटामुळे जगभर ओढवणाऱ्या समस्यांचेप्रातिनिधिक उदाहरण आहे. या संकटाशी प्रभावीपणे दोन हात करण्यासाठी, दहशतवादाला कोणत्याही प्रकारे समर्थन देणाऱ्या देशांवरसर्व प्रकारे दबाव वाढवण्याच्या आवश्यकतेबाबत आम्ही सहमत आहोत. दहशतवादाच्या पायाभूत सुविधा नष्ट करणे, त्याला मिळणारेसमर्थन समूळ नष्ट करणे तसेच दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना शिक्षा देणे, अतिशय गरजेचे आहे. त्याचबरोबरअतिरेकीवादाविरोधात सहकार्य आणि त्यासाठी एक सक्षम कार्ययोजना आवश्यक आहे, जेणेकरून हिंसा आणि दहशतवादासारख्याअपप्रवृत्ती आमच्या तरुणांची दिशाभूल करू शकणार नाहीत. सौदी अरब आणि भारत यांचे याबाबतीतले विचार जुळत असल्याबद्दलमला आनंद वाटतो.
मित्रहो,
पश्चिम आशिया आणि आखाती देशांमध्ये शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यात आमच्या दोन्ही देशांचे हित आहे. आज आमच्याचर्चेदरम्यान या क्षेत्रांत आमच्या प्रयत्नांमध्ये ताळमेळ आणणे आणि आमच्यातील भागीदारी अधिक वेगाने वाढवण्याबाबत सहमतीझाली आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्याबरोबरच सागरी सुरक्षा आणि सायबर सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये अधिक दृढ द्विपक्षीयसहकार्य, दोन्ही देशांसाठी लाभदायक ठरेल, याबाबतही आमच्यात सहमती झाली आहे.
आदरणीय राजकुमार,
आपल्या भारत भेटीमुळे आपल्यातील परस्पर संबंध वेगाने विकसित करण्याला एक नवा आयाम लाभला आहे. आमचे आमंत्रणस्वीकारल्याबद्दल मी पुन्हा एकदा आदरणीय राजकुमार यांचे आभार मानतो. भारतातील त्यांचा आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळातीलसर्व सदस्यांचा प्रवास सुखद व्हावा, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.
अनेकानेक आभार!!
भारत और सऊदी अरब के आर्थिक, सामाजिक और सांस्कृतिक सम्बन्ध सदियों पुराने हैं। और यह सदैव सौहार्द्रपूर्ण और मैत्रीपूर्ण रहे हैं। हमारे लोगों के बीच के घनिष्ठ और निकट संपर्क हमारे देशों के लिए एक सजीव सेतु यानि living bridge है: PM @narendramodi pic.twitter.com/eTdPnOXEKE
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
हिज मेजेस्टी की, और रॉयल हाईनेस आपकी, व्यक्तिगत रुचि और मार्गदर्शन से हमारे द्विपक्षीय सबंधों में और भी प्रगाढ़ता, मधुरता और शक्ति आई हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
आज, 21वीं सदी में, सऊदी अरब, भारत के सबसे मूल्यवान strategic partners में है।
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
यह हमारे विस्तृत पड़ोस में है, एक करीबी दोस्त है और भारत की ऊर्जा सुरक्षा का महत्वपूर्ण स्रोत भी है: PM @narendramodi
आज, 21वीं सदी में, सऊदी अरब, भारत के सबसे मूल्यवान strategic partners में है।
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
यह हमारे विस्तृत पड़ोस में है, एक करीबी दोस्त है और भारत की ऊर्जा सुरक्षा का महत्वपूर्ण स्रोत भी है: PM @narendramodi
हमारे ऊर्जा संबंधों को स्ट्रेटेजिक पार्टनरशिप में तब्दील करने का समय आ गया है। दुनिया की सबसे बड़ी रिफाइनरी और स्ट्रेटेजिक पेट्रोलियम रिज़र्व में सऊदी अरब की भागीदारी, हमारे ऊर्जा संबंधों को buyer-seller relation से बहुत आगे ले जाती है: PM @narendramodi pic.twitter.com/h2zYnL9lNN
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
हम अक्षय ऊर्जा के क्षेत्रों में अपने सहयोग को मज़बूत करने पर सहमत हुए हैं। हम इंटरनेशनल सोलर अलायंस में सऊदी अरब का स्वागत करते हैं। परमाणु ऊर्जा के शांतिपूर्ण उपयोग, विशेषरूप से water desalination और स्वास्थ्य के लिए, हमारे सहयोग का एक और आयाम होंगे: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
विशेषकर अपने strategic वातावरण के संदर्भ में, हमने आपसी रक्षा सहयोग को मज़बूत करने और उसका विस्तार करने पर भी सफल चर्चा की है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
पिछले हफ्ते पुलवामा में हुआ बर्बर आतंकवादी हमला, इस मानवता विरोधी खतरे से दुनिया पर छाए कहर की एक और क्रूर निशानी है।
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
इस खतरे से प्रभावशाली ढंग से निपटने के लिए हम इस बात पर सहमत हैं कि आतंकवाद को किसी भी प्रकार का समर्थन दे रहे देशों पर सभी संभव दबाव बढ़ाने की आवश्यकता है: PM
आतंकवाद का इंफ्रास्ट्रक्चर नष्ट करना और इसको समर्थन समाप्त करना और आतंकवादियों और उनके समर्थकों को सजा दिलाना बहुत जरूरी है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
साथ ही अतिवाद के खिलाफ सहयोग और इसके लिए एक मज़बूत कार्ययोजना की भी ज़रूरत है, ताकि हिंसा और आतंक की ताकतें हमारे युवाओं को गुमराह न कर सकें। मुझे खुशी है कि सऊदी अरब और भारत इस बारे में साझा विचार रखते हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
पश्चिम एशिया और खाड़ी में शांति और स्थिरता सुनिचित करने में हमारे दोनों देशों के साझा हित हैं। आज हमारी बातचीत में, इस क्षेत्र में हमारे कार्यों में तालमेल लाने और हमारी भागीदारी को तेजी से आगे बढ़ाने पर सहमति हुई है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
हम इस बात पर भी सहमत हुए हैं कि counter terrorism, समुद्री सुरक्षा और साइबर सुरक्षा जैसे क्षेत्रों में और मजबूत द्विपक्षीय सहयोग दोनों देशों के लिए लाभप्रद रहेंगे: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
Your Royal Highness, आपकी यात्रा ने हमारे रिश्तों के तेज विकास को एक नया आयाम दिया।
— PMO India (@PMOIndia) February 20, 2019
मैं एक बार फिर, हमारे निमंत्रण को स्वीकार करने के लिए रॉयल हाईनेस का शुक्रिया अदा करता हूँ। मैं उनके और प्रतिनिधिमंडल के सभी सदस्यों की भारत में सुखद प्रवास की कामना भी करता हूँ: PM @narendramodi pic.twitter.com/VOVz3zOORr