पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे, नुकतच निधन झालेल्या पूर्व पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका प्रार्थना सभेला संबोधित केले.

मोदी  म्हणाले की, आपले जीवन किती आहे हे आपल्या हातात नाही परंतु ते कसे असावे याचे नियोजन आपण करू शकतो. आयुष्य कसे असावे, त्याचे उद्दिष्ट  काय असावे  ह्याचे यथार्थ चित्रण आपल्याला  अटलजींच्या  संपूर्ण जीवनातून दिसत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन सामान्य माणसाच्या कल्याणासाठी खर्ची केले. त्यांच्या तारुण्य अवस्थेपासून ते वृध्दापकाळापर्यंत त्यांना शारीरिक स्वास्थ्य लाभले, ते देशाच्या कल्याणासाठी जगलेत.

|

पंतप्रधान पुढे म्हणाले कि, अटलजी  देशाच्या नागरिकांसाठी,  त्यांच्या तत्वांसाठी, आणि सामान्य लोकांचे  प्रेरणा  स्थान म्हणून जगलेत. वाजपेयींनी त्यांचे बहुतांश राजकीय जीवन हे अशा कालावधीत घालवले जेंव्हा  आदर्श  राजकीय  विचारधारेला पर्याय नव्हता. त्यांनी विरोधी पक्ष  नेते  म्हणून  बराच  काळ  घालविला,  तरीही  त्यांचे आदर्श  अबाधित  राहिले. मोदींनी सांगितले की,  वाजपेयीजींनी संसदीय परंपरेचा आदर केला; आणि जेव्हा संधी आली, तेव्हा त्यानी जनतेच्या फायद्यासाठी त्याच्या दृष्टीकोनाची अंमलबजावणी केली. प्रत्येक क्षणांत तुम्हाला "अटल" वाटेल, असे पंतप्रधान म्हणाले.

११  मे, १९९८  रोजी त्यांनी अणू चाचण्यांच्या माध्यमातून जगाला आश्चर्याचा धक्का दिला. आमच्या शास्त्रज्ञांच्या कुशलतेला  त्यांनी या चाचण्यांच्या यशस्वीतेचे श्रेय दिले. जागतिक पातळीवर व्यापक प्रतिकूल प्रतिक्रिया असूनही, अटलजींनी दबाव  बाळगला  नाही आणि जगाला दाखवून दिले की हा "अटल" आहे, असे  पंतप्रधान म्हणाले

|

पंतप्रधानांनी सांगितले की, वाजपेयीजींच्या नेतृत्वाखाली तीन नवीन  राज्यांची स्थापना कुठल्याही कटुतेविना करण्यात आली  असून याद्वारे वाजपेयींनी दाखवून दिले आहे कि, सर्वाना निर्णय प्रक्रियेत एकत्रीत घेऊन कसे चालायचे. 

|

 

पंतप्रधानांनी सांगितले की जेव्हा अटलजींनी प्रथम केंद्रात सरकार स्थापन केले तेव्हा कोणीही त्यांच्या समर्थनासाठी इच्छुक नव्हते. ते सरकार 13 दिवसात पडले. पण अटलजींनी आशा सोडली नाही आणि लोकसेवा करण्यासाठी कटिबद्ध राहिले. गठबंधन राजकारणातील  मार्ग त्यांनी दाखविला असे पंतप्रधानांनी सांगितले.

|

पंतप्रधान पुढे म्हणाले की,  वाजपेयीजींनी काश्मीरची कथा जागतिक स्तरावर  बदलवली . त्यांनी जागतिक पातळीवर दहशतवादाच्या मुद्याला प्रकाशात आणले.  ते जागतिक स्तरावर दहशतवादा विरुद्धच्या  मोहिमेचे कट्टर समर्थक बनले.

पंतप्रधानांनी सांगितले की, ते एक दशकापासून सार्वजनिक जीवन आणि राजकारणापासून दूर राहिले असले तरीही  आज त्यांच्या निधनानंतर त्यांच्या बद्दलच्या आदराचे वातावरण सर्वत्र दिसत आहे. अटलजी सदैव  एक प्रेरणास्थान राहतील. 

तरुण भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया  हा कधीही आयुष्यात अटलजींना भेटला नसला तरीही त्याने स्वतः जिंकलेले सुवर्ण पदक अटलजींना अर्पण  केले यावरून अटलजींच्या आदर्शांची उंची , पोहच किती आहे हे लक्षात येते असे पंतप्रधान म्हणाले.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Govt saved 48 billion kiloWatt of energy per hour by distributing 37 cr LED bulbs

Media Coverage

Govt saved 48 billion kiloWatt of energy per hour by distributing 37 cr LED bulbs
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 मार्च 2025
March 12, 2025

Appreciation for PM Modi’s Reforms Powering India’s Global Rise