नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या निवासस्थानी सोमनाथ न्यास विश्वस्त मंडळाची आज बैठक झाली. अध्यक्ष केशुभाई पटेल प्रकृती अस्वास्थ्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांनी बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. मंडळाचे विश्वस्त म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, हर्षवर्धन नेवतिया, पी.के. लाहेरी आणि आणि जे.डी. परमार या बैठकीला उपस्थित होते.
अमितभाई शाह या नवनियुक्त विश्वस्ताचे यावेळी मंडळाने स्वागत केले.
प्राचीन वारसा असणाऱ्या तीर्थक्षेत्रासह पर्यटन स्थळ म्हणूनही सोमनाथ विकसित करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. सोमनाथला भेट देणाऱ्या भक्तांमध्ये होणारी वाढ आणि संबंधित प्रकल्पांच्या प्रगतीबाबत विश्वस्त मंडळाने आढावा घेतला. सोमनाथला भेट देणाऱ्या यात्रेकरुंची संख्या एक कोटीच्या घरात पोहोचेल, या पार्श्वभूमीवर सोमनाथच्या सर्वंकष विकासासाठी उत्कृष्ठ पायाभूत सुविधा सुनिश्चित केल्या जाव्यात असे मत विश्वस्तांनी व्यक्त केले. सोशल मिडियावर सोमनाथचे दोन दशलक्षपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे.
या तीर्थक्षेत्रासंदर्भात अद्याप ज्ञात नसलेल्या ऐतिहासिक माहितीबाबत संशोधन व्हावे असे पंतप्रधानांनी सूचित केले आहे. भविष्यात उच्च तंत्रज्ञानाधारित सागरी आकर्षणे आणि व्हर्चुअल रिॲलिटी शो असे उपक्रम राबवता येतील असे ते म्हणाले. येथील अधिकाधिक भाग सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली यावा अशी सूचनांही पंतप्रधानांनी केली.
भारत सरकारच्या सुवर्णरोखे योजनेत सुमारे 6 किलो सोने ठेवण्याचा निर्णयही सोमनाथ न्यासाने घेतला आहे.