उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमधल्या इंदिरापुरम इथे सीआयएसएफ अर्थातकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा 50 वास्थापना दिनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज साजरा झाला.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्यापरेडची पंतप्रधानांनी पाहणी केली.प्रशंसनीय सेवेबद्दल सेवापदके यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.हुतात्मा स्मारकावर त्यांनी पुष्पचक्र अर्पण केले आणि अतिथी पुस्तिकेत स्वाक्षरी केली.
सीआयएसएफच्या सुवर्ण जयंतीनिमित्त त्यांनी दलाचे अभिनंदन केले.देशाच्या प्रमुख संस्थांचे संरक्षण करण्यामध्येसीआयएसएफच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.नवभारतासाठी निर्माण करण्यात आलेल्या आधुनिक संरचनेचे संरक्षण करण्याची जबाबदारीसीआयएसएफच्यासुरक्षित हाती असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
सुरक्षा दलाच्या जवानांनासहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. व्हीआयपी संस्कृतीही सुरक्षा संरचनेत अडथळा निर्माण करते.म्हणूनच नागरिकांनी सुरक्षा जवानांना सहकार्य करणे महत्वाचेअसल्याचे ते म्हणाले.सीआयएसएफची भूमिका आणि कार्य याविषयी जन जागृती करण्यासाठी, त्यांचे कार्य दर्शवणारी,डिजिटल संग्रहालये,विमानतळ,मेट्रो यासारख्या ठिकाणी सुरु करण्याची सूचना त्यांनी केली.
देशाच्या महत्वाच्या पायाभूतढाच्याच्यासंरक्षणातसीआयएसएफच्याभूमिकेचीप्रशंसा करत, आपत्ती प्रतिसाद,महिला सुरक्षा आणि इतर बाबीतही हे दल कार्यरत असल्याचे ते म्हणाले.केरळ मधला पूर आणि नेपाळ आणि हैती इथला भूकंप या आपत्तीच्या वेळीसीआयएसएफच्याजवानांनीबजावलेल्या मदत आणि बचाव कार्याबद्दलही त्यांनी सांगितले.
आपल्या सुरक्षा दलांच्या सुरक्षिततेसाठी आपले सरकार कटीबद्ध आहे.यासंदर्भात सुरक्षा दलांचे आधुनिकीकरण आणि त्यांच्या कल्याणासाठी आपल्या सरकारने उचललेल्या पाऊलांचा त्यांनी उल्लेख केला.
कर्तव्य म्हणजे सशस्त्र दलासाठी उत्सव आहे असे सांगून दहशतवादामुळे निर्माण झालेल्या आव्हानांमुळेसीआयएसएफची भूमिका विस्तारली आहे.दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आपले सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय पोलीस स्मारक, आपले पोलीस आणि अर्ध सैनिक बलाचे शौर्य आणिबलिदानयांना समर्पित असल्याचे पंतप्रधान म्हणाले.राष्ट्रीय युध्द स्मारक आणि राष्ट्रीय पोलीस स्मारक यामुळे सुरक्षा दलांच्या योगदानाविषयी जनतेत जागृती निर्माण होईल.सीआयएसएफमधे अनेक महिला सैनिकांची भरती करण्याच्यासीआयएसएफच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.
भारताची प्रगती आणि आगेकूच सुरु राहील त्यानुसारसीआयएसएफचीभूमिका आणि त्यांची जबाबदारीही वृद्धींगत होत राहील असे पंतप्रधान म्हणाले.
सुरक्षा और सेवा के भाव के साथ आप आगे बढ़ रहे हैं, वो बहुत महत्वपूर्ण है।
— PMO India (@PMOIndia) March 10, 2019
नए भारत के लिए इंफ्रास्ट्रक्चर तैयार किया जा रहा है,
पोर्ट बन रहे हैं,
एयरपोर्ट बन रहे हैं,
मेट्रो का विस्तार हो रहा है,
जो बड़े उद्योग लगाए जा रहे हैं, उनकी सुरक्षा की जिम्मेदारी आप सभी पर है: PM
आपदाओं की स्थिति में भी आपका योगदान हमेशा से सराहनीय रहा है।
— PMO India (@PMOIndia) March 10, 2019
केरल में आई भीषण बाढ़ में आपने राहत, बचाव के काम में दिन रात एक करके हजारों लोगों का जीवन बचाने में मदद की।
देश में ही नहीं विदेश में भी जब मानवता संकट में आई है तब CISF ने अपनी जिम्मेदारी बखूबी निभाई है: PM
गर्मी हो,
— PMO India (@PMOIndia) March 10, 2019
सर्दी हो,
बरसात हो,
आप अपने मोर्चे पर बिना विचलित हुए खड़े रहते हैं।
देश के लिए होली, दीवाली और ईद होती है, तमाम त्योहार होते हैं,
लेकिन आप सभी के लिए अपनी ड्यूटी ही त्योहार बन जाती है: PM
हमारे सुरक्षाकर्मी का परिवार भी तो बाकियों की तरह ही होता है।
— PMO India (@PMOIndia) March 10, 2019
उसके भी सपने हैं, आकाक्षाएं हैं।
उसकी भी शंकाएं, आशंकाएं होती हैं।
लेकिन राष्ट्र रक्षा का भाव जब मन में आ जाता है तो वो हर मुश्किल पर जीत हासिल कर लेता है: PM