लोकांचे जीवनमान सुधारण्याच्या सरकारच्या प्रतिबद्धतेला गेल्या तीन वर्षांत बळ मिळाले आहे: पंतप्रधान मोदी

आम्ही पुढच्या पिढ्यांसाठी एक प्रणाली तयार करण्यास प्रतिबद्ध आहोत, जिथे जीवन 5 गोष्टींवर आधारित असेल – जीवनमानात सुलभता, शिक्षण, रोजगार, अर्थव्यवस्था आणि मनोरंजन: पंतप्रधान मोदी

2022 पर्यंत प्रत्येकासाठी घर देण्यास आमचे सरकार प्रतिबद्ध आहे : पंतप्रधान मोदी

गरिबांच्या दुःखात भागीदार असल्याचा मला अभिमान आहे : राहुल गांधींवर पंतप्रधानांचा प्रहार

स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत, आम्ही न्यू इंडियाच्या नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी आमची शहरे तयार करू इच्छितोः पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौमध्ये : उत्तर प्रदेशातील यापूर्वीच्या सरकारांनी गरिबांच्या घरांपेक्षा स्वतःच्या घरांना अधिक प्राधान्य दिले

नागरी विकासाशी संबंधित केंद्र सरकारच्या तीन अभियानांच्या तिसऱ्या वर्धापनदनिानिमित्त लखनौ इथे आयोजित केलेल्या ‘नागरी भागाचा कायापाटल’ या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), अमृत आणि स्मार्ट सिटी मिशन या योजनांचा यात समावेश आहे.

नागरी विकास अभियानाशी संबंधित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अभियानाच्या प्रत्येक राज्य / केंद्र शासित प्रदेशातल्या एक याप्रमाणे 35 लाभार्थींशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

उत्तर प्रदेशातल्या विविध शहरातल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुभव, त्यांनी व्हिडीओलिंकद्वारे जाणुन घेतले.

उत्तर प्रदेशात विविध कल्याणकारी प्रकल्पांचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

या मेळाव्याला उपस्थित असलेले नागरी प्रशासक म्हणजे नव भारताच्या, नव्या पीढीच्या आशा-आकांक्षांचे प्रतिक असलेले शहराचे प्रतिनिधी आहेत, असे पंतप्रधानांनी या मेळाव्याला संबोधित करताना सांगितले. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत 7000 कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर 52000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम सुरु आहे. अल्प, अत्यल्प आणि मध्यम वर्गाला उत्तम नागरी सुविधा देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा या अभियानाचा उद्देश असल्याचे पंतप्रधान म्हणाले. एकीकृत नियंत्रण केंद्र हा या अभियानाचा महत्वाचा भाग आहे. 11 शहरात या केंद्रांचे काम सुरु झाले असून, आणखी काही शहरात यावर काम सुरु असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रयत्नांबाबत सांगतानाच भारताच्या नागरी भागाचे चित्र पालटण्याचे अभियान लखनौशी जोडले गेले आहे. वाजपेयी लखनौ मतदारसंघाचे खासदार होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या विविध स्तुत्य उपक्रमांचा मूळ हेतू कायम राखत, केंद्र सरकार, जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 2022 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला घर पुरवण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. या दिशेने झालेल्या कामाची माहिती देणारी आकडेवारी पंतप्रधानांनी सादर केली. स्वच्छतागृह आणि विद्युतपुरवठा यांनी युक्त ही घरे निर्माण करण्यात आली आहेत.

महिलांच्या नावावर या घरांची नोंदणी झाली असल्याचे ही घरे म्हणजे महिला सबलीकरणाचे प्रतीक आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

शेतकरी आणि जवान, नुकत्याच झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना आपण गरीब आणि शोषित, यांच्या विपत्तीत भागीदार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताला उत्तम नागरी नियोजनाची परंपरा आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, विशेषत: स्वातंत्र्यानंतर स्पष्ट विचारशक्तीचा अभाव यामुळे नागरी केंद्रांना मोठे नुकसान सोसावे लागल्याचे पंतप्रधान म्हणाले.

भारताचा वेगाने विकास होत असून, या विकासाचे इंजिन असणाऱ्या शहरांचा विकास नियोजनहीन असू शकत नाही. स्मार्ट सिटी अभियानामुळे नव भारताचे आव्हान स्वीकारण्यासाठी शहरे सज्ज होतील आणि 21 व्या शतकासाठी, भारतात जागतिक दर्जाची कुशाग्र नागरी केंद्र निर्माण होतील, असे पंतप्रधान म्हणाले.

निवासासाठी पाच ई म्हणजे शिक्षण, रोजगार, अर्थव्यवस्था, करमणूक आणि राहण्यासाठी पोषक आणि सुलभ वातावरण यांची आवश्यकता असते, असे त्यांनी नमूद केले.

नागरी सहभाग, नागरी आकांक्षा, नागरी उत्तरदायित्व यावर स्मार्ट सिटी अभियान आधारीत आहे. पुणे, हैदराबाद आणि इंदुर या शहरांनी बॉन्डद्वारे निधी उभारला आहे. नागरी सेवा ऑनलाईन झाल्यामुळे भ्रष्टाचाराचे उगमस्थान असलेल्या रांगा नष्ट झाल्या आहेत. स्मार्ट, सुरक्षित, शाश्वत आणि पारदर्शी यंत्रणेमुळे लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

 

 

  

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage