आपल्या वैज्ञानिकांच्या अजून एका मोठ्या कामगिरीबद्दल मी सर्वात आधी सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो. नुकतंच इस्रो पीएसएलव्ही- सी40 चे यशस्वी प्रक्षेपण केले.
पीएसएलव्ही च्या माध्यमातून कार्टोसैट-2 श्रुंखलेतील उपग्रहासह एकूण 31 उपग्रह अंतराळात स्थापित करण्यात आले आहेत. आज इस्रो ने अजून एका विक्रमाची नोंद केली.आज इस्रो ने उपग्रह प्रक्षेपणात शतक झळकावले आहे.
इस्रोच्या आजच्या यशामुळे देशातील शेतकऱ्यांना, मच्छिमारांना प्राथमिक माहिती मिळण्यास सहकार्य मिळेल.
हे यश नवं भारताच्या निर्मितीचा मार्ग अजून प्रशस्त करेल.
आपल्या देशाचा मान उंचवणाऱ्या आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या इस्रोच्या वैज्ञानिकांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.
नवीन वर्षात, विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनी आपल्या वैज्ञानिकांनी देशाला एक अमूल्य भेट दिली आहे.
मित्रांनो, तुमच्याशी समोरासमोर बोलण्याची खूप इच्छा होती,
हा जो छोटा भारत आता ग्रेटर नोएडा मध्ये एकत्र आला आहे,
एक भारत-
महान भारताचे भव्य चित्र सादर करत आहे, ह्या मिनी इंडियाचे साक्षात दर्शन झाले असते.
परंतु कामाच्या व्यस्थतेमुळे तुम्हा लोकांशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवाद साधत आहे.
मी नेहमी प्रयत्न करतो की, अशा कार्यक्रमांना जेव्हा मला जातीने हजर राहता येत नाही तेव्हा मी तिथे काय झाले, काय चर्चा झाली, काय निष्पन्न झाले याची सर्व माहिती प्राप्त करून घेतो.
तुम्ही देखील इथे जी चर्चा कराल, परिसंवाद होतील त्याची पूर्ण माहिती घेण्याचा मी प्रयत्न करेन.
मित्रांनो, आजपासूनच राष्ट्रीय युवा महोत्सवाची देखील सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या विध्यार्थी आणि संस्थांचे मी कौतुक करतो, त्यांचे अभिनंदन करतो.
आगामी 4 दिवसात इथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, राष्ट्रीय युवा परिषदेचे देखील आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मला देण्यात आली. मी यावेळी “मन की बात” कार्यक्रमात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात मॉक परिषदेचे आयोजन करण्याचा विचार मांडला होता. ही त्याच विचाराची एक श्रुंखला आहे.
नवं भारताच्या विषयावर विचार मंथन करण्याचा संकल्प करायची ही एक उत्तम संधी आहे. हा 22 वा महोत्सव आहे आणि मला असे वाटते की जेव्हा तुम्ही चर्चा कराल, तेव्हा तुम्ही यावर देखील विचार मंथन करा की जेव्हा 25 व युवा महोत्सव साजरा होईल, तेव्हा त्याचे स्वरूप काय असेल. संकल्प।काय असतील? आपण पथदर्शक तयार करून कुठे पोहचू?
याचप्रकारे जेव्हा देश 2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करणार, त्या वाराही युवा महोत्सवाचे स्वरूप काय असेल, यावर देखील तुम्ही चर्चा करा. मला खात्री आहे की, या चार दिवसांमध्ये तुम्ही अशी चर्चा कराल जी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हला दिशा दाखवेल, तुम्हाला मार्गदर्शन करेल.
6-7 महीनों में आपने ये शब्द बार बार सुने होंगे। संकल्प से सिद्धि, आखिर ये है क्या?
माझ्या युवा मित्रांनो, या वर्षी महोत्सवाची संकल्पना आहे “संकल्प से सिध्दी”. मागील 6-7 महिन्यांपासून हे शब्द तुम्ही वारंवार ऐकले असतील. संकल्प से सिध्दी, हे नक्की काय आहे?
हा काही मोबाईलचा ॲप नाही की डाऊनलोड केला, इन्स्टॉल केला आणि मग झाले.
म्हणूनच आज मी तुमच्या सोबत संकल्प आणि त्याची सिद्धी यावर तुमच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे.
संकल्प नक्की काय आहे? काय सिद्ध करायचे आहे?
मित्रांनो,
2022 मध्ये आपला देश स्वातंत्र्याची 75 वी साजरी करणार आहे. तुम्ही स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल केवळ पुस्तकांमध्येच वाचलं असेल. मी देखील स्वातंत्र्य लढ्याबद्दल केवळ ऐकले आणि वाचले आहे, म्हणूनच आपल्यात वयाचे अंतर जरी असले तरी या विषयातील आपले ज्ञान सारखेच आहे.
माझ्या युवा मित्रांनो, आपण स्वतंत्रता संग्रामात सहभागी नव्हतो झालो, आणि म्हणूनच स्वातंत्र्य वीरांनी त्यावेळी जी स्वप्न बघितली होती ती पूर्ण करण्याची खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.
जेव्हा तुरुंगात ब्रिटिश पोलीस स्वातंत्र्य सैनिकांवर चाबकाचे फटके मारत होते, त्यावेळी त्या काळकोठडीत हे सर्व ते निमूटपणे सहन करत आपले स्वातंत्र्य वीर जे भारताचे स्वप्न बघत होते, त्या भारताची निर्मिती करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
जेव्हा आपण त्या कल्पनेला, त्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने अनुभवू तेव्हाच त्यांच्या स्वप्नातील भारत निर्मितीचा संकल्प देखील करू शकू. हा भारत कसा असेल, नवं भारत कसा असेल? आज जेव्हा तुम्ही दिवसभराचे कार्यक्रम संपवून रात्री झोपायला जाल तेव्हा थोडावेळ या सर्वाचा विचार करा.
विचार करा की तुमच्या आसपास असे काय घडत आहे जे तुम्हाला बदलायचे आहे.
अशी कोणती प्रणाली आहे जिच्याबद्दल तुम्ही विचार करत होतात की, हे बरोबर नाही,ही परिस्थिती बदलली तर!!! जेव्हा तुम्ही ट्रेनने इथे येत असाल, शाळेत, महाविद्यालयात,घरात, जेव्हा पण तुम्ही विचार कराल की हे ठीक नाही, हे तर बदलायला हवं, त्याचा तुम्ही आज पुन्हा विचार करा
एकदा का एखादी गोष्ट होऊन गेली की त्याचा पुन्हा विचार करा. विवेकानंदांचे स्मरण करा, मी विश्वासाने सांगतो, ज्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या आहेत, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास झाला आहे, ज्या बदलण्याचा विचार तुमच्या मनात आला आहे, जर तुम्ही आज त्याच्यासोबत स्वतःला जोडलेत तर तीच इच्छा एक संकल्प बनेल.
आज 12 जानेवारीच्या रात्री त्याच गोष्टी तुमच्यासाठी संकल्प होतील. संकल्प कोणाला सांगण्यासाठी नाही, जोरजोरात ओरडून सांगण्यासाठी नाही, तर हा संकल्प तुमच्या स्वतःसाठी असेल, 13 जानेवारीच्या नवीन पहाटेपासून, नवीन उमेदीने काम करण्यासाठी असेल.
मित्रांनो, तुम्हींसर्व आता ज्या विद्यापीठाच्या परिसरात आहात, ते गौतम बुद्धांच्या नावावर आहे.
तुम्ही ज्या शहरात आहात- ग्रेटर नोएडा- त्याचे नाव देखील गौतम बुद्ध नगर आहे. म्हणूनच मी तुम्हाला गौतम बुद्धांशी निगडित एक गोष्ट सांगतो. छोटासा किस्सा आहे, खूप काही मोठा नाही.
एकदा भगवान बुद्धांच्या एका शिष्याने त्यांना विचारले की, तुमच्याकडून शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक शिष्याला मुक्ती मिळणार का? भगवान बुद्धांनी उत्तर दिले- नाही, काही जणांनाच मिळेल.
काहींना नाही मिळणार. शिष्याने विचारले- असे का? तेव्हा भगवान बोलले की जे माझ्या वाचनांना योग्य पद्धतीने समजून घेतली, त्यांनाच मुक्ती मिळेल, बाकी भटकत राहतील.
मित्रांनो, एका गुरूकडून आपल्याला एकच शिक्षण मिळेल, परंतु तुम्ही ते शिक्षण कसे ग्रहण करता, तुम्ही काय संकल्प करता, त्यावर तुमचे यश आणि अपयश अवलंबून आहे.
बघा, जसे कौरव आणि पांडवांचे गुरू एकच होते.
दोघांना एकाच प्रकारचे शिक्षण मिळाले होते, परंतु दोघांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व किती वेगळे होते. कारण कौरव आणि पांडवांचे संकल्प वेगवेगळे होते.
आयुष्यात तुम्हाला शिक्षण देणारे खूप लोकं मिळतील, परंतु शिक्षण ग्रहण करून कोणत्या मार्गावर चालायचे आहे, कोणता संकल्प करायचा आहे, हे फक्त तुम्हालाच ठरवावे लागेल.
हाच तर गौतम बुद्धांच्या “अप्प दीपो भव:” चे देखील सार आहे. आपला दिवा, आपला प्रकाश स्वतः बना. तुमचे संकल्प तुम्ही स्वतः करा. कोणी तुम्हाला शपथ घालायला नाही येणार, कोणी आठवण करून द्यायलाही नाही येणार. जे काही करायचे आहे ते तुम्हाला स्वःताला करायचे आहे.
बंधू आणि भगिनींनो, स्वामी विवेकानंद सांगायचे- “युवक ते असतात जे आपल्या भूतकाळाची चिंता न करता आपल्या भविष्याच्या लक्ष्याच्या दिशेने काम करतात.” तुम्ही सर्व युवापिढी जे आता काम करत आहात, तेच देशाच्या भविष्याची दिशा निश्चित करतात. म्हणून तुम्ही आज जो संकल्प कराल, तोच सिद्ध होऊन देशाला देखील सिद्ध करेल.
उत्तर प्रदेशचे एक प्रसिद्ध गीतकार होते, चित्रपटांसाठी देखील त्यांनी काम केले आहे-
मजरुह सुल्तानपुरी. त्यांचा एक शेर होता-
“मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गये और कारवां बनता गया ।”
मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी एकट्याने सुरवात करावीच लागते.
तुमचे चारित्र्य चांगले असेल, हेतू स्पष्ट असेल, निश्चय पक्का असेल तर लोक स्वतःहून तुमच्यासोबत येतात. माझी आज तुम्हा सर्वांकडून हीच अपेक्षा आहे की पहिले पाऊल उचलायच्या आधी, काही संकल्प करून नवीन सुरवात करण्याआधी घाबरू नका, बस निश्चय करा आणि चालायला सुरुवात करा.
तुमच्या या प्रवासात सरकार देखील, भारत देखील सर्वार्थाने तुमच्या सोबत उभा आहे.
माझी अशी इच्छा आहे की ज्या युवकांना काहीतरी करायचे आहे, आपल्या हिंमतीवर, आपल्या मेहनतीने, आपली स्वप्न पूर्ण करू इच्छितात, त्यांना सगळी मदत मिळेल.
जेव्हा ते सुरवात करतील, तेव्हा त्यांना बँक हमीची काळजी करावी लागणार नाही, “कर” बाबत काळजी करावी लागणार नाही, कागदपत्रांच्या जाळ्यात अडकावे नाही लागणार.
मला असे वाटते की देशातील युवकांनी रोजगार निर्माते बनावे, नवनिर्मितीसाठी पुढे यावे आणि यासाठी निरंतर काम केले जात आहे.
मित्रांनो, आमच्या सरकारने आतापर्यंत प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत अंदाजे 10 कोटी लोकांना कर्ज वाटप केले आहे. 10 कोटी हा आकडा खूप मोठा आहे.
लोकांना बँकेच्या हमीशिवाय 4 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कर्ज देण्यात आले आहे. विचार करा, बँकेच्या हमीशिवाय, तुम्ही पैसे परत कसे करणार ह्याची चौकशी केल्याशिवाय, कर्ज कसे फेडणार, 4 लाख कोटींहून अधिक रकमेचे।कर्ज लोकांना दिले आहे.
या पैशांनी गावांमध्ये, खेड्यांमध्ये, शहरांमध्ये, लोकांनी आपले छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. ते आपली स्वप्ने पूर्ण करत आहेत. हे लोकं, हे लघु आणि छोटे उद्योजक आता स्वतः रोजगार देणारे झाले आहेत.
बंधू आणि भगिनींनो, सरकारच्या या मोठ्या योजनेचा एकच आधार आहे. तुमच्यावर, देशातील युवकांवरील विश्वास. आम्हाला विश्वास आहे की ह्या देशातील युवकाने एकदा का निश्चय केला की तो काहीही करून ती कामगिरी फत्ते करतो.
असे ऊर्जावान युवक देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आहेत. कोणी डोंगरातून पडणाऱ्या धबधब्यातून वीज निर्मिती करत आहे, कोणी कचऱ्यासून वीजनिर्मिती करत आहे, कोणी कचऱ्यापासून गृह निर्माणातील वस्तू तयार करत आहे, कोणी तंत्रज्ञानाचा वापर करत गावात आरोग्य सुविधा पोहोचवत आहे, कोणीतरी आपल्या शेतातच अन्न प्रक्रिया युनिट सुरू केला आहे. असे करोडो युवक राष्ट्र निर्मितीसाठी दिवस रात्र एक करत आहेत.
तुमच्यात सामर्थ्य आहे, साहस आहे आणि योग्य दिशेने चालण्याची समज देखील आहे. म्हणूनच तुमचे हात धरून त्याला बळ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
थोडेसे सहकार्य, बाकी तुम्ही स्वतः सक्षम आहात. मित्रांनो, आजच्या आवश्यकतेनुसार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जावे सरकार याकडे देखील लक्ष देत आहे.
Our @isro scientists have made us proud yet again: PM @narendramodi https://t.co/zzH28VTxdh
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018
Our strides in space will help our citizens and will enhance our development journey. I want to once again congratulate our scientists: PM @narendramodi https://t.co/zzH28VTxdh
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018
I congratulate all those winning the National Youth Awards: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018
During #MannKiBaat in December 2017, I had called for organising mock parliaments in our districts. Such mock parliaments will further the spirit of discussion among our youth: PM @narendramodi https://t.co/zzH28VTxdh
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018
We are born after 1947 thus, we did not have the honour to take part in the freedom struggle. But, we have the opportunity to fulfil the dreams of the great men and women who devoted their lives for our freedom: PM @narendramodi https://t.co/zzH28VTxdh
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018
We have to create the India that our freedom fighters dreamt of: PM @narendramodi https://t.co/zzH28VTxdh
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018
We want to make our youth job creators. They should be youngsters who innovate: PM @narendramodi https://t.co/zzH28VTxdh
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018
Some people will tell you- today's youth does not have 'Dhairya.' In a way, this is what ignites an innovative zeal in our youth. It enables our youngsters to think out of the box and do new things: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018
I urge you all to make sports a part of your lives: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018