In 1997, India's GDP was $400 billion, but after two decades now it is 6 times, says PM Modi
India has always believed in values of integration and unity, 'Vasudhaiva Kutumbakam' which means the entire world is one family: PM Modi at Davos
WEF is creating a shared community in a fractured world, says the PM
Technology is assuming immense importance in this era, says PM Modi
At Davos, PM Modi says concerted action is required to tackle climate change
The big threat ahead of world is artificial creation of good and bad terrorist: PM Modi
We in India are proud of our democracy and diversity: PM Modi
Democracy is not a political system in India, it is a way of life, says PM Modi at Davos
In India, we are removing red tape and laying red carpet for investors: PM Modi
Innovation and entrepreneurship is making young Indians job givers, not job seekers, says PM Modi
Democracy, demography and dynamism are shaping our destiny today: PM Modi
We should all work together, we should build a heaven of world: PM Modi

स्वित्झर्लंडचे माननीय राष्ट्रपती,

 

राज्य आणि केंद्र सरकारमधील मान्यवर,

 

जागतिक आर्थिक व्यासपीठाचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष क्लॉज श्वाब,

 

जागतिक मान्यताप्राप्त वरिष्ठ आणि प्रतिष्ठीत उद्योगपती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,

 

प्रसारमाध्यमातील मित्रांनोबंधू आणि भगिनींनो,

 

नमस्कार,

 

दावोसमध्ये जागतिक आर्थिक व्यासपीठाच्या या 48व्या वार्षिक बैठकीत सहभागी होतांना मला खूप आनंद होत आहे. सर्वात आधी मी क्लॉज श्वाब यांना त्यांच्या या उपक्रमासाठी आणि जागतिक आर्थिक व्यासपीठाला सशक्त आणि व्यापक व्यासपीठ बनवण्यासाठी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या दृष्टीकोनात एक महत्वाकांक्षी विषयसूची आहे ज्याचा मुख्य उद्देश जागतिक परिस्थिती सुधारणे हा आहे. त्यांनी या विषयसूचीला आर्थिक आणि राजकीय विचारांसोबत एकदम मजबूतरित्या जोडलं आहे.तसेच स्वित्झर्लंड सरकार आणि त्याच्या नागरिकांनी केलेल्या आमच्या आदरतिथ्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे.

 

 

 

मित्रांनो,

 

भारतीय पंतप्रधानांनी 1997 ला दावोसचा दौरा केला होता त्यावेळी देवेगौडाजी भारताचे पंतप्रधान होते. 1997 मध्ये भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न केवळ ४०० बिलियन डॉलरहून थोडे अधिक होते. आता दोन दशकांनंतर ते आता अंदाजे सहापट झाले आहे. त्यावर्षी या व्यासपीठाचा विषय होता बिल्डींग द नेटवर्क सोसायटी. आज21 वर्षांनंतरतंत्रज्ञान आणि डिजिटल युगाची कामगिरी आणि प्राधान्या नंतरहा विषय खूपच जुनाट वाटतो. आज आम्ही फक्त नेटवर्क सोसायटीमध्ये नाही तर मोठ्या डेटाच्या विश्वातकृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोबोटच्या जगात आहोत. 1997 मध्ये युरो चलनात प्रचलित नव्हते. आशियाई आर्थिक संकटाचा कुठेच मागमूसही नव्हतातसेच ब्रेक्सिटची अपेक्षाही नव्हती. 1997 मध्ये खूप कमी लोकांना ओसामा बिन लादेन विषयी माहिती होती आणि हॅरी पॉटरचे नाव देखील अज्ञात होते.तेव्हा बुद्धिबळ खेळाडूंना संगणकाकडून हरण्याचा कोणताच धोका नव्हता. तेव्हा सायबर जगतात गुगलचा प्रवेश झाला नव्हता.

 

आणि जर तुम्ही 1997 मध्ये इंटरनेटवर “ऍमेझॉन” शब्द शोधला असतात तर तुम्हाला नद्या आणि घनदाट जंगलांविषयी माहिती मिळाली असती. त्या वेळी ट्विट हे केवळ पक्षी करायचे. ते मागील शतक होते.

 

आजदोन दशकांनंतरआपले जग आणि आपल्या समाजात अतिशय क्लिष्ट नेटवर्क आहे. त्या काळातही दावोस  काळाच्या खूप पुढे होते आणि हे जागतिक आर्थिक व्यासपीठ भविष्याचे प्रतीक होते. आजही दावोस काळाच्या खूपच पुढे आहे.

 

या वर्षी व्यासपीठाचा विषय आहे  क्रिएटिंग अ शेअर्ड फ्युचर इन अ फ्रॅक्चरड वर्ल्ड म्हणजेच विखुरलेल्या जगात एक सामायिक भविष्य घडवणे. नवीन बदलांसहनवीन शक्तींसह आर्थिक क्षमता आणि राजकीय सत्तांमधील संतुलन बदलत आहे. यामुळे जागतिक स्तरावर दूरगामी बदलांची प्रतिमा दिसत आहे. शांतीस्थिरता आणि सुरक्षिततेची नवीन आणि गंभीर आव्हाने जगासमोर आहेत.

 

तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन आमच्या राहण्याच्या,  काम करण्याच्याव्यवहाराच्यावागण्या बोलण्याच्या आणि  अगदी आंतरराष्ट्रीय समूह आणि राजकारण आणि अर्थव्यवस्था यांच्यावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकत आहे. तंत्रज्ञानाचे सर्व चांगले वाईट उदाहरण सोशल मीडियाच्या वापरामध्ये आढळतात. आज डेटा सर्वात मोठी संपत्ती आहे. सर्वात मोठ्या संधी डेटाच्या आधारावर निर्माण होत आहेत आणि सर्वात मोठी आव्हाने देखील. डेटाचे मोठे डोंगर निर्माण आहेत. त्यांना नियंत्रित करण्यासाठी एक शर्यत सुरु आहे. कारणअसे मानले जाते की जो डेटा नियंत्रणात ठेवेल भविष्यता तोच सर्वशक्तिशाली असेल.

 

त्याचप्रमाणेसायबर सुरक्षा आणि अणु सुरक्षा क्षेत्रातील वेगाने बदलणारे तंत्रज्ञान आणि विध्वंसक शक्तींच्या वाढत्या प्रभावामुळे आधीपासून असलेली आव्हाने अधिक गंभीर होत आहेत. एकीकडेविज्ञानतंत्रज्ञान आणि आर्थिक प्रगतीच्या नवीन आयामांमध्येमनुष्याला समृद्धीचे नवीन मार्ग दर्शविण्याची क्षमता आहे. तिथेच दुसरीकडेया बदलांमुळे अशी फुट देखील निर्माण झाली आहे ज्यामुळे वेदनादायक जखमा देखील होऊ शकतात. बरेच बदल अशा भिंती तयार करत आहेत ज्यामुळे संपूर्ण मानवजातीला शांती आणि समृद्धीचे सर्व मार्ग दुर्गमच नाही तर असाध्य केले आहेत. विकासामधील त्रुटीगरिबीबेरोजगारीसंधीचा अभावआणि नैसर्गिक आणि तांत्रिक संसाधनांवरील तुटपुंज्या हातातील वर्चस्वामुळे ही फुटविभाजन आणि अडथळे निर्माण होत आहेत. या परिस्थितीत आपल्या समोर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत जे मानवतेच्या भविष्यासाठी आणि भावी पिढीच्या वारसा योग्य उत्तर मागत आहेत.

 

आपली जागतिक व्यवस्था या विभाजनाला आणि दरींना प्रोत्साहन देत आहे कासामंजस्यावर कोणत्या शक्ती भारी पडत आहेतज्या सहकार्यापेक्षा अधिक संघर्ष करतातआणि आपल्याजवळ अशी कोणती साधने आणि मार्ग आहेत जे या विभाजनाला आणि दरींना मिटवून एक आनंदी आणि सामायिक भविष्याचे स्वप्न पूर्ण करू शकतील?

मित्रांनो,

 

भारतभारतीय आणि भारतीय परंपरेचा प्रतिनिधी या नात्याने या व्यासपीठाचा विषय हा माझ्यासाठी समकालीन आणि तितकाच जुना देखील आहे. जुना यासाठी कारण अनादिकाळापासून आमचा विश्वास मानवजातीला एकत्र ठेवण्यावर आहे त्याला विभक्त करण्यावर नाही. हजारो वर्षांपूर्वी संस्कृतमध्ये लिहिलेल्या ग्रंथात भारतीय विचारवंतांनी सांगितले आहे की, “वसुधैव कुटुम्बकम्. याचा अर्थ असा कीहे विश्वची माझे घर. आणि म्हणूनच आपण सर्व एका कुटुंबासारखे आहोत. आपले नशीब हे एकमेकांशी जोडले गेले आहे. वसुधैव कुटुम्बकम् ची ही कल्पना आजच्या काळात हे विभाजन आणि दरी मिटवण्यासाठी खऱ्या अर्थाने सार्थक आहे. परंतु आजची सर्वात गंभीर बाब ही आहे कीआजच्या काळातील या कठीण आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्यामध्ये एकवाक्यता नाही. कुटुंबात जिथे एकीकडे प्रेम आणि सहकार्य असते तिथे काहीनाकाहीतरी मतभेद आणि भांडणे देखील असतात. परंतु जेव्हा संकटांचा सामना करायचा असेल तेव्हा सर्वांनी एकत्र येवून त्या संकटांचा सामना करायचा आणि त्या यशाचे सर्वांनी भागीदार व्हायचे ही त्या कुटुंबाची प्रेरणा असते. परंतु आमच्यातील विभाजनदरीमुळे मानवजातीसमोरील या संघर्षाला अधिक आव्हानात्मक बनवले आहेही फारच चिंतेची बाब आहे.

 

 

 

मित्रांनो,

 

मी आव्हानांविषयी बोलत आहे त्यांची संख्या खूप मोठी आहे आणि विस्तारही व्यापक आहे. येथे मी फक्त तीन प्रमुख आव्हानांविषयी बोलेन, जी मानव सभ्यतेसाठी सर्वात मोठा धोका निर्माण करणार आहे. पहिला धोका म्हणजे हवामान बदल. हिमनद्या मागे जात आहेतआर्क्टिकमधील बर्फ वितळत आहे. कित्येक द्वीपसमूह बुडाले आहेत किंवा बुडणार आहेत. हवामान बदलाचा परिणाम दिवसेंदिवस वाढत आहे – खूप गर्मी आणि अतिशय थंडअतिशय पाऊस आणि पूर किंवा दुष्काळ. या परिस्थितीत आपण सर्वांनी आपल्या संकुचित विचारांमधून बाहेर पडून एकजुट होणे आवश्यक होते. पण असे झाले काआणि नाही तर मग काआणि आपण या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी काय करू शकतोप्रत्येकजण म्हणतो की कार्बन उत्सर्जन कमी झाले पाहिजे. परंतु असे किती देश आहेत जे विकसनशील देश आणि समाजासाठी उपयुक्त तंत्रज्ञान प्रदान करण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री पुरविण्याकरीता मदत करू इच्छितात.

 

भारतीय परंपरेमधील निसर्गासोबतच्या सखोल समन्वयाबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. हजारो वर्षांपूर्वीआमच्या शास्त्रांमध्येमानव समाजाला हे सांगितले आहे की, “भूमि मातापुत्रो अहम् पृथ्व्याः म्हणजेच आपण मानवी मुले भूमातेची मुले आहोत. आपण जर पृथ्वीची मुलं आहोत तर आज मनुष्य आणि निसर्ग यांच्यात युद्ध का सुरु आहे?

 

 

 

हजारो वर्षांपूर्वी भारतात लिहिलेले सर्वात पहिले उपनिषद ‘इशोपनिषद’ यामध्ये सुरवातीलाच गुरूने आपल्या शिष्यांना परिवर्तनशील जगाच्या संदर्भात सांगितले आहे की, ‘तेन त्यक्तेन भुन्जीथामागृधःकस्यस्विद्धनम्। म्हणजेचजगामध्ये वास करत असताना आपल्या बलिदानांचा आनंद घ्या आणि दुसऱ्याच्या मालमत्तेचा लोभ करू नका. अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी अपरिग्रह म्हणजेच गरजेइतकाच वापर याला आपल्या सिद्धांतांमध्ये प्रमुख स्थान दिले होते. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा विश्वस्थ व्यवस्थेचा सिद्धांत देखील आवश्यकता म्हणजेच गरजेनुसार उपयोग आणि उपभोग करण्यावर होता. लोभ, आधारित शोषण याचा त्यांनी विरोध केला. आवश्यकतेनुसार बलिदानाचा वापर करत असतांना आपण आता लोभाच्या इतक्या आहारी गेलो आहोत की आपण निसर्गाचे शोषण करत आहोतआपण इथपर्यंत कसे पोहोचलो हा खरच विचार करण्याचा विषय आहे. ही आपली प्रगती आहे की अधोगतीआपल्या बुद्धीची ही दुरावस्थाआपल्या स्वार्थाचे भयंकर चित्रआपल्याला आत्म चिंतन करण्यास तुम्हाला भाग पाडत नाही का?

 

पर्यावरणातील भयंकर परिणामांचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्याचे अचूक उत्तर – प्राचीन भारतीय मानव आणि निसर्गामधील सामंजस्यात दिसून येईल. एवढेच नाही तरयोग आणि आयुर्वेद यासारख्या भारतीय परंपरां केवळ आपला समग्र दृष्टीकोन बदलेलआपल्यातील दरी भरून काढेल तसेच आपल्याला शारीरिकमानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य आणि संतुलन देखील प्रदान करेल. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी माझ्या सरकारने एक खूप मोठे अभियानएक खूप मोठे लक्ष्य देशासमोर ठेवले आहे. वर्ष 2022 पर्यंत आम्हाला 175 जीडब्लू नवीकरणीय उर्जेचे उत्पादन करायचे आहे. मागील अंदाजे तीन वर्षांमध्ये ६० जीडब्लू म्हणजेच या लक्ष्याचा एक तृतीयांशहून अधिक उद्देश्य आम्ही पूर्ण केले आहे.

 

2016 मध्ये भारत आणि फ्रान्स यांनी संयुक्तपणे एका नवीन आंतरराष्ट्रीय करार आधारित संघटनेची कल्पना केली होती. हे क्रांतिकारी पाऊल आता एक यशस्वी प्रयोगात बदलले आहे. आंतरराष्ट्रीय सौर युती म्हणूनआता आवश्यक त्या संमतीनंतर ही आता वास्तवात कार्यरत आहे. फ्रांसचे राष्ट्रपती मॅक्रो आणि माझ्या संयुक्त आमंत्रणावरून या युतीच्या सदस्य देशांचे नेते यावर्षी मार्च महिन्यात नवी दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या परिषदेत सहभागी होणार आहेत याचा मला खूप आनंद होत आहे.

मित्रांनो,

 

दुसरे मोठे आव्हान आहे दहशतवाद. या संदर्भातील भारताची चिंता आणि संपूर्ण जगातील मानव जातीला असलेला वाढता धोका आणि त्याचे दिवसेंदिवस बदलणारे स्वरूप या सर्वांपासून तुम्ही चांगलेच अवगत आहात. मी इथे केवळ तुमचे दोन गोष्टींकडे लक्ष वेधू इच्छितो. दहशतवाद जितका धोकादायक आहे तितकाच भयंकर आहे चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद यामध्ये निर्माण केलेला कृत्रिम फरक. दुसरा समकालीन गंभीर मुद्दा ज्याकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो तो म्हणजेसुशिक्षित आणि समृद्ध युवकांमध्ये अमुलाग्र बदल होऊन ते दहशतवादाकडे आकर्षित होणे. मला आशा आहे कीया व्यासपीठामध्ये दहशतवाद आणि हिंसाचारामुळे उत्पन्न झालेल्या विभाजनांमुळे आपल्या समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांवर आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा होईल.

 

 

 

मित्रांनो,

 

अनेक समाज आणि देश जास्तीत जास्त आत्मकेंद्रित होत चालले आहेत हे मला तिसरे आव्हान वाटते. असे वाटते कीजागतिकीकरण या शब्दाच्या विरुद्ध घडामोडी घडत आहेत. अशा वर्तणुकीच्या आणि चुकीच्या प्राधान्यांचे दुष्परिणाम हे हवामानबदल आणि दहशतवादाच्या धोक्यांपेक्षा कमी धोकादायक नाही. खर पाहता प्रत्येकजण परस्परांशी जोडलेल्या जगाविषयी बोलत आहे पण जागतिकीकरणाची चमक कुठेतरी कमी होत आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे आदर्श आजदेखील सर्वमान्य आहेत. जागतिक व्यापार संघटनेचे स्वरूप देखील व्यापक आहे.परंतु दुसऱ्या जागतिक युद्धानंतर स्थापन केलेल्या जागतिक संघटनांची रचनायंत्रणा आणि कार्यप्रणाली आजच्या मानवाच्या आकांक्षा आणि स्वप्नांना आजच्या वास्तविकतेनुसार प्रतिबिंबित करतात का?

 

 

 

या संस्थांच्या जुन्या व्यवस्थेत आणि विशेषत: आजच्या जगात विकसनशील देशांच्या गरजायात एक मोठी दरी निर्माण झाली आहे. जागतिकीकरणाच्या विरोधातसंरक्षणवादांची शक्ती उदयास आली आहे. त्यांचा मानस जागतिकीकरणापासून स्वत:ला अलिप्त ठेवणे एवढाच नाही तर जागतिकीकरणाचा मूळ हेतू बदलणे हा आहे आहे. याचा एक परिणाम म्हणजे नवीन प्रकारचे दर आणि नॉन-टेरिफ अडथळे दिसून येत आहेत. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय व्यापार करार आणि वाटाघाटींना जणू खीळ बसली आहे. बऱ्याच देशांमध्ये सीमेपार आर्थिक गुंतवणूक कमी झाली आहे. आणि जागतिक पुरवठा श्रुंखला देखील बंद झाली आहे. जागतिकीकरणा विरुद्ध या चिंताजनक परिस्थितीचे उत्तर हे वेगेळेपणात नाही. याचे उत्तर परिवर्तनाला समजून त्याला स्वीकारण्यात आहे. बदलत्या काळानुरूप लवचिक धोरणे तयार करण्याची वेळ आहे. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते की,  “माझ्या घराच्या भिंती आणि खिडक्या सर्व बाजूंनी कधीच बंद नसाव्यात. सर्व देशांतील संस्कृतीची हवा माझ्या घरात मोकळेपणाने यावीपण या हवेमुळे माझे पाय माझ्या जमिनीपासून दूर जातील हे मला मान्य नाही. आजचा भारत महात्मा गांधींच्या याच विचारांचे आचरण करत संपूर्ण आत्मविश्वासाने आणि निर्भयपणे विश्वभरातील जीवनदायी लहरींचे स्वागत करत आहे.

मित्रांनो,

 

भारताची लोकशाही देशांची स्थिरतानिश्चितता आणि सतत विकासाचा मूळ आधार आहे. धर्मसंस्कृतीभाषावेश-भूषा आणि विविध खाद्यसंस्कृतींनी संपन्न भारतासाठी लोकशाही ही केवळ एक राजकीय व्यवस्था नाही तर एक जीवन शैली आहे. विविधतेतील एकतेला सौहार्दसहकार्य आणि संकल्पाच्या एकतेमध्ये बदलण्यासाठी लोकशाही आणि स्वातंत्र्याचे महत्व काय आहे हे आम्हाला चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. भारतातील लोकशाही ही केवळ आमच्या विविधतांचे पालन-पोषण करत नाहीतर सव्वाशे कोटींपेक्षा अधिक भारतीयांच्या आशाआकांक्षाअपेक्षा आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीत्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक परिस्थितीमार्गदर्शक आणि आराखडा प्रदान करते.

 

 

 

लोकशाही मूल्य आणि समावेशक आर्थिक विकास आणि प्रगती मधील दरी दूर करण्याची संजीवनी शक्ती आहे. भारताच्या साठ कोटी मतदारांनी तीस वर्षांनी प्रथमच 2014 मध्ये केंद्रात सरकार स्थापन करण्यासठी एखाद्या राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत दिले. आम्ही कोणताही ठराविक वर्ग किंवा ठराविक लोकांच्या विकासाचा नाही तर सर्वांच्या विकासाचा संकल्प केला आहे. माझ्या सरकारचे उद्दिष्ट आहे – सबका साथ सबका विकास. प्रगतीसाठी आमचा दृष्टीकोन समावेशक आहेआमचे अभियान समावेशक आहे. हे समावेशी दर्शन माझ्या सरकारच्या प्रत्येक धोरणाचे प्रत्येक योजनेचा आधार आहे. मग ते पहिल्यांदा कोट्यावधी लोकांचे बँक खाते उघडून आर्थिक समावेश करणे असोअथवा प्रत्येक गरीबापर्यंतप्रत्येक गरजूपर्यंत डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे थेट लाभ हस्तांतरण असो किंवा लिंग न्यायासाठी बेटी बचाओ – बेटी पढाओ’ असो.

 

जेव्हा सर्व एकत्रित चालू शकतील तेव्हाच प्रगती ही प्रगती असेल आणि खऱ्या अर्थाने सर्वांचा विकास झालेला असेल असे आम्हाला वाटते. आम्ही आमच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांमध्ये केवळ छोटे मोठे बदल करत नसून सर्वोतमुखी बदल घडवून आणत आहोत. आम्ही जो मार्ग निवडला आहे तो सुधारकार्य आणि परिवर्तनाचा आहे. आज आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेला गुंतवणुकीसाठी ज्याप्रकारे सुलभ केले आहे त्याला कोणतीही तोड नाही. त्याचा परिणाम म्हणजे आज भारतात गुंतवणूक करणेभारतात प्रवास करणेभारतामध्ये काम करणेभारतामध्ये उत्पादन करणेआणि भारतातून आपली उत्पादने आणि सेवा जगभर निर्यात करणेसर्व काही पूर्वीपेक्षा बरेच सोपे झाले आहे. आम्ही परवाना राज संपवण्याचा विडा उचलला आहे. लाल फितीतला कारभार संपवून आम्ही त्यांच्यासाठी पायघड्या पसरवत आहोत. अर्थव्यवस्थेतील जवळजवळ सर्व क्षेत्र परदेशी थेट गुंतवणुकीसाठी खुली केली आहेत. 90% पेक्षा अधिक क्षेत्रात स्वयंचलित मार्गाने गुंतवणूक शक्य आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन शेकडो सुधारणा केल्या आहेत. व्यवसायप्रशासनआणि सामान्य माणसाच्या दैनंदीन जीवनात अडथळे आणणारे 1400 पेक्षा अधिक जुने कायदेनियम आम्ही रद्द केले.

 

स्वतंत्र भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच देशात एक एकीकृत कर व्यवस्था वस्तू आणि सेवा कर – जीएसटी – रुपात लागू केली आहे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. भारतामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही केलेले संकल्प आणि आमच्या प्रयत्नांचे जगभरातील व्यवसाय समुदायाकडून स्वागत करण्यात आले. भारतामध्ये लोकशाहीलोकसंख्या आणि गतिशीलता एकत्रित येवून विकास करत आहेतनियतीला साकारत आहेत. दशकांच्या नियंत्रणामुळे भारतातील लोकांच्याभारतातील युवकांच्या क्षमतांना बेड्या पडल्या होत्या. परंतु आताआमच्या सरकारच्या निर्भीय धोरणांमुळेप्रभावी पावलांमुळे परिस्थिती बदलली आहे. सुमारे साडे तीन वर्षाच्या काळात जे दूरगामी आणि मोठे परिवर्तन भारतात घडले आहेत आणि घडत आहेत ते सव्वाशे कोटी भारतीयांच्या अपेक्षात्यांचा पुरुषार्थ आणि परिवर्तनाला स्वीकार करण्याच्या त्यांच्या क्षमतेचे हे यशोगान आहे. आता भारतातील लोकभारताचे युवक 2025 मध्ये 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या निर्मितीमध्ये योगदान देण्यास सक्षम आहेत.

 

एवढेच नाहीतरजेव्हा नाविन्य आणि उद्योजकतेच्या माध्यमातून ते नोकरी करणारे नाही तर रोजगार निर्मिते बनतील तेव्हा त्यांच्यासाठीत्यांच्या देशासाठी आणि त्याच्या व्यवसायासाठी कित्येक मार्ग खुले होतील याची केवळ कल्पनाच करू शकतो. आपण सर्व जागतिक नेते आहातआणि जागतिक बदलत्या घडामोडींमुळेभारताच्या मानांकनात आणि क्रमवारीत झालेल्या सुधारणापुढे जाण्यासाठी आम्ही जो मार्ग निवडला आहे – हे  सर्व तुम्हाला माहित आहे. परंतु या सर्व आकड्यांपेक्षा जास्त महत्वाचे हे आहे कीभारतातील लोकांनी आमच्या धोरणांचेआपल्या भविष्यातील बदलासाठीचे नवीन उपक्रम आणि चांगल्या भविष्यातील स्वर्णिम संकेतांचे स्वागत केले आहे. स्वेच्छेने अनुदान नाकारणे,  किंवा निवडणूकांगणिक लोकशाही पद्धतीने आमची धोरणे आणि सुधारणांवर आपला विश्वास व्यक्त करणे असो – अशी अनेक उदाहरणे आहेत जी भारतात या अभुतपुर्व बदलांच्या व्यापक समर्थनाला दुजोरा देत आहेत.

 

 

 

मित्रांनो,

 

जागतिक स्तरावरील सर्व प्रकारच्या दरी आणि सर्व प्रकारची विभाजने पाहताआपल्या सामायिक भविष्यासाठी आपण अनेक दिशांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जगातील शक्तीशाली देशांमध्ये सहकार्याचे संबंध असणे गरजेचे असले तरी देशांदेशांमधील स्पर्धांचे वातावरण त्यांच्यात भिंत उभी करणार नाही याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्यातील मतभेद बाजूला सारून एका मोठ्या दृष्टीकोनांतर्गत एकत्र येवून काम करायला हवे. नियमांनुसार आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे पालन करणे हे आधीपेक्षा जास्त आवश्यक आहे ही आता दुसरी गरज आहे. विशेषतः जेव्हा आपण अशा कालखंडातून जात आहोत जिथे आपल्या चहुबाजूंना होणारे बदल अनिश्चितता निर्माण करू शकताततेव्हा आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे योग्य पालन करणे आवश्यक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातील प्रमुख राजकीयआर्थिक आणि सुरक्षिततेशी संबंधित संस्थांमध्ये सुधारणांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांच्यामध्ये सहभाग  आणि लोकशाहीला आजच्या स्थितीनुसार प्रोत्साहन दिले पाहिजे. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक आर्थिक प्रगती अधिक वेगवान करणे. यासाठीजागतिक आर्थिक वाढीसाठीचे अलीकडचे संकेत उत्साहजनक आहेत. तंत्रज्ञान आणि डिजिटल क्रांती अशा नव्या उपाययोजनांची शक्यता वाढवतात ज्यामुळे आपण गरिबी आणि बेरोजगारीसारख्या जुन्या समस्या आणि आव्हानांचा सामना करू शकू.

 

 

 

मित्रांनो,

 

या प्रकारच्या प्रयत्नांमध्ये भारताने नेहमीच सहकार्य केले आहे. आजपासून नाहीस्वातंत्र्याच्या कालखंडात नाहीतर पुरातन काळापासून भारत आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रत्येकाला सहकार्य करत आहे. मागील शतकात जेव्हा जग दोन विश्व युद्धांच्या संकटातून गेले तेव्हा आपला कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसतानाहीकोणतेही  आर्थिक किंवा प्रादेशिक हित नसतांनाही शांतता आणि मानवतेच्या उच्च आदर्शांचे संरक्षण करण्यासाठी भारत उभा ठाकला होता. दीड लाखांहून अधिक भारतीय शहीद झाले. हे तेच आदर्श आहेत ज्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाल्यानंतर भारताने संयुक्तराष्ट्र संरक्षण शांततेत आपल्या सर्वाधिक सैनिकांचे योगदान दिले होते. हे तेच आदर्श आहेत ज्यांची प्रेरणा आणि शक्ती आम्हाला संकट आणि नैसर्गिक संकटसमयी आपले  शेजारी आणि मानवतेला मदत करण्यासाठी प्रोत्साहित करतात. मग तो नेपाळमधील भूकंप असोइतर शेजारी अथवा मित्र देशातील पूरवादळ किंवा अन्य नैसर्गिक संकट. प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून मदत करणे हे भारतने नेहमीच आपले सर्वात महत्त्वाचे कर्तव्य समजले आहे. यमन मधील हिंसाचारात जेव्हा भारतासोबतच जगातील अनेक देशांचे नागरिक होरपळत होते तेव्हा आम्ही आमच्याकडील साधनसामुग्रीचा वापर करत केवळ भारतीय नागरिकांनाच नाही तर इतर देशांच्या  जवळजवळ 2 हजार नागरिकांनाही तिथून सुरक्षित बाहेर काढले. स्वतःला एक विकसनशील देश असूनही भारताने विकास सहकार्यातक्षमता निर्माण कार्यात स्वतःहून सहकार्य केले आहे. आफ्रिकेमधील देश असोकिंवा भारताचे शेजारीकिंवा दक्षिण-पूर्व आशियातील देशकिंवा मग प्रशांत महासागरातील बेटेसर्वांसोबत आमचा सहकार्याचा आराखडा आणि आमचे प्रकल्प त्या देशांच्या गरजांवर आधारित असतात.

 

 

 

मित्रांनो,

 

भारताची कोणतीही राजकीय किंवा भौगोलिक महत्वाकांक्षा नाही. आम्ही कुठल्याही देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण करत नाही तर त्या देशाच्या विकासकार्यात त्याला सहकार्य करतो.भारतामध्ये वैविध्यपूर्ण परिस्थितीत आनंदाने मिळूनमिसळून राहण्याचा परिणाम म्हणजे आमचा बहु-सांस्कृतिक जग आणि बहु-ध्रुवीय विश्व-व्यवस्थेवर विश्वास आहे. लोकशाहीविविधतेचा सन्मानसौहार्द्रा आणि समन्वयसहयोग आणि संवाद यासर्वांमुळे सर्व विवाद आणि दरी मिटू शकतात हे भारताने सिद्ध केले आहे. शांततास्थिरता आणि विकासासाठी भारताचा हा हुकमी एक्का आहे. एवढेच नाहीतरएका अनिश्चित आणि अस्थिर देशापेक्षानिश्चितस्थिरपारदर्शी आणि पुरोगामी भारत जगासाठी नेहमीच एक चांगली बातमी घेऊन येईल. भारत ज्याप्रकारे प्रचंड विविधता असूनही समतोल आहे त्यामुळे तो नेहमी एकीकरणात्मक आणि सुसंवाद साधेल. आपल्यासाठी नाहीआपल्या देशासाठी नाही तर भारतीय नागरिकभारताच्या विचारवंतांनीऋषि मुनींनी प्राचीन काळापासूनच सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयासर्वे भद्राणी पश्यंतुमाकश्चिद् दुख भाग भवेत् – म्हणजे सर्वांनी आनंदित व्हावेसर्वांनी आरोग्यदायी राहावे,सगळ्यांचे कल्याण होऊदे आणि कोणीही दु:खी होऊ नये हे स्वप्न पहिले आहे. आणि हा आदर्श प्राप्त करण्यासाठीया स्वप्नांना साकार करण्यासाठी मार्ग देखील दाखवला आहे:

 

 

 

सहनाऽवतुसह नौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे।

 

तेजस्विनाधीतमस्तु मा विद्विषावहे।

 

 

 

या हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय प्रार्थनेचा अभिप्राय आहे की आपण सर्वांनी एकत्र येवून काम केले पाहिजेएकत्र पुढे मार्गक्रमण कराआपण एकत्रितपणे प्रतिभासंपन्न होऊआणि आपल्यामध्ये कधी द्वेषभावना निर्माण होणार नाही. मागील शतकातील महान भारतीय कवी आणि नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांनी अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गाची कल्पना केलीजिथे संकुचित विचारांमुळे जगाचे तुकडे पडणार नाहीत. चला आपण सर्वांनी मिळून एका अशा स्वर्गाची निर्मिती करूया जिथे सहकार्य आणि समन्वय असेलविभाजन आणि दरी नसेल. चला आपण सर्वांनी एकत्र येवून जगाला विभाजन आणि अनावश्यक भिंतीपासून मुक्त करूया.

 

 

 

मित्रांनो,

 

भारत आणि भारतीयांनी संपूर्ण जगाला एक कुटुंब मानले आहे. विविध देशांमध्ये भारतीय वंशाचे 30 दशलक्ष लोक राहतात. जेव्हा आम्ही संपूर्ण जगाला आपले कुटुंब मानले आहेतर जगासाठी देखील आम्ही भारतीय त्यांचे कुटुंब आहोत. मी तुम्हा सर्वांना सांगतो कीजर तुम्हाला ऐश्वर्यासह निरोगीपणा पाहिजे आहेतर भारतात या. जर आपण आरोग्यासह जीवनात समृद्धता इच्छितता तर भारतात याजर आपणास समृद्धीसह शांती हवी आहे तर भारतात राहा. तुम्ही भारतातभारतात तुमचे नेहमी स्वागतच होईल. मला तुम्हा सर्वांशी बोलण्याची मौल्यवान संधी दिल्याबद्दल मीजागतिक आर्थिक व्यासपीठाचेक्लॉज श्वाब आणि तुम्हा सर्वांचे मनपासून आभार मानतो.

 

खूप खूप धन्यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait

Media Coverage

When PM Modi Fulfilled A Special Request From 101-Year-Old IFS Officer’s Kin In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Under Rozgar Mela, PM to distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits
December 22, 2024

Prime Minister Shri Narendra Modi will distribute more than 71,000 appointment letters to newly appointed recruits on 23rd December at around 10:30 AM through video conferencing. He will also address the gathering on the occasion.

Rozgar Mela is a step towards fulfilment of the commitment of the Prime Minister to accord highest priority to employment generation. It will provide meaningful opportunities to the youth for their participation in nation building and self empowerment.

Rozgar Mela will be held at 45 locations across the country. The recruitments are taking place for various Ministries and Departments of the Central Government. The new recruits, selected from across the country will be joining various Ministries/Departments including Ministry of Home Affairs, Department of Posts, Department of Higher Education, Ministry of Health and Family Welfare, Department of Financial Services, among others.