पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘कोविड-19 व्यवस्थापन : अनुभव, उत्तम पद्धती आणि पुढची वाटचाल’ यावरच्या कार्यशाळेला संबोधित केले. भारतातले आरोग्य क्षेत्रातले तज्ञ, अधिकारी यांच्यासह अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूतान, मालदीव, मॉरिशस, नेपाळ, पाकिस्तान, सेशल्स, श्रीलंका या दहा शेजारी राष्ट्रामधले आरोग्य क्षेत्रातले तज्ञ, अधिकारीही कार्यशाळेला उपस्थित होते.
महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थानी दिलेल्या सहकार्याची आणि दाट लोक वस्तीच्या भागात समन्वित प्रतिसादासह आव्हान पेलल्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
महामारीशी लढा देण्यासाठी तातडीचा निधी तसेच औषधे, पीपीई कीट,चाचणी साधने यांची देवाण घेवाण करण्यासाठी कोविड-19 आपत्कालीन प्रतिसाद निधीच्या निर्मितीचे पंतप्रधानांनी स्मरण केले.चाचण्या, संसर्ग नियंत्रण आणि वैद्यकीय टाकाऊ कचरा व्यवस्थापन याबाबत परस्परांच्या अनुभवाच्या आणि त्यातून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या देवाण घेवाणीची त्यांनी दखल घेतली. सहयोगाची अमुल्य भावना या महामारीने दिली आहे. निर्धार आणि खुलेपणा यातून जगातल्या सर्वात कमी मृत्यू दर असलेल्या देशांपैकी एक आपण राहिलो असून हे प्रशंसेला पात्र आहे. आपला प्रांत आणि जगाचे लक्ष वेगवान लसीकरणाकडे लागले आहे.यामध्येही आपण तेच सहकार्य आणि सहयोगाची भावना कायम राखायला हवी असे पंतप्रधान म्हणाले.
आपल्या प्रांतांमध्ये आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशाने विनंती केल्यास डॉक्टर आणि परिचारिकांना तत्काळ प्रवास करण्याच्या दृष्टीने विशेष व्हिसा योजना तयार करण्याचे पंतप्रधानांनी या देशांना सुचवले. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत प्रादेशिक हवाई रुग्ण वाहिकेसाठी आपली नागरी हवाई वाहतूक मंत्रालये समन्वय साधू शकतात का अशी विचारणाही त्यांनी केली. आपल्या जनतेमध्ये कोविड- 19 लसीकरणाच्या परिणामकारते विषयीचा डाटा अभ्यासणे, त्याचे संकलन करणे यासाठी आपण प्रादेशिक मंच तयार करू शकतो असेही त्यांनी सुचवले. भविष्यात महामारी रोखण्यासाठी, साथरोगाबाबत आपण तंत्र आधारित प्रादेशिक जाळे आपण करू शकतो का असेही त्यांनी विचारले.
कोविड-19 व्यतिरिक्त यशस्वी सार्वजनिक आरोग्य धोरण आणि योजना यांची परस्परांशी देवाणघेवाण करण्याची सूचना त्यांनी केली. आपल्या प्रांतासाठी भारतातून आयुष्मान भारत आणि जन आरोग्य योजना यासाठी उपयुक्त असल्याचे ते म्हणाले. 21 वे शतक हे आशियाई शतक असेल तर दक्षिण आशियाई देशांच्या आणि हिंद महासागर देशांमधल्या अधिक समन्वयावाचून ते साध्य होणार नाही.महामारीच्या काळात आपणा सर्वांनी दाखवलेली प्रादेशिक ऐक्य भावना असा समन्वय शक्य असल्याचे सिद्ध करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.