आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केनियाच्या नैरोबी येथील श्री कच्छी लेवा पटेल समाजाच्या रौप्य महोत्सवी समारंभास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी विविध कल्याणकारी कृतींमध्ये कच्छी लेव पटेल समाजाने दिलेल्या योगदान आणि पूर्व आफ्रिकेचा विकास करण्या बाबत कौतुक केले. केनियाच्या स्वातंत्र्य चळवळीत भारतीय समाजाच्या सदस्यांच्या भूमिकेची देखील त्यांनी आठवण करून दिली.
२००१ मध्ये कच्छमध्ये भूकंप झाल्यानंतर कच्छी समाजाने, कच्छच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य दिले आहे . विशेषतः कच्छमध्ये भूकंप झाल्यानंतर पुनर्निर्माण व पुनर्वसनामध्ये त्यांची भूमिका होती. पंतप्रधान म्हणाले की, कच्छ ज्याला एक निर्जन ठिकाण समजले जाते, त्याला मुख्य पर्यटन स्थळ म्हणून रूपांतरित करण्यात आले आहे. “. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना कच्छ प्रदेशातील दूरगामी भागांना नर्मदाचे पाणी आणण्यासाठी त्यांच्या सरकार ने सातत्याने केलेल्या प्रयत्न्नां बद्दल सांगितले.
पंतप्रधानांनी या क्षेत्रातील विकासाची कार्ये पार पाडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार ने केलेल्या दुहेरी प्रयत्नांवर प्रकाश झोत टाकला, या दुहेरी इंजिनची ताकद दाखवली. “गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात हजारो कोटी रुपये गुंतवणुकी द्वारे मिळाले आहेत”, असेही ते म्हणाले. गुजरातमध्ये कच्छ आणि जामनगर दरम्यान प्रस्तावित रो-रो सेवेची माहिती ही गोळा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले .
पंतप्रधान भारत आणि आफ्रिकन देशांच्या सहकार्यात आणि भेटींमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. “भारत आफ्रिका परिषद आणि आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेची अलीकडेच भारतात बैठक झाली होती”, असेही ते म्हणाले. त्यांनी असेही नमूद केले की सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि स्वतः पंतप्रधान म्हणून त्यांनी 20 पेक्षा अधिक प्रसंगी अनेक आफ्रिकन देशांना भेटी दिल्या आहेत.
आपल्या भाषणादरम्यान, पंतप्रधानांनी भारतातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अनुभव घेण्यासाठी जानेवारी 201 9 मध्ये आयोजित कुंभमेळ्याच्या निमित्ताने भारताला अजून पर्यंत भेट न दिलेल्या लोकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी श्री कच्छी लेवा पटेल समाजाच्या नैरोबी-वेस्ट कॉम्प्लेक्सच्या रौप्य महोत्सवी समारंभाच्या निमित्ताने या संमेलनाचे अभिनंदन केले.