राजस्थानमधील पाचपदरा येथे राजस्थान तेलशुध्दीकरण प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाल सार्वजनिक सभेला मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अभिनंदन केले. काही दिवसांपूर्वीच देशभरामध्ये मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला, असे सण समृध्‌दीचे प्रतीक असतात, आता या सणानंतर लगेचच या प्रकल्पाचा प्रारंभ होत आहे. एका दृष्टीने या प्रकल्पामुळे राजस्थानच्या असंख्य लोकांच्या जीवनामध्ये आनंद आणि समृध्दी घेवून येणारा ठरणार आहे.

सध्या “संकल्प ते सिध्दी”चा कार्यकाळ आहे, त्यामुळे आपण विशिष्ट लक्ष्य निश्चित करून स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनापर्यंत म्हणजे 2022 पर्यंत ते ध्येय पूर्ण करण्यासाठी अथक कार्य करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उपस्थितांना केले.

पंतप्रधानांनी यावेळी माजी उपराष्ट्रपती आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री भैरो सिंह शेखावत यांनी केलेल्या कार्याचे स्मरण केले. आधुनिक राजस्थान घडवण्यासाठी भैरो सिंह शेखावत यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे आहे, असे ते म्हणाले. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या प्रकृतीमध्ये लवकरच सुधारणा व्हावी, अशी कामना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आपल्या देशासाठी जसवंत सिंह यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेखही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.

राज्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या संकटकाळी सर्वसामान्य जनतेला केलेल्या भरघोस मदतीबद्दल पंतप्रधानांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे कौतुक केले.

केंद्र सरकार सशस्त्र दलासाठी “वन रँक वन पेंशन” लागू करण्यासाठी कटिबध्द असून त्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी जन धन योजनेचा उल्लेख करून गरीबांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचणे आता सुनिश्चित झाल्याचे सांगितले. स्वयंपाकाच्या गॅसच्या उज्ज्वला योजनेचा उल्लेख करून त्यांनी आपले सरकार ज्या गावांमध्ये अद्याप वीज पोहोचली नाही अशा 18,000 गावांच्या विद्युतीकरण्यासाठी उल्लेखनीय कार्य करत आहे, असेही सांगितले.

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राज्याच्या हितासाठी केलेल्या कार्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.

 

 

Click here to read PM's speech 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Budget touches all four key engines of growth: India Inc

Media Coverage

Budget touches all four key engines of growth: India Inc
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 फेब्रुवारी 2025
February 03, 2025

Citizens Appreciate PM Modi for Advancing Holistic and Inclusive Growth in all Sectors