Shri Aurobindo was man of action, a philosopher, a poet; there were so many facets to his character and each of them was dedicated to the good of the nation and humanity: PM
Auroville has brought together men and women, young and old, cutting across boundaries and identities: PM Modi
Maharishi Aurobindo’s philosophy of Consciousness integrates not just humans, but the entire universe: PM
India has always allowed mutual respect & co-existence of different religions and cultures: PM Modi
India is home to the age old tradition of Gurukul, where learning is not confined to classrooms. Auroville too has developed as a place of un-ending and life-long education: PM

ऑरोविलेच्या सुवर्ण महोत्सवी सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहतांना मला आनंद होत आहे. भारताच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाबाबत अरविंद यांची दूरदृष्टी आपल्यासाठी आजच्या काळातही स्फूर्तीदायी आहे.

ऑरोविले हा त्या दूरदृष्टीचा आविष्कार आहे. गेली पाच दशके ऑरोविले, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि आध्यात्मिक नाविन्यतेचे केंद्र म्हणून उदयाला आले आहे.

मित्रहो,

अरविंद यांचे व्यापक विचार आणि कृती यांचे स्मरण आज करणे महत्वाचे आहे.

कृतीशील व्यक्तित्व, विचारवंत, कवी, असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते. यातला प्रत्येक पैलू, राष्ट्र आणि मानवतेच्या हिताला समर्पित होता.

रवींद्रनाथ टागोर यांच्या शब्दात सांगायचे झाले तर,

ओ, अरविंद, तुम्हाला प्रणाम,

मित्रहो,

ऑरोविले हे वैश्विक शहर आहे. मानवी ऐक्याची जाणीव हा याचा उद्देश आहे.

इथे जमलेला विशाल जनसमुदाय म्हणजे या कल्पनेचे प्रतिबिंब आहे. अनेक युगापासून भारत हा जगासाठी आध्यात्मिक स्थान राहिला आहे. नालंदा आणि तक्षशीला या महान विद्यापीठात जगभरातले विद्यार्थी दाखल होत असत. जगातल्या अनेक महान धर्मांचा उदय या देशातच झाला. त्यांनी जनतेला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, दैनंदिन व्यवहारात आध्यात्माच्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

महान भारतीय परंपरा ओळखत, संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस आंतरराष्टीय योग दिन म्हणून नुकताच जाहीर केला. ऑरोविलेने, महिला आणि पुरुष, तरुण आणि वृद्ध, या सर्वाना, सीमेची बंधने तोडून एकत्र आणले.

दैवी मातेने ऑरोविलेची सनद फ्रेंचमधे आपल्या हाताने लिहिली असून, त्यामध्ये ऑरोविलेसाठी पाच तत्वे तिने निश्चित केली.

पहिले तत्व म्हणजे ऑरोविले हे सर्व मानवतेसाठी आहे. आपल्या प्राचीन वसुधैव कुटुंबकम म्हणजे अवघे जग म्हणजे एक कुटुंब आहे याचेच प्रतिबिंब यात आपल्याला दिसते.

1968 मध्ये ऑरोविलेच्या उद्‌घाटन समारंभाला 124 देशातले प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती मला होती. आज मला समजले की 49 देशातले 2400 पेक्षा जास्त प्रतिनिधी त्यावेळी उपस्थित होते.

यातूनच दुसरे तत्व आपल्याला लक्षात येते. दैवी, पवित्र चैतन्याची स्वेच्छेने सेवा करू इच्छिणारी व्यक्ती ऑरोविलेमध्ये राहण्यासाठी हक्क प्राप्त करते.

महर्षी अरविंद यांचे चैतन्याचे तत्वज्ञान केवळ मानव जातीलाच नव्हे तर संपूर्ण जगाला एकत्र आणते. प्राचीन ईशावास्य उपनिषदामध्ये हेच म्हटले आहे. महात्मा गांधीजीनी याचा अर्थ सांगितला होता की, अगदी अणुपेक्षा लहान कणही हा पवित्र आहे.

ऑरोविलाचे तिसरे तत्व आहे ते म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा हा पूल आहे. ऑरोविलाची 1968 मधे स्थापना झाली तेव्हा त्यावेळी भारत आणि जगाकडे पाहता, जग शीत युद्धात आणि वेग वेगळ्या कप्प्यात विखुरले होते. या जगाला व्यापार, प्रवास आणि दळणवळण याद्वारे जोडण्याचे ऑरोविलाची कल्पना होती.

संपूर्ण मानवजात एकाच छोट्या भागात सामावण्याची ऑरोविलाची दृष्टी होती. भविष्यात एकात्मिक जग पाहण्याचा दृष्टीकोन यातून प्रतित होतो. ऑरोविलाचे चौथे तत्व म्हणजे समकालीन जगाचा आध्यात्मिक आणि भौतिक दृष्टीकोन यांची सांगड घालण्याचे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जग जशी प्रगती करेल तस तशी सामाजिक स्थैर्यासाठी आध्यात्मिक मार्गदर्शनाची गरज वाढत जाईल.

ऑरोविले इथे भौतिक आणि आध्यात्मिक हे दोन्ही पैलू सलोख्याने नांदतात.

पाचवे आणि मुलभूत तत्व आहे ते ऑरोविले हे अविरत शिक्षणाचे आणि सातत्याने प्रगती करण्याचे स्थान राहील ज्यामुळे तिथे कधीच साचलेपणा येणार नाही.

मानवजातीच्या प्रगतीसाठी अखंड विचार आणि पुनर्विचार यांची आवश्यकता असते ज्यामुळे मानवी मन एकाच कल्पनेत साचेबद्ध राहत नाही.

ऑरोविलेने मानवी वैविध्य आणि कल्पना व्यापक प्रमाणात एकत्र आणल्याने संवाद आणि चर्चा नैसर्गिक राहते.

भारतीय समाज हा मुल्य वैविध्यपूर्ण आहे. त्याला तत्वज्ञानाची बैठक आहे आणि या समाजाने नेहमीच संवादाला प्रोत्साहन दिले आहे. ऑरोविलेने जागतिक विविधता एकत्र आणून या प्राचीन भारतीय परंपरेचे दर्शन घडवले आहे.

भारताने परस्पर आदर आणि विविध धर्म आणि संस्कृती यांचे सह अस्तित्व नेहमीच जपले आहे. प्राचीन गुरुकुल परंपरेचे भारत हे माहेर घर आहे. गुरुकुल पद्धतीत शिक्षण हे केवळ शिक्षणाच्या वर्गापुरतेच मर्यादित न राहता, संपूर्ण जीवन हेच चालती बोलती प्रयोगशाळा मानली जाते. ऑरोविलाचाही अविरत आणि आजीवन शिक्षण घेण्याचे स्थान म्हणून विकास करण्यात आला आहे.

प्राचीन काळात, एखाद्या महान कार्याला सुरवात करण्यापूर्वी, आपले ऋषी मुनी यज्ञ करत असत.

बरोबर 50 वर्षापूर्वी इथे एकतेसाठी यज्ञ झाला होता. स्त्री-पुरुषांनी जगभरातून माती आणली होती. ही माती एकत्र करून एकोप्याचा प्रवास सुरु झाला.

गेली अनेक वर्षे ऑरोविलेमधून जगाने अनेक रूपाने सकारात्मकता अनुभवली.

मग ते अविरत शिक्षण असू दे, पर्यावरण, नवीकरणीय उर्जा, सेंद्रिय शेती, सुयोग्य इमारत निर्मिती तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन किंवा कचरा व्यवस्थापन असू दे, ऑरोविले या सर्वांत आद्य स्थानी राहिले.

देशात दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी आपण मोठे कार्य केले आहे. ऑरोविलेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त या दिशेने आपले प्रयत्न अधिक व्यापक कराल अशी आशा मी बाळगतो. शिक्षणाद्वारे युवा मनाची मशागत करणे ही अरविंद आणि माता यांना मोठी आदरांजली ठरेल.

आपल्यापैकी अनेकांना याची कदाचित जाणीव नसेल, पण मी सुद्धा शिक्षणाप्रती आपल्या प्रयत्नाचा अनुयायी आहे. अरविंद यांचे शिष्य किरीट भाई जोशी आणि माता हे प्रख्यात शिक्षण तज्ञ होते.

मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना ते माझे शैक्षणिक सल्लागारही होते. ते आपल्यात नाहीत मात्र भारतातल्या शिक्षण क्षेत्रातले त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.

मित्रहो,

ऋग्वेदात म्हटले आहे,

“आनो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत: आमच्याकडे, चहू बाजूने उदात्त विचार येऊ देत.

देशाच्या सर्व सामान्य जनतेला सबल करणाऱ्या कल्पनांचा, ऑरोविलेकडून ओघ सतत सुरु राहू दे.

दूर दूरहून नव कल्पना घेऊन लोक येऊ देत. या सर्व कल्पनांच्या संयोगाचे ऑरोविला केंद्रस्थान ठरू दे.

ऑरोविले जगासाठी दीपस्तंभ ठरू दे.

मनाच्या संकुचित भिंती नष्ट करण्यासाठी आवाहन करणाऱ्या पालकत्वाच्या भूमिकेत ऑरोविला राहू दे. मानवी ऐक्याच्या संधी साजऱ्या करण्यासाठी ऑरोविले प्रत्येकाला निमंत्रित करत राहू दे.

महर्षी अरविंद आणि माता यांनी ज्या उदात्त हेतूने ऑरोविलेची स्थापना केली त्याच्या पूर्ततेसाठी, त्यांची प्रेरणा ऑरोविलेला सतत मार्गदर्शन करत राहो.

धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait

Media Coverage

Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to attend Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India
December 22, 2024
PM to interact with prominent leaders from the Christian community including Cardinals and Bishops
First such instance that a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India

Prime Minister Shri Narendra Modi will attend the Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India (CBCI) at the CBCI Centre premises, New Delhi at 6:30 PM on 23rd December.

Prime Minister will interact with key leaders from the Christian community, including Cardinals, Bishops and prominent lay leaders of the Church.

This is the first time a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India.

Catholic Bishops' Conference of India (CBCI) was established in 1944 and is the body which works closest with all the Catholics across India.