The setback in Chandrayaan landing has only made India’s resolve to land on the moon even stronger: PM Modi
Despite setbacks in landing, we must remember that Chandryaan had quite successful journey until now: Prime Minister Modi
We must not be disappointed that Chandrayaan was not able to land on the moon, instead, we need to learn from our mistakes and keep going till we are successful: PM Modi

इस्त्रो मुख्यालयातील नियंत्रण केंद्राशी चंद्रयान-2 मिशनचा संपर्क तुटला असला तरी या संपूर्ण प्रक्रियेचे  साक्षीदार राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंगळुरु येथील इस्रो वैज्ञानिकांनी सांगितले की, “आमच्या वैज्ञानिकांचा  भारताला  सार्थ अभिमान आहे! त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि नेहमीच भारताचा गौरव वृद्धिंगत केला आहे. हे धैर्यवान होण्याचे क्षण आहेत आणि आम्ही धैर्यवान होऊ! ”

वैज्ञानिकांचे मनोबल वाढवण्याच्या  त्यांच्या  वैयक्तिक प्रयत्नात पंतप्रधान म्हणाले, “देश तुमच्या बरोबर आहे, मी तुझ्याबरोबर आहे. प्रयत्न  उत्तम होते म्हणून इथपर्यंतचा प्रवास घडला”.

“तुम्ही असे लोक आहात जे  मायभूमीच्या विजयासाठी  संघर्ष करत आहात तिचा अभिमान बाळगण्याचा दृढ निश्चय  तुमच्या जवळ आहे.”

“काल, जेंव्हा चांद्रयान-2 चा नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटला तेंव्हा रात्री मी तुमची निराशा व भावना समजू शकत होतो. कारण मी तुमच्यातच होतो. संपर्क कसा तुटला वैगरे अनेक अनुत्तरीत प्रश्न  तुम्हाला पडले आहेत पण  मला खात्री आहे की, त्याची  उत्तरे तुम्हाला  सापडतील. मला माहित आहे की या  मागे  खूप मेहनत होती.”

“आम्हाला कदाचित या प्रवासात एखादा छोटासा धक्का बसला असेल, परंतु यामुळे आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठीचा आपला उत्साह कधीही  कमी होणार नाही”

यामुळे आपला संकल्प अधिक दृढ झाला आहे.

“आमच्या वैज्ञानिक बंधू -भगिनींच्या प्रयत्नांच्या फलनिष्पत्तीला संपूर्ण देश काल रात्री एकत्रित झाला होता.  आम्ही चंद्राच्या पृष्ठभागाच्या  अगदी जवळ आलो आहोत. हा  प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहे.”

“आम्हाला आमच्या अंतराळ कार्यक्रमाचा आणि वैज्ञानिकांचा अभिमान आहे, त्यांच्या कठोर परिश्रम व दृढनिश्चयामुळे केवळ आमच्या नागरिकांनाच नव्हे तर इतर राष्ट्रांचेही जीवनमान सुधारणार आहे. त्यांच्या अभिनव उत्कटतेचा हा त्यांचा परिणाम आहे की बऱ्याच लोकांना चांगली  आरोग्य सेवा आणि शिक्षणासहित दर्जेदार जीवनशैली मिळाली.”

“भारताला माहित आहे की, आनंद  मनविण्याच्या अनेक संधी आणि अनेक अभिमानाचे क्षण असतील.”

" अंतराळ कार्यक्रमाची  सर्वोत्कृष्ठता  येणे बाकी आहे."

“ आपल्याकडे  नवीन संशोधनासाठी नवीन सीमारेषा  आहेत आणि नवीन ठिकाणे आहेत. आम्ही  यशाची नवी शिखरे पादाक्रांत करू आणि यशाची  उंची वाढवू.”

“ मला आमच्या वैज्ञानिकांना असे  सांगायचे आहे की, भारत तुमच्याबरोबर आहे. तुमच्या वैज्ञानिक  संशोधन स्वभावाप्रमाणे, तुम्ही अशा ठिकाणी प्रवेश केला आहे जेथे यापूर्वी कोणीही कधी गेलेले  नाहीत.”

आमच्या वैज्ञानिक चमूने खूप परिश्रम घेतले आणि बराच  यशस्वी प्रवास केला ही शिकवण नेहमी आमच्या पाठीशी राहील.

“आजचे शिक्षण उद्या आम्हाला बळकट व उत्तम बनवेल”

“मी आमच्या अंतराळ वैज्ञानिकांच्या कुटुंबांचे आभार मानतो. त्यांचा मूक परंतु मौल्यवान पाठिंबा आमच्या प्रयत्नांमध्ये एक प्रमुख शक्ती आहे.”

“बंधू- भगिनींनो, कणखरपणा आणि दर्जा हे भारताच्या केंद्र स्थानी आहेत. आमच्या गौरवशाली इतिहासामध्ये आपण कदाचित  अशा काही क्षणांचा सामना केला असेल ज्यांनी आम्हाला माघार घ्यावी लागली असेल  परंतु आम्ही कधीही हार मानली  नाही. यामुळेच आपली सभ्यता उंच आहे. ”

 “आम्ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मला ठाऊक आहे की, कालच्या  संपर्क तुटण्यामुळे मिळालेली अयश्स्वीता इस्रो देखील मान्य करणार नाही. आणि त्यासाठीच हे मिशन अयशस्वी ठरत नाही ”

“उद्या एक नवीन पहाट होईल. आजपेक्षाही उत्तम. परिणामांची चिंता न करता आपण पुढे जाऊ आणि हा आपला इतिहास आहे.”

“आम्ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.  इस्त्रोही  अशा प्रयत्नांना सोडण्यास तयार नाही”

माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमची स्वप्ने माझ्यापेक्षा उंच आहेत. आणि मला तुमच्या आशांवर पूर्ण विश्वास आहे.

तुमच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी मी तुम्हाला भेटत आहे. आपण प्रेरणा सागर आणि प्रेरणेचा जिवंत पुरावे  आहेत

मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा देतो.

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi congratulates hockey team for winning Women's Asian Champions Trophy
November 21, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi today congratulated the Indian Hockey team on winning the Women's Asian Champions Trophy.

Shri Modi said that their win will motivate upcoming athletes.

The Prime Minister posted on X:

"A phenomenal accomplishment!

Congratulations to our hockey team on winning the Women's Asian Champions Trophy. They played exceptionally well through the tournament. Their success will motivate many upcoming athletes."