पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरियातील भारतीय समुदायाला संबोधित केले.

त्यांनी सेऊलमधील भारतीय समुदायाचे आभार मानले.

त्यांनी सांगितले की, भारत आणि कोरिया यांच्यातील संबंध फक्त व्यावसायिक संपर्काच्या आधारावर नसुन दोन्ही देशांमधील संबंधांचा मुख्य आधार म्हणजे लोकांशी संपर्क साधणे.

पंतप्रधानांनी भारत आणि कोरिया यांच्यातील जुन्या दुव्यांचे संदर्भ दिले. अयोध्येपासून हजारो किलोमीटर प्रवास करणाऱ्या राणी सुर्यरत्ने यांनी कोरियन राजाशी विवाह केला होता याची आठवण करून दिली आणि त्यांनी हे ही निदर्शनास आणून दिले की, अलीकडेच दिवाळीमध्ये कोरियाची पहिली महिला किम जंग-सूक यांनी अयोध्येला भेट दिली होती.

|

पंतप्रधानांनी सांगितले की, बौद्ध धर्माने दोन्ही देशांच्या मैत्रीचे बंधन आणखी मजबूत केले आहे.

पंतप्रधानांनी सांगितले की, कोरियामधील विकास, संशोधन आणि नवकल्पना यासाठी भारतीय समुदायातर्फे देण्यात येत असलेले योगदान पाहून त्यांना आनंद झाला.

त्यांनी कोरियामध्ये योग आणि भारतीय उत्सवांच्या लोकप्रियतेचा उल्लेख केला. भारतीय पाककृती देखील कोरियामध्ये लोकप्रियता वाढवत आहे. आशियाई खेळांमध्ये भारतीय क्रीडा कबड्डी – कोरियाच्या शानदार कामगिरीबद्दलही त्यांनी माहिती दिली.

 

|

पंतप्रधानांनी जगभरातील भारतीय समुदायाचे वर्णन भारताचे राजदूत म्हणून केले, ज्यांच्या परिश्रम आणि अनुशासनाने जगभरात भारताची जबाबदारी वाढविली आहे

पंतप्रधान म्हणाले की, यावर्षी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती दिनानिमित्त जगभर बापूंच्या कार्याची माहिती व्हावी आणि या उद्देशाचा पाठपुरावा व्हावा ही आमची जबाबदारी आहे.

पंतप्रधानांनी सांगितले की कोरियासोबत भारताचे संबंध बळकट आहेत आणि दोन्ही देश या प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र कार्यरत आहेत. त्यांनी नोंद केली की भारतीय ब्रँड आता कोरियामध्ये नावाजले असून, कोरियन ब्रँडला भारतामध्ये घरगुती नावे आहेत.

अलीकडेच भारतात घडलेल्या आर्थिक विकासाच्या बदलाबाबत पंतप्रधान बोलत होते.

ते म्हणाले की, लवकरच भारत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल.

 

|

व्यवसाय सुलभीकरण आणि राहण्यातील सुसहायत्तामध्ये केलेल्या आश्चर्यकारक प्रगतीबद्दल त्यांनी सांगितले. त्यांनी जीएसटी आणि कॅशलेस अथॉरिटीसारख्या सुधारणांचाही उल्लेख केला

त्यांनी नमूद केले की जगात भारत एक आर्थिक समावेश क्रांतीचा साक्षीदार आहे. या संदर्भात त्यांनी बँक खाती, विमा आणि मुद्रा कर्जाविषयी सांगितले.

अनेक यशांमुळे भारताची प्रतिष्ठा वाढत आहे. त्यांनी गरिबांसाठी विनामूल्य उपचार – जगातील सर्वात उंच मूर्ति – स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि डिजिटल इंडिया बद्दल माहिती दिली.

 

|

 

स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात भारत आणि आंतरराष्ट्रीय सौर गठबंधन निर्मितीच्या विकासाविषयी पंतप्रधानांनी चर्चा केली.

त्यांनी सांगितले की, आज भारतात नवीन ऊर्जा आहे. त्यांनी असेही सांगितले की उद्या, त्यांना भारताच्या वतीने भारतीय निवासी म्हणून सेऊल शांतता पुरस्कार प्राप्त होईल.

प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्या च्या ठिकाणी ठेवण्यात आलेली स्वच्छता संपूर्ण देशाने लक्षात घेतली असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले. कोरियामधील भारतीय समुदायांना त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक प्रयत्नांमुळे भारतामध्ये पर्यटनासाठी प्रोत्साहित केले.

|

 

Click here to read full text speech

  • Mahendra singh Solanki Loksabha Sansad Dewas Shajapur mp December 12, 2023

    नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Over 28 lakh companies registered in India: Govt data

Media Coverage

Over 28 lakh companies registered in India: Govt data
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 फेब्रुवारी 2025
February 19, 2025

Appreciation for PM Modi's Efforts in Strengthening Economic Ties with Qatar and Beyond