देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या देशाच्या एका महान पुत्राचे स्मरण करण्याची एक चांगली संधी आपल्याला मिळाली आहे. देशासाठी अविरत कार्य करण्याची, स्वतःला झोकून देण्याची भावना आहे, जी आपल्याला प्रत्येक चिंतांपासून दूर नेत, आपल्याला अशाप्रकारे एकत्र आणते.
आचार्य सत्येंद्र नाथ बोस यांच्या 125 व्या जयंती दिवशी मी तुम्हाला सर्वांचे आणि विशेषतः वैज्ञानिकांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो, दरवर्षी वर्षाच्या सुरवातीला प्रख्यात शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याचा आनंद मला मिळतो. मला आनंद आहे की आज, तुम्हा सर्वांसोबत काही विचारांची देवाणघेवाण करण्याची एक खूप छान संधी आहे.
आचार्य सत्येंद्र नाथ बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त आजपासून आम्ही बोस यांचा जयंती उत्सव वर्षभर साजरा करणार आहेत. बोस यांचा जन्म 1894 मध्ये झाला होता. मी त्यांच्या उपलब्धतेबद्दल जेव्हा समजून घेतले तेव्हा असे लक्षात आले की ते काळाच्या आणि समाजाच्या बरेच पुढचे विचार करत होते.
मित्रांनो, देशबंधू चित्तरंजन दास यांनी आपल्या एका काव्य पंक्तीत म्हटले आहे की :
“बंगालचे पाणी आणि बंगालच्या जमिनीत एक अखंड सत्य आहे”
हे ते सत्य आहे जे बंगालच्या लोकांना चिंतन-मननाच्या उच्च पातळीवर घेवून जाते, जेथे पोहोचणे कठीण आहे. हे ते सत्य आहे, ज्यामुळे बंगालने शतकानुशतके देशाची धुरा आपल्याकडे ठेवत देशाला एकसंघ ठेवले आहे.
स्वातंत्र्य चळवळ असो, साहित्य, विज्ञान, क्रीडा असो प्रत्येक क्षेत्रात बंगालचे पाणी आणि बंगालच्या मातीचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, गुरु रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, श्यामाप्रसाद मुखर्जी, बंकिमचंद्र, शरदचंद्र, सत्यजीत रे, तुम्ही कुठल्याही क्षेत्राचे नाव घ्या, बंगालचा एकतरी तारा तिथे चमकतांना तुम्हाला दिसेल.
भारतासाठी ही अभिमानास्पद बाब आहे की या भूमीने एकापेक्षा एक शास्त्रज्ञ संपूर्ण जगाला दिले आहेत. आचार्य एस एन बोस, सी. बोस, मेघनाद साहा, अशी कितीतरी नावं आहेत ज्यांनी देशाच्या आधुनिक विज्ञानाचा पाया मजबूत केला आहे.
खूप कमी पायाभूत सुविधा आणि भरपूर संघर्षा दरम्यान, त्यांनी आपल्या विचारांनी आणि शोधांनी लोकांची सेवा केली आहे. आजही, आपण त्यांची प्रतिबद्धता आणि सर्जनशीलता यांच्याकडून शिकत आहोत.
मित्रांनो, आचार्य एस. बोस यांच्या जीवनातून आणि कार्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे. ते एक विद्वान होते. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी यश संपादन केले आहे. यामध्ये औपचारिक संशोधन शिक्षणाचा अभाव आणि जागतिक वैज्ञानिक समुदायाशी त्यांचा संबंध देखील फारच कमी होता.
त्यांनी क्वांटम स्टॅटेस्टीक्सचा आणि आधुनिक अणूशास्त्राचा पाया घातला. आईनस्टाईनचे चरित्र लिहिणारा अब्राहम पेस यांनी बोस यांच्या कार्याचा उल्लेख जुन्या क्वांटम थिअरीच्या शेवटच्या चार क्रांतिकारी पेपरपैकी एक असा केला आहे. विज्ञानाच्या इतिहासात सत्येंद्र नाथ बोस यांचे नाव बोस सांख्यिकी, बोस आइनस्टाइन कंडन्सेसन आणि हिग्स बोसॉन म्हणून अमर झाले आहे.
बोस यांच्या भौतिकशास्त्रातील प्रयोगांच्या विविध विचारांवर आधारित कार्य करणाऱ्या अनेक संशोधकांना भौतिकशास्त्रातील अनेक नोबेल पारितोषिके देण्यात आली आहेत हेच त्यांच्या कार्याचे मूलभूत महत्त्व आहे.
प्राध्यापक बोस प्रादेशिक भाषेमध्ये विज्ञानाचे शिक्षण देत. त्यांनी बंगाली विज्ञान नियतकालिक ज्ञान-ओ-बिग्यान सुरु केले.
आपल्या युवकांमध्ये विज्ञानाची समज आणि आवड निर्माण व्हावी यासाठी त्याला चालना देण्यासाठी, विज्ञान संवादाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करणे अत्यावश्यक आहे. भाषा ही अडथळा न ठरता ती सहाय्यक झाली पाहिजे.
मित्रांनो, भारताची वैज्ञानिक संशोधन प्रणाली खूप मजबूत आहे. आपल्या इथे ना प्रतिभा कमी आहेत, परिश्रमाला कोणी घाबरत नाही, आणि उद्देशांची देखील कमी नाही.
गेल्या काही दशकांत, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची प्रगती वेगाने झाली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र असो, अंतराळ तंत्रज्ञान असो, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान असो, भारताने आपले वर्चस्व संपूर्ण जगावर प्रस्थापित केले आहे. आपल्या शास्त्रज्ञांच्या, आमच्या तंत्रज्ञान तज्ञांचे हे यश संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे.
जेव्हा इस्रोच्या प्रक्षेपकातून एकाचवेळी 100 पेक्षा जास्त उपग्रह सोडले जातात तेव्हा संपूर्ण जग आश्चर्यचकित होते. त्यावेळी, आपण भारतीय अभिमानाने आपल्या शास्त्रज्ञांच्या या पराक्रामुळे आनंदित होतो.
मित्रांनो, तुम्ही प्रयोगशाळेत जे परिश्रम करता आपले आयुष्य खर्ची करता ते केवळ प्रयोगशाळेतच राहिले तर ते देशासोबत आणि तुमच्या सोबत अन्याय केल्यासारखे आहे. देशाच्या वैज्ञानिक क्षमतेचा विकास करण्यासाठी तुमची मेहनत तेव्हा अजून चमकेल जेव्हा तुम्ही तुमच्या मूलभूत ज्ञानाला आताच्या काळानुरूप देशाच्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवू शकाल. म्हणूनच आपल्या नवकल्पना, आपल्या संशोधनाचे अंतिम स्वरूप आणि निष्पत्ती निश्चित होणे आज अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या शोधांमुळे गरिबांचे जीवन सुकर होत आहे का, मध्यमवर्गीय व्यक्तीच्या अडचणी कमी होत आहे का?
जेव्हा आपल्या वैज्ञानिक प्रयोगांचा पाया आपल्या सामाजिक-आर्थिक समस्यांचे निराकरण करणे हा असेल तेव्हा आपली अंतिम निष्पत्ती आपले अंतिम ध्येय निश्चित करणे सुलभ होते.
माझा विश्वास आहे की आपल्या देशातील शास्त्रज्ञ चौकटीबाहेरील विचार करून, देशाला सृजनशील तंत्रज्ञाना उपाययोजना देत राहतील, ज्याचा लाभ सामान्य माणसाच्या आयुष्यावर होऊन त्यांचे जीवन सोपे होईल.
मला असे सांगण्यात आले आहे की विविध वैज्ञानिक संस्थांनी सौर ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा, जल संवर्धन, कचरा व्यवस्थापन यासारख्या विषयांवर संशोधन आणि विकास प्रकल्प सुरू केले आहेत. या प्रकारचे प्रकल्प आणि त्यांचे परिणाम प्रयोगशाळेत राहणार नाहीत, ही आमची सामुदायिक जबाबदारी आहे.
प्रतिष्ठीत शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी, आपण सर्वांनी क्वांटम रचनेचा अभ्यास केला आहे आणि संभाव्यत: तुम्ही सर्व यातीलतज्ञही आहात. मी त्याचा अभ्यास केला नाही. पण मला हे नक्कीच कळते की रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला शिकवण देणारे बरेच धडे भौतिक शास्त्रात आहेत. एखादा शास्त्रीय कण खोल विहिरीतून सहजपणे बाहेर पडू शकत नाही पण एक भाग कण नक्कीच!
एक नं दुसऱ्या कारणास्तव आपण स्वतःला दुसऱ्यांपासून अलिप्त ठेवतो. आपण फार क्वचित इतर संस्था आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांमधील इतर सहकारी वैज्ञानिकां सोबत कार्य करतो, आपले अनुभव एकमेकांना सांगतो.
आपल्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि भारतीय विज्ञानाला त्याच्या वैभवशाली गौरवापर्यंत पोहोचण्यासाठी, आपल्याला क्वांटम कणाप्रमाणे चौकटीतून बाहेर पडले पाहिजे. हे आज अधिक महत्वाचे आहे, कारण विज्ञान बहुविध-शिस्तप्रिय होत असून नियोजित प्रयत्नांची आवश्यकता आहे.
मी भौतिक आणि संशोधनाच्या पायाभूत सुविधांच्या वाढत्या गरजेविषयी बोलतो आहे, जे महाग आहे आणि ज्यांचे आयुष्य कमी आहे.
मला सांगितले जाते की आपला विज्ञान विभाग आता बहुस्तरीय दृष्टिकोनावर काम करत आहे. मी समजतो की वैज्ञानिक पायाभूत सुविधांच्या देवाणघेवाणीसाठी एक पोर्टल विकसित केले जात आहे ज्यामुळे साधनसंपत्तीच्या पारदर्शी आणि प्रभावी वापराला अनुमती देईल.
शैक्षणिक आणि संशोधन व विकास संस्थांमधील मजबूत सहयोगासाठी एक यंत्रणा सुरू केली जात आहे. अकादमी ते संस्था, उद्योग ते स्टार्ट अप या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व भागीदारांना एकत्रित आणण्यासाठी शहर आधारित आर आणि डी क्लस्टर तयार केले जात आहेत.
या प्रयत्नाचे यश हे या धोरणानुसार सर्व संस्था आणि प्रयोगशाळा एकत्र आणण्याच्या आपल्या क्षमतेवर अवलंबून असेल. यासाठी प्रत्येकाकडून 100% पाठिंब्याची गरज आहे. देशातील एखद्या दुर्गम भागातील शास्त्रज्ञाला देखील आयआयटी दिल्ली किंवा देहरादूनमधील सीएसआयआर प्रयोगशाळेत विनासायस पोहोचणे शक्य होईल याची खात्री ही यंत्रणा करून देईल.
मित्रांनो,
विकास, वाढ आणि परिवर्तन यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हे असाधारण इंजिन म्हणून कार्य करते. मी तुम्हा लोकांना, देशातील वैज्ञानिकांना पुन्हा ही विनंती करतो की, तुमच्या नवोपक्रमांची दिशा आमच्या सामाजिक-आर्थिक आव्हानांना लक्षात ठेवून निश्चित करावी.
तुम्हाला ठाऊक आहे की देशात हजारो मुले, विशेषत: आदिवासी समाजातील, सिकलसेल ऍनेमीयाने ग्रस्त आहेत. कित्येक दशकांपासून यावर संशोधन सुरु आहे. आपण हा निर्धार करूया का, या आजारावरील स्वस्त उपाय संपूर्ण जगाला सोपा आपण देवू?
कुपोषणाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अधिक स्वस्त आणि प्रथिनेयुक्त विविध डाळींचे उत्पन्न घेऊ शकतो का? भाज्या आणि धान्यांची गुणवत्ता सुधारली जाऊ शकते का? नद्यांना स्वच्छ करण्यासाठी, नद्यांना प्रदूषण मुक्त करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर अधिक जोमाने काम करता येईल का?
मलेरिया, क्षयरोग, मस्तिष्क ज्वर यासारख्या रोगांपासून बचाव करण्यासाठी नवीन औषधे आहेत, नवीन लस विकसित करता येऊ शकतात का? आम्ही अशा क्षेत्रांची निवड करू शकतो का जिथे आमचचे पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाची एक सृजनशील पद्धतीने सांगड घातली जाऊ शकेल.
मित्रांनो, विविध कारणांमुळे आपण पहिल्या औद्योगिक क्रांतीत सहभागी होऊ शकलो नाही. आज आपण ही संधी पुन्हा गमावू शकत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा अॅनालिटिक्स, मशीन लर्निंग, सायबर-फिजिकल सिस्टम्स, जीनोमिक्स आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्स ही आगामी काळातील नवीन आव्हाने आहेत ज्यावर आपल्याला लक्ष केंद्रित केले पाहिजे. एक देश म्हणून,आपण या उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या अनुरूप स्वतःला करू हे कृपया सर्वांनी सुनिश्चित करा.
आपले वैज्ञानिक ज्या प्रकारे या आव्हानांना सामोरे जातील, त्यानुसार स्मार्ट उत्पादन, स्मार्ट शहरे, उद्योग 4.0 आणि इंटरनेट-ऑफ-थिम्स या क्षेत्रांमध्ये आपले मध्ये ठरेल.
मित्रांनो, आपल्या देशामध्ये लोकसंख्येची मोठी शक्ती आहे, हे लक्षात ठेवून, सरकार स्टँडअप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, कौशल्य विकास मोहीम, प्रधानमंत्री मुद्रा योजना यासारखे कार्यक्रम राबवतआहे. याचाच एक भाग महणून आम्ही जागतिक दर्जाच्या अशा 20 अशा संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत ज्या संपूर्ण जगावर वर्चस्व प्रस्थापित करतील.
इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स अभियानात सहभागी होण्यासाठी, सरकार उच्च शिक्षणांशी संबंधित खाजगी आणि सार्वजनिक संस्थांना आमंत्रित करीत आहे. आम्ही नियमांमध्ये बदल केले आहेत, कायदे बदलले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील ज्या संस्था निवडल्या जातील, त्यांना निर्धारित वेळेत 1000 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
एस एन बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्स आणि अशा इतर संस्थांनी आपल्या संस्थेला एक उच्च दर्जाची संस्था बनवण्यासाठी एक योजना तयार करावी अशी मी विनंती करतो. तुम्ही तुमच्या संस्थांमध्ये एक अशी यंत्रणा तयार करावी जी विद्यार्थी आणि युवकांना संशोधन करण्यासाठी प्रेरित करेल.
जर प्रत्येक शास्त्रज्ञ केवळ एका मुलाच्या विज्ञानाच्या अभ्यासासाठी, संशोधानाप्रती त्याची रुची वाढावी यासाठी आपला थोडा वेळ देईल, तर देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईल. आचार्य एस. एन. बोस यांच्या 125 व्या जयंती वर्षात ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी श्रद्धांजली असेल.
मित्रांनो, 2017 मध्ये, आपण सर्वांनी, १२५ कोटी भारतीयांनी एकत्रित येवून संकल्प केला आहे. हा संकल्प आहे नव भारताच्या निर्मितीचा. हा संकल्प आहे, 2022 पर्यंत आपल्या देशाला अंतर्गत अरिष्टांपासून मुक्त करण्याचा. हा संकल्प आहे त्या भारताच्या निर्मितीचा ज्याचे स्वप्न आपल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी पहिले होते.
या संकल्पासाठी 2018 हे वर्ष अतिशय महत्वाचे आहे. हेच ते वर्ष आहे जेव्हा आपण आपली सर्व शक्ती, आपली सर्व उर्जा या संकल्प सिद्धीसाठी केंद्रित केली पाहिजे.
देशातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक संस्था, प्रत्येक संघटना, प्रत्येक विभाग, प्रत्येक मंत्रालयाने आपापल्या परीने योगदान द्यायचे आहे.एखादी गाडी जशी एखाद्या स्थानकावरून सुटल्यानंतर ५ ते १० मिनिटांनंतर वेगवान होते, तसेच 2018 हे वर्ष आपल्याला वेगवान होण्यासाठी आहे.
देशातील वैज्ञानिकांनी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या नवोपक्रम आणि संशोधनाचे लक्ष्य नव भारताच्या निर्मितीवर केंद्रीत करावे.
आपल्या नव कल्पना देशातील गरीब आणि मध्यमवर्गाला सक्षम करतील, देशाला बळकट करतील. आधार, थेट लाभ हस्तांतरण, मृदा आरोग्य कार्ड योजनांचे उपग्रह आणि ड्रोनच्या माध्यमातून निरीक्षण केले जावे ही व्यवस्था तुम्हीच तर तयार केली आहे.
अशा प्रकारचे अजून काय केले जाऊ शकते, नोकरी आधारित आर्थिक विकासात मदत केली जाऊ शकते, यामध्ये वैज्ञानिक संस्था खूप मोठे योगदान देवू शकतात. विशेषत: देशातील ग्रामीण भागात, त्यांच्या गरजांनुसार नवीन तंत्रज्ञानाची बांधणी करणे, नवीन तंत्रज्ञान गावापर्यंत पोहचवण्यात तुमची भूमिका फार महत्त्वाची आहे.
मित्रांनो, घरबांधणी, पेयजल, वीज, रेल्वे, नद्या, रस्ते, विमानतळ, सिंचन, दळणवळण, डिजिटल पायाभूत सुविधा यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये नवीन कल्पना तुमची वाट पाहत आहेत.
सरकार तुमच्यासोबत आहे, साधनसंपत्ती तुमच्यासोबत आहे, तुमच्यापैकी कोणाकडेच सामर्थ्याची कमी नाही, आणि म्हणूनच यशाला तुमच्याकडे आलेच पाहिजे. तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा देश यशस्वी होईल. तुमची संकल्प सिद्ध झाल्यास देशाची संकल्प सिद्ध होईल.
मित्रांनो, या उद्घाटनाचा उद्देश तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही कृती योजनेचा योग्य दिशेने पाठपुरावा कराल. मला हे जाणून खूप आनंद झाला आहे की यामध्ये एक आकर्षक आणि महत्त्वपूर्ण पाठपुरावा कार्यक्रम तयार केला आहे.
100 हून अधिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा आणि स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आल्याची माहिती मला देण्यात आली आहे.
अद्भूत कल्पना त्यांच्या प्रासंगिकतेला बराच काळ टिकवून ठेवतात. आजही, आचार्य बोस यांचे कार्य शास्त्रज्ञांना प्रेरणा देत आहे.
वैज्ञानिक संशोधनाच्या उदयोन्मुख पथावर यशस्वी होण्यासाठी तुम्ही करत असलेल्या तुमच्या प्रयत्नांना मी शुभेच्छा देतो. आपल्या अथक प्रयत्नांमुळे राष्ट्राचे भविष्य अधिक चांगले आणि उज्वल होईल असा विश्वास मला वाटतो.
मी तुम्हा सर्वांना समाधानकारक आणि सर्जनशील नवीन वर्षाची शुभेच्छा देतो.
जय हिंद!