In one way the correct meaning of PSE is - Profit and Social benefit generating Enterprise: PM Modi at CPSE Conclave
For public and private sector, the formula of success remains same - the 3 Is, which mean Incentives, Imagination and Institution Building: PM
I believe that Idealism and Ideology are not enough for economic decision making, they need to be replaced with pragmatism and practicality, says the PM
PSEs can contribute towards the formation of New India through 5 Ps - Performance + Process + Persona + Procurement and Prepare: PM
To date, we have been treating PSEs as navratana companies. But now, its time to think beyond it. Can we think about making New India jewel, asks PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित सीपीएसई संमेलनाला संबोधित केले.

पंतप्रधानांसमोर यावेळी, कॉर्पोरेट, प्रशासन, मनुष्यबळ व्यवस्थापन, आर्थिक पुनर्गठन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान तसेच व्हिजन २०२२ अशा विविध विषयांवर सादरीकरण करण्यात आले.

उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, हे संमेलन सार्वजनिक क्षेत्रातील एक नवीन सुरुवात आहे.

सादरीकरणांची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले की,सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची कामगिरी चांगली व्हावी यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कार्यान्वयनामध्ये त्यांना स्वातंत्र्य दिले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी स्वातंत्र्योत्तर काळापासूनच राष्ट्र निर्मितीच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत उल्लेखनीय योगदान दिले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी, नफा कमावणे आणि सामाजिक लाभ मिळिवणे दोन्ही बाबी महत्वपूर्ण आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांच्या योगदानाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, वीज नसलेल्या गावांपर्यंत वीजपुरवठा करणे आणि गरिबांना एलपीजी जोडणी देणे या सर्व गोष्टी सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांच्या मेहनती शिवाय शक्य झाल्या नसत्या.

भूतकाळात कमावलेली प्रतिष्ठा पुरेशी नाही तर येणाऱ्या आव्हनांचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करणे हे महत्वपूर्ण आहे, असे ते म्हणाले. 21 व्या शतकात उद्योग आणि नवोन्मेष हे मार्गदर्शक तत्व असले पाहिजेत. प्रोत्साहन, कल्पना आणि संस्था निमिर्ती हि यशाची त्रिसूत्री आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी तंत्रज्ञानांतील बदल आणि प्रक्रियांच्या माध्यमातून नव भारताच्या निर्मितीमध्ये मदत करावी असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. याकरिता या उपक्रमांना ”५ पी” च्या सूत्राची आवशक्यता आहे – परफॉर्मन्स (कामगिरी), प्रोसेस (प्रक्रिया),पर्सोना (व्यक्तिमत्व), प्रोकुयरमेंट (खरेदी) आणि प्रीपेअर ( सज्ज असणे).

याबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी कार्यान्वयन आणि आर्थिक कामगिरीमध्ये सुधारणा, प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी, जिईएम व्यासपीठ आणि एमएसएमईच्या माध्यमातून खरेदी तसेच तांत्रिक अडथळ्यांसाठी सज्ज रहायला सांगितले.

नव भारतासाठी सार्वजनिक उपक्रमांसमोर पंतप्रधानांनी ५ आव्हाने ठेवली-

१) वर्ष २०२२ पर्यंत भारतीय सार्वजनिक उपक्रम कशाप्रकारे आपले भौगोलिक धोरण वाढवतील?

२) वर्ष २०२२ पर्यंत भारतीय सार्वजनिक उपक्रम कशाप्रकारे देशाचे आयात बिल कमी करतील?

३) वर्ष २०२२ पर्यंत भारतीय सार्वजनिक उपक्रम कशाप्रकारे नवोन्मेष आणि संशोधनाची सांगड घालतील?

४) वर्ष २०२२ पर्यंत भारतीय सार्वजनिक उपक्रमांच्या सीएसआर निधीच्या किमान वापरासाठीचा आराखडा कसा असेल?

५) वर्ष २०२२ पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम देशाला कोणते नवीन विकास मॉडेल देतील?

पंतप्रधान म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या ५०० कंपन्यातील एक चतुर्थांश कंपन्या ह्या कोणत्या ना कोणत्या देशाच्या सार्वजनिक क्षेत्रा अंतर्गत कार्यरत आहेत. भारतातील सार्वजनिक उपक्रम परदेशातील सार्वजनिक उपक्रमांसोबत भागीदारी करून परदेशी गुंतवणुकीसाठी व्यापक धोरण तयार करू शकतात. देशातील आयात बिल कमी करण्यात सार्वजनिक शेतार्तील उपक्रम महत्वपूर्ण भूमिका बजावतील. सीएसआयआर आणि आयसीएआर मध्ये सध्या उपलबद्ध असलेल्या सुविधांशिवाय सी पी एस इ मध्ये आधुनिक संशोधन आणि विकास आराखडा देखील उपलब्ध आहे हि बाब यावेळी पंतप्रधानांनी अधोरेखित केली. नवोन्मेष आणि संशोधन आता एकत्रित येण्याची आयश्यक्यता आहे.

सीपीएसई कागद विरहित कार्य संस्कृती, रोकड विरहित व्यवहार आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात आदर्श भूमिका बजावू शकते.

नव भारताच्या निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी सीपीएसई व्यापक योगदान प्रदान करेल अशी आशा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

 

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait

Media Coverage

Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Narendra Modi to attend Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India
December 22, 2024
PM to interact with prominent leaders from the Christian community including Cardinals and Bishops
First such instance that a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India

Prime Minister Shri Narendra Modi will attend the Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India (CBCI) at the CBCI Centre premises, New Delhi at 6:30 PM on 23rd December.

Prime Minister will interact with key leaders from the Christian community, including Cardinals, Bishops and prominent lay leaders of the Church.

This is the first time a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India.

Catholic Bishops' Conference of India (CBCI) was established in 1944 and is the body which works closest with all the Catholics across India.