पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे इंडिया कार्पेट एक्सपोला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले.
भारतातील आणि परदेशातील अतिथींचे स्वागत करताना पंतप्रधानांनी सांगितले की, वाराणसीतील दीनदयाल हस्तकला संकुलात आज प्रथमच इंडिया कार्पेट एक्सपो आयोजित केला जात आहे. त्यांनी वाराणसी, भदोही आणि मिर्जापुर ही कार्पेट उद्योगाची महत्वाची केंद्रे असल्याचे आणि या केंद्रांना हस्तकला, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.
पंतप्रधानांनी सांगितले की, भारतात हस्तशिल्पांची दीर्घ परंपरा असून, वाराणसीने या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संदर्भात त्यांनी महान संत कवी, कबीर यांचाही उल्लेख केला, जे वाराणसी भागातील आहेत.
स्वातंत्र्य चळवळीत आणि आत्मनिर्भरतेसाठी हस्त कला हे प्रेरणास्थान असायचे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी महात्मा गांधी, सत्याग्रह आणि चरखा यांचा उल्लेख केला.
पंतप्रधान म्हणाले की, भारत आज कार्पेट्चा सर्वात मोठा उत्पादक देश असून, जागतिक बाजारपेठेतील 35 टक्के हिस्सा या क्षेत्राचा आहे. त्यांनी या क्षेत्रातील प्रभावशाली निर्यात कामगिरीबद्दल सांगितले. उदयोन्मुख मध्यमवर्गीय आणि कार्पेट उद्योगाला पुरविलेले समर्थन ही या क्षेत्रातील वाढीचे दोन महत्त्वपूर्ण घटक आहेत. कार्पेट निर्मात्यांच्या कौशल्यांचे त्यांनी कौतुक केले, ज्यामुळे “मेड इन इंडिया कार्पेट” एक मोठा ब्रँड बनला आहे.
कार्पेट निर्यातदारांना पुरविलेल्या लॉजिस्टिक सपोर्टबद्दल आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी जागतिक दर्जाच्या प्रयोग शाळांची निर्मिती त्यांनी केली. त्यांनी या क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या आधुनिक माग आणि क्रेडिट सुविधांसह इतर सुलभतेच्या उपायांचा देखील उल्लेख केला.
पंतप्रधानांनी असे आश्वासित केले की, केंद्र सरकार, कार्पेट निर्मात्यांचे कौशल्य आणि मेहनत जी देशाला सामर्थ्यवान बनविण्यास साहाय्यभूत आहे त्यांना सदैव पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे.