India and Turkey enjoy good economic ties. The growth in our bilateral trade over the years has been impressive: PM
India and Turkey have shown remarkable stability even in volatile global economic conditions, says PM Modi
Indian political system is known for its vibrant, open and participative democracy: PM Modi
Today, Indian economy is the fastest growing major economy in the world: PM Modi
We are in the process of building a New India. Therefore, our focus is on making it easier to work; particularly to do business: PM

तुर्कस्थानचे राष्ट्रपती मान्यवर रजैप तैय्यप एर्दोआन,

उपस्थित सर्व मान्यवर मांत्रिगण,

तुर्कस्तानच्या प्रतिनिधीमंडळाचे सर्व सदस्य,

भारतीय उद्योग जगताचे सर्व स्नेही, बंधू आणि भगिनींनो

आज या मंचावर उद्योग क्षेत्रातल्या यशस्वी मान्यवरांशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली याचा मला विशेष आनंद आहे. राष्ट्रपती एर्दोआन आणि तुर्कस्तानहून त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो. राष्ट्रपती एर्दोआन यांच्यासह मोठ्या संख्येने आलेले उद्योग प्रतिनिधी पाहून मला विशेष आनंद होत आहे. या परिषदेत भारतीय उद्योजकही उत्साहाने सहभागी झाले आहेत, याबद्दलही मला समाधान आहे.

मित्रांनो,

भारत आणि तुर्कस्तानदरम्यान विशेष ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बंध आहेत. सध्याच्या जागतिक वित्तीय परिक्षेत्राविषयी दोन्ही देशांचा समान दृष्टीकोन आहे.

सध्या प्रत्येक द्विपक्षीय संबंधामध्ये वित्तीय सहकार्य हा महत्वपूर्ण स्तंभ बनला आहे. भारत आणि तुर्कस्तान दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार दिवसेंदिवस लक्षणीयरित्या वाढतो आहे. या दोन्ही देशांमधले वित्तीय संबंध उत्तम आहेत. राष्ट्रपती एर्दोआन यांनी गेल्या वेळी दिलेल्या भारत भेटीनंतर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारात वाढ झाली आहे २००८ साली दोन्ही देशांमधील व्यापार २.८ अब्ज डॉलर्स इतका होता, तो २०१६ मध्ये ६.४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. हा नक्कीच उत्साहवर्धक आकडा आहे, मात्र दोन्ही देशांच्या व्यापारी क्षमता लक्षात घेता, तसेच उभय देशातले व्यापारी आणि वित्तीय संबंध बघता, हा व्यापार अजून जास्त वाढवणे शक्य आहे.

मित्रांनो !

भारत आणि तुर्कस्तान हे दोन्ही देश जगातल्या सर्वात मोठ्या २० अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. आणि महत्वाचे म्हणजे, जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे चढउतार सुरु असतानाही दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांनी लक्षणीय स्थेर्य दाखवले आहे. आमच्या अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभ्या आहेत, त्यामुळेच, भविष्यात या अर्थव्यवस्था प्रगती करतील असा आम्हाला विश्वास वाटतो.

दोन्ही देशातील नागरिकाना एकमेकांविषयी आपुलकी आणि आत्मीयतेची भावना आहे. सध्या जेव्हा आम्ही राजकीय संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्याचवेळी उभय देशातले आर्थिक संबंधही अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे. दोन्ही देशातील संबंधांचा हा संपन्न वारसा आपल्याला अधिकच पुढे नेण्याचा आपण भरीव प्रयत्न करायला हवा.

द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची ही एक उत्तम संधी असून त्यासाठी दोन्ही देशात पुरेपूर क्षमता आहे. व्यापार आणि थेट परदेशी गुंतवणूकीच्या माध्यमातून आपण हे साध्य करू शकतो. तसेच तंत्रज्ञानविषयक देवघेव आणि विविध प्रकल्पांमध्ये आपण एकमेकाना सहकार्य करू शकतो. याच संदर्भात, सांगायचे झाल्यास, तुर्कस्तानच्या अनेक कंपन्यानी भारतात उद्योग आणि गुंतवणुकीत वाढ केली आहे. ब्लू चीप भारतीय कंपन्यांमध्ये तुर्कस्तानच्या कंपन्यांनी गुंतवणूक आणि गेल्या काही वर्षात तयार झालेल्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या मार्गाचा हा परिणाम आहे. तरी देखील अश्या प्रकारचे सहकार्य छोट्या आणि मध्यम उद्योगांपर्यंत जाऊ शकले असते. आजची ज्ञानाधीष्टीत जागतिक अर्थव्यवस्था निरंतरपणे अनेक नवे मार्ग उघडत आहे. आपण आपल्या व्यापारिक आणि आर्थिक चर्चांमध्ये हे मुद्दे विचारत घेतले पाहिजे. आपण बघू शकता की दोन्ही सरकारे, उद्योग सुलभ वातावरण निर्माण करायला कटिबद्ध आहेत. पण आपल्या सारख्या उद्योगपतींना ह्यात पुढाकार घेऊन परस्पर फायद्यासाठी हे राष्ट्रीय लक्ष्य प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.

मित्रांनो,

भारतीय राजकीय व्यवस्था तिच्या लवचिक, आधुनिक आणि सामावून घेण्याऱ्या लोकशाहीसाठी ओळखली जाते. राजकीय आणि प्रशासकीय प्रणालींमध्ये स्थिरता आणि कायद्याचे राज्य ही आमच्या व्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये आहेत. आणि कुठल्याही दूरगामी गंभीर आर्थिक सहचर्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे.

ह्याच महिन्यात तीन वर्षांपूर्वी माझे सरकार सत्तेत आले. तेंव्हापासून अर्थव्यवस्था आणि प्रशासकीय प्रक्रिया सुधारण्यासाठी आम्ही अनेक नवनवीन उपक्रम सुरु केले आहेत. मेक इन इंडिया, स्टार्ट उप इंडिया आणि डिजिटल इंडिया सारख्या पथदर्शी योजना सुरु केल्या. ह्या योजनांचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेच्या सुधारणांच्या रुपात आपल्याला ठळकपणे दिसतो आहे. आज, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग कायम ठेवत, व्यवस्थेतील अकार्यक्षमता दूर करण्याकडेही आमचे विशेष लक्ष आहे. आम्ही नवीन भारत उभा करण्याच्या प्रक्रियेत आहोत. म्हणून, सर्व प्रक्रिया, विशेषतः उद्योगांसाठी सुलभ प्रक्रिया तयार करण्यावर आमचा भर आहे. ह्यात नीती आणि प्रक्रियांमध्ये सुधारणा करणे हे ओघाने आलेच. ह्यात देशी आणि परदेशी गुंतवणुकीला चालना देणे हे देखील आहे. आम्हाला ह्या आघाडीवर खूप यश आणि मान्यता मिळाली आहे. आमची जागतिक क्रमवारी अनेक कसोट्यांवर सुधारली आहे. पण ही निरंतर सुरु राहणारी प्रक्रिया असल्याने आपल्याला प्रयत्न सुरूच ठेवावे लागणार आहेत. मुळात आपली मानसिकतेत आणि आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा देश म्हणून भारतचे स्थान निर्माण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. आपल्या युवा पिढीसाठी नोकऱ्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी हे नितांत गरजेचे आहे. नुकताच संमत झालेला वस्तू आणि सेवा कायदा ह्याच दिशेने सरकारने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. देशात उद्योगांसाठी एक समान आणि परिणामकारक वातावरण निर्माण करण्याची मागणी फार जुनी होती.

मला माहित आहे की तुर्कस्थानातील बांधकाम कंपन्यांनी अनेक देशांत बांधकाम आणि पायाभूत सुविधा निर्माण कार्य केले आहे. आमच्या पायाभूत सुविधांची गरज फार मोठी आहे, ज्यात सार्वजनिक, मूलभूत आणि औद्योगिक पायाभूत सुविधा आहेत. आम्हाला त्या मजबूत आणि लवकरात लवकर तयार करायच्या आहेत. ह्यात तुर्कस्थानातील कंपन्या सहजतेने सहभागी होऊ शकतील. काही उदाहरणे द्यायची झाल्यास,आम्हाला २०२२ पर्यंत पाच कोटी घरे बांधायची आहेत. म्हणून बांधकाम क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी, बांधकाम क्षेत्रात विदेशी गुंतवणुक नीतीमध्ये आम्ही वारंवार सुधारणा केल्या आहेत. पुढील काही वर्षात १७५ गीगा वॅट नवीकरणीय उर्जा स्त्रोतांतून तयार करण्याचे लक्ष्य आहे.देशातील पन्नास शहरात मेट्रो आणि विविध राष्ट्रीय मार्गिकांवर द्रुतगती रेल्वे सुरु करण्याची योजना आहे.या बरोबरच वीज निर्मिती, वीज वहन, वितरण आणि साठा करण्यातील समस्या दूर करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.आम्ही आमच्या रेल्वे सेवेचे आणि महामार्गांचे आधुनिकीकरण करत आहोत. मागील तीन वर्षांत आम्ही या दोन क्षेत्रांसाठी साठी जास्तीत जास्त निधी दिला आहे.

आम्ही नवीन बंदरे बांधत आहोत, आणि सागरमाला ह्या महत्वाकांक्षी योजने अंतर्गत जुन्या बंदरांचे आधुनिकीकरण करत आहोत.

ह्याचप्रमाणे सध्या असलेल्या विमानतळांचे आधुनिकीकरण आणि आर्थिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी प्रादेशिक विमानतळांचा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे.

तुर्कस्तानातील पर्यटन क्षेत्र जगभरात नावाजलेले आहे. मागील काही वर्षांत, तुर्कस्तानात पर्यटनासाठी जाणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका निर्माते चित्रीकरणासाठी तुर्कास्तानाला पसंती देतात. परस्पर पर्यटनाला चालना देतानाच, उद्योग क्षेत्राने दोन्ही देशात नवनव्या संधी शोधण्याची गरज आहे. ह्यापैकी एक संधी म्हणजे भारतातील प्रादेशिक चित्रपट उद्योगाला यासाठी प्रोत्साहन देणे. भारतातील प्रादेशिक चित्रपट उद्योग हा हिंदी चित्रपट उद्योगाइतकाच आधुनिक आहे.

भारत आणि तुर्कस्तान या दोन्ही देशांमध्ये ऊर्जेची कमतरता आहे याची आपल्याला जाणीव आहेच. आमची ऊर्जेची गरज दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यामुळेच , हायड्रोकार्बन हे दोन्ही देशांच्या सामाईक हिताचे क्षेत्र आहे. हेच सौर आणि पवनऊर्जेलाही लागू आहे .

त्यामुळेच, ऊर्जा क्षेत्रही आमच्या द्वीपक्षीय संबंधांचा मोठा आधारस्तंभ बनला आहे. खाण आणि अन्नप्रक्रिया उद्योग ही क्षेत्रंही दोन्ही देशांसाठी महत्वाची आहेत. त्याशिवाय, वस्त्रोद्योग आणि वाहन उद्योगातही आपण दोघे नवे व्यापारी संबंध निर्माण करु शकतो. तुर्कस्तान हे एक मोठे उत्पादन क्षेत्र आहे आणि भारतात स्वस्त उत्पादन केंद विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. खर्चाच्या मुद्द्याशिवाय आमच्याकडे मोठ्या प्रमाणात कुशल आणि निमकुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच संशोधनाची उत्तम क्षमताही आहे.

वित्तीय आणि तंत्रज्ञानविषयक परस्पर सहकार्यासाठी भारत आणि तुर्कस्तान च्या संयुक्त समितीचे काम उत्तम चालले आहे हे जाणून मला समाधान वाटले. दोन्ही देशांदरम्यान व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी कशी आखणी करता येईल, यावर या समितीच्या पुढच्या बैठकीत चर्चा करून उपाययोजनांचा आढावा घेतला जाऊ शकेल.

तसेच दोन्ही देशांमधील वाणिज्य आणि उद्योग संघटना चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री यांनीही एकमेकांसोबत काम करावे अशी माझी विनंती आहे. आपल्या सर्व प्रक्रिया सरकारांच्या पातळीवर तसेच खालच्या पातळ्यावरही सतत सुरु राहायला हव्यात.

आजच्या या उद्योग मंचात सहभागी झाल्याबद्दल मी राष्ट्रपती एर्दोआन , भारत तुर्कस्तान उद्योग मंचाचे प्रतिनिधी या सर्वांचे मी आभार मानतो. ही एक। खरोखरच फार उत्तम संधी होती. 

मित्रांनो,

आपल्या जनतेच्या कल्याणासाठी दोन देशांमधील आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रातील परस्पर सामंजस्य वाढविण्यावर भर दिला पाहिजे. ह्यासाठी भारतातर्फे मी आपल्याला खुल्या मनाने आमंत्रण देत आहे.

मी विश्वासाने असे म्हणू शकतो की आज भारतात जितक्या संधी उपलब्ध आहेत तितक्या आजवर कधीच नव्हत्या.

त्या आणखी चांगल्या करण्यासाठी मी स्वतः आपल्याला सहकार्य करण्याचे आणि सर्व काळजी घेण्याचे आश्वासन देतो.

धन्यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

Prime Minister Shri Narendra Modi paid homage today to Mahatma Gandhi at his statue in the historic Promenade Gardens in Georgetown, Guyana. He recalled Bapu’s eternal values of peace and non-violence which continue to guide humanity. The statue was installed in commemoration of Gandhiji’s 100th birth anniversary in 1969.

Prime Minister also paid floral tribute at the Arya Samaj monument located close by. This monument was unveiled in 2011 in commemoration of 100 years of the Arya Samaj movement in Guyana.