पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांनी सुरू केलेल्या रामकृष्ण मठाच्या ‘प्रबुद्ध भारत’ या मासिकाच्या 125 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आज झालेल्या सोहळ्याला संबोधित केले.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, की स्वामी विवेकानंद यांनी राष्ट्र भावनेचे प्रकटीकरण करण्यासाठी या पत्रिकेला ‘प्रबुद्ध भारत’ हे नाव दिले. स्वामीजींना राजकीय अथवा प्रादेशिक अस्तित्वापलिकडे जाणारा जागृत भारत घडवायचा होता. विवेकानंदांनी भारताला सजीव आणि सचेतन अशी शतकानुशतकांची सांस्कृतिक चेतनाशक्ती म्हणून पाहिले होते, असे पंतप्रधान म्हणाले.
स्वामी विवेकानंद यांनी म्हैसूरचे महाराज आणि स्वामी रामकृष्णानंद यांना लिहिलेल्या पत्रांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी स्वामीजींच्या दृष्टीकोनातील गरीबांच्या सबलीकरणासाठी केलेल्या स्पष्ट विचारांना अधोरेखित केले.त्यांची इच्छा होती की जर गरीब स्वतःचे सक्षमीकरण करू शकत नसतील तर प्रथम गरीबांना सक्षमीकरणापर्यंत न्यावे. दुसरे भारतातील गरीबांबद्दल ते म्हणत,त्यांना कल्पना देण्यात याव्यात ,आजुबाजूच्या जगात जे चालत आहे त्याबाबत त्यांचे डोळे उघडावेत आणि मग ते स्वतःला तरुन जाण्यासाठी स्वतः प्रयत्न करतील. पंतप्रधान ठामपणे म्हणाले, की हा जो दृष्टीकोन आहे त्यानुसार भारताची आगेकूच सुरू आहे. गरीब जर बँकेत जाऊ शकत नसतील तर बँकांनी गरीबापर्यंत जावे.हे जन धन योजनेने केले. गरीब जर विम्यापर्यंत पोहोचू शकत नसतील तर विमा गरीबापर्यंत पोहोचायला हवा.हे जनसुरक्षा योजनेने केले. गरीबांना जर आरोग्य सेवा मिळत नसेल तर आपण आरोग्य सेवा गरिबांपर्यंत न्यायला हवी.हे आयुष्यमान भारत योजनेने केले. रस्ते, शिक्षण, वीज,इंटरनेट जोडणी देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत, विशेषतः गरीबांपर्यंत.यामुळे गरीबांच्या आकांक्षा जागृत होत आहेत. आणि या आकांक्षांच देशाला विकासाकडे नेत आहेत,यावर पंतप्रधानांनी भर दिला.
मोदी म्हणाले, कोविड-19महामारीच्या वेळी भारताने घेतलेली सक्रीय भूमिका ही स्वामीजींच्या संकटात असहाय्य न वाटण्याच्या दृष्टिकोनाचे उदाहरण आहे. त्याचप्रमाणे हवामान बदलाच्या समस्येविषयी तक्रार करण्याऐवजी भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी करून त्यावर उत्तर शोधले. स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीनेही प्रबुद्ध भारताची जडणघडण आहे.हा असा भारत आहे, जो जगातील समस्यांचे निराकरण करतो,याकडे मोदींनी लक्ष वेधून घेतले.
स्वामी विवेकानंदांनी भारतासाठी पाहिलेली भव्य स्वप्ने आणि त्यांनी भारताच्या युवावर्गावर दाखविलेला अफाट विश्वास आता भारतातील उद्योग धुरीण,क्रिडाव्यक्तिमत्वे, तंत्रज्ञ,व्यावसायिक, वैज्ञानिक, नवनिर्मिते आणि इतर अनेकांतून प्रतीत होत आहे, याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी युवकांना स्वामीजींच्या संकटाना कसे ओलांडावे आणि त्यांच्याकडे शिकण्याचा भाग म्हणून कसे पहावे, या प्रॅक्टिकल वेदान्तावरील शिकवणूकीप्रमाणे आगेकूच करण्यास सांगितले. लोकांनी आत्मसात करणे आवश्यक असलेली दुसरी गोष्ट निर्भय असणे आणि आत्मविश्वासाने परीपूर्ण असणे.स्वामी विवेकानंद यांनी जगासाठी अमूल्य ठेवा तयार करून अमरत्व मिळवले, त्याचे अनुसरण युवावर्गाला करण्यास मोदी यांनी सांगितले.स्वामी विवेकानंदांनी अध्यात्म आणि आर्थिक प्रगती एकमेकांपासून वेगळी केली नाही, याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोक गरीबीकडे भावुकतेने पहातात याविरोधात ते होते. स्वामिजींना एक आध्यात्मिक भारदस्त व्यक्तिमत्त्व,अतिशय उच्चश्रेणीचा आत्मा असे संबोधित त्यांनी गरीबांच्या आर्थिक प्रगतीची संकल्पना कधीच दूर केली नाही, यावर पंतप्रधानांनी जोर दिला.
अखेरीस मोदी म्हणाले की प्रबुद्ध भारत 125 वर्षे स्वामिजींच्या संकल्पनांचा प्रसार करत आहे. युवावर्गाला शिक्षित करणेआणि देशाला जागृत करणे हा त्यांचा दृष्टीकोन त्यांनी विकसित केला आहे.स्वामी विवेकानंदांचे विचार अमर करण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.