पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मिरमधल्या 100 हून अधिक युवा आणि मुलांची भेट घेतली. “वतन को जानो” या उपक्रमांतर्गंत ही मुले सध्या देशाच्या विविध भागांना भेट देत आहेत.
यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना जम्मू-काश्मिरमधील पायाभूत विकास, राज्यातील खेळांसाठी सुविधा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी तसेच पंतप्रधानांच्या कामाच्या शिरस्त्याबद्दल प्रश्न विचारले.
या मुलांशी संवाद साधतांना पंतप्रधानांनी जम्मू-काश्मिरमधील पायाभूत सुविधा आणि जोडणी यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. खेळ आणि लोकांमधील खिलाडू वृत्ती यांच्या महत्वावर पंतप्रधानांनी भर दिला. परिश्रम करणे हे कधीच थकव्याचे कारण होऊ शकत नाही. हातातील काम पूर्ण केल्यानंतर मिळणारे जे समाधान असते, ते कुठल्याही थकव्यापेक्षा मोठेच असते असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.