पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगन उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून जुहू ते पुणे या उड्डाणासाठी हेलिकॉप्टरसाठी कामगिरी-आधारित नेव्हिगेशनच्या आशियातील पहिल्या प्रात्यक्षिकाचे कौतुक केले आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"या क्षेत्रासाठी महत्वपूर्ण टप्पा ! हे प्रात्यक्षिक सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम हवाई वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आमची बांधिलकी अधोरेखित करते."
Noteworthy milestone for the sector! It underscores our commitment to embracing advanced technologies for a safer and more efficient air traffic management. https://t.co/CQsf357gjM
— Narendra Modi (@narendramodi) June 2, 2023