५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून मते मागवली आहेत. नरेंद्र मोदी अँप वर सर्वेक्षणाच्या माध्यमातून १० प्रश्न विचारण्यात आले असून त्यावर जनतेला आपले मत नोंदवायचे आहे. या सर्वेक्षणाची लिंक सांगून या निर्णयाबाबत आपल्याला जनतेकडून थेट मत जाणून घ्यायचे आहे असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.
सर्वेक्षणात विचारण्यात आलेले दहा प्रश्न पुढीलप्रमाणे:
१. भारतात काळा पैसा आहे असे तुम्हाला वाटते का? अ. हो ब. नाही
२. भ्रष्टाचार आणि काळा पैसा याविरोधात लढले पाहिजे आणि त्याचे समूळ उच्चाटन व्हायला पाहिजे असे तुम्हाला वाटते का? अ. हो ब. नाही
३. एकूणच, काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत तुम्हाला काय वाटते?
४. भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांबाबत तुम्हाला काय वाटते? अप्रतिम, खूप चांगले, चांगले, ठीक, निरुपयोगी
५. ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटते? अ. योग्य दिशेने योग्य पाऊल ब. चांगला निर्णय क. काही फरक पडणार नाही
६. नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे काळा पैसा, भ्रष्टाचार आणि दहशतवाद कमी होण्यास मदत होईल असे आपल्याला वाटते का? अ. याचा त्वरित परिणाम होईल ब. मध्यम ते दीर्घ कालावधीत परिणाम होईल क. किंचित परिणाम ड. माहित नाही
७. नोटा रद्द केल्यामुळे घरखरेदी, उच्च शिक्षण, आरोग्यसेवा सामान्य माणसाच्या आवाक्यात येतील? अ. पूर्णपणे सहमत ब. अंशतः सहमत क. सांगू शकत नाही
८. भ्रष्टाचार, काळा पैसा, दहशतवाद आणि बनावट नोटांविरोधातील आमच्या या लढ्यामुळे तुमची गैरसोय झाली का? अ. अजिबात नाही ब. थोडी झाली परंतु चांगला निर्णय आहे क. हो
९. भ्रष्टाचारविरोधी काही कार्यकर्ते आता भ्रष्टाचार, काळा पैसा, दहशतवादाच्या समर्थनार्थ लढत आहेत असे तुम्हाला वाटते का? अ. हो ब. नाही
१०. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्हाला काही सूचना, कल्पना किंवा विचार सुचवायचे आहेत का?
सर्वसमावेशी प्रशासन आणि प्रमुख धोरणे आणि अंमलबजावणी मध्ये जनतेची थेट मते जाणून घेण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या अनुषंगाने हे सर्वेक्षण आहे.
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाबाबत पंतप्रधानांनी उत्तरे मागवली आहेत. अंमलबजावणी अधिक बळकट कशी करता येईल याबाबतही त्यांनी जनतेकडून अभिप्राय मागवला आहे.
जनतेशी थेट संवाद साधण्यावरील पंतप्रधानांचा ठाम विश्वास या सर्वेक्षणातून दिसून येतो.
I want your first-hand view on the decision taken regarding currency notes. Take part in the survey on the NM App. https://t.co/TYuxNNJfIf pic.twitter.com/mWv2frGn3R
— Narendra Modi (@narendramodi) November 22, 2016