पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जवळपास ९० मिनिटे त्यांच्या वाराणसी मतदार संघातील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून विचारांची देवाणघेवाण केली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना, वाराणसीमधील विकास कामांचे मूल्यांकन केले.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.63464000_1537232502_inner-2.jpeg)
नारुर खेड्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांच्या आगमनानंतर त्यांचे उत्साहाने स्वागत केले. पंतप्रधानांनीही विश्वकर्मा जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात आणि विविध कौशल्य आत्मसात करण्या मागील महत्व विशद केले.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.59436500_1537232585_school.jpeg)
पंतप्रधानांनी मुलांना न भिता प्रश्न विचारण्यास सांगितले ते म्हणाले कि, हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. पंतप्रधानांनी ” रूम टू रीड ” या स्वयंसेवी संस्थांच्या मुलांबरोबरहि वेळ घालविला.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.79096000_1537232633_read-1.jpeg)
त्यानंतर त्यांनी डीएलडब्लू वाराणसी येथिल गरीब आणि वंचित मुलांबरोबर संवाद साधला. हि मुले कशी विद्यापीठाला साहाय्य करतात. पंतप्रधानांनी त्यांना अभ्यासासाठी मेहनत आणि क्रीडा क्षेत्रात रुची निर्माण करण्याचा सल्ला दिला.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.33287900_1537232675_dlw-1.jpeg)
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.29335100_1537232692_dlw-2.jpeg)
संध्यकाळी पंतप्रधानांनी वाराणसीच्या रस्त्यांवरून फेरफटका मारतांना वाराणसीच्या विकास कामाचा आढावा घेऊन मूल्यमापन केले. त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात प्रार्थनेसाठी काही मिनिटे घालवली तसेच त्यांनी माण्डूड़ीह रेल्वे स्थानकाला अचानक भेट दिली.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.69434500_1537232737_street.jpeg)
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.75814700_1537232718_train.jpeg)