पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांची आज भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
या संवादा दरम्यान पंतप्रधानांनी आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या ‘सेवा परम: धर्म’ बाबत विचार व्यक्त केले.
पुरस्कार विजेत्यांनी इतरांची सेवा करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांचे योगदान अमूल्य आहे, ज्यामुळे अनेकांना लाभ झाला. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. ते म्हणाले की देश राष्ट्र भगिनी निवेदिता यांची 150 वी जयंती साजरी करत आहे. त्या नि:स्वार्थ सेवेच्या प्रतिमूर्ती होत्या.
समाजसेवा भारताची अस्मिता आहे आणि धर्मशाळा, गोशाला आणि शिक्षण संस्थांमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसते.
महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यावेळी उपस्थित होत्या.