Energy is the key driver of Socio-Economic growth: PM Modi
India has taken a lead in addressing these issues of energy access, says PM Modi
Energy justice is also a key objective for me, and a top priority for India: PM Modi

13 व्या पेट्रोटेक- 2019,हायड्रोकार्बन परिषदेचे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडातल्या इंडिया एक्स्पो सेंटर इथे उद्‌घाटन केले.

सामाजिक-आर्थिक विकासाची गुरुकिल्ली म्हणून ऊर्जेचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.अर्थव्यवस्थेच्या वेगवान विकासासाठी,सुयोग्य किंमत,स्थिर आणि अविरत वीज पुरवठा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.यामुळे,समाजातल्या,गरीब आणि वंचितांना आर्थिक लाभात सामावून घेण्यासाठी मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

ऊर्जा वापराबाबत पश्चिमेकडून पूर्वेकडे असा प्रवास झाला आहे. माफक दरातली नविकरणीय ऊर्जा,तंत्रज्ञान आणि डिजिटल उपयोग यांच्यात वाढ होत असल्याची चिन्हे दिसत असून यामुळे,अनेक शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्याला गती मिळणार आल्याचे ते म्हणाले.

उत्पादक आणि ग्राहक या दोघांचेही हित राखणारी किंमत ही सध्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.तेल आणि नैसर्गिक वायू या दोन्हींसाठी पारदर्शी आणि लवचिक बाजारपेठेच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.त्यामुळेच मानवाच्या उर्जाविषयक गरजांची पूर्तता होऊ शकेल असे ते म्हणाले.

हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्र काम करायला हवं याचे स्मरण करून देत पॅरिसमध्ये सीओपी -21 ची स्वतःसाठी ठरवलेले उद्दिष्ट साध्य करता येईल.आपली कटीबद्धता पूर्ण करण्यासाठी,भारताने आघाडी घेतल्याचा उल्लेख त्यांनी यासंदर्भात केला.

महामहिम,डॉ सुलतान अल जाबेर यांच्या ऊर्जा क्षेत्रातल्या योगदान बद्दल आणि भविष्यासाठीच्या त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. इंडस्ट्री 4.0 मुळे, उद्योगाच्या पद्धतीत बदल घडेल असं सांगून आपल्या कंपन्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी,सुरक्षितता वृद्धिंगत करण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

जनतेला स्वच्छ,माफक दरात,शाश्वत ऊर्जेचा पुरवठा उपलब्ध असायला हवा यावर त्यांनी भर दिला.आपण अधिक ऊर्जा उपलब्धतेच्या युगात प्रवेश करत असलो तरी जगातले अब्जावधी लोक अद्यापही विजेपासून वंचित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अनेकांना स्वयंपाकासाठी स्वच्छ ऊर्जा अद्यापही उपलब्ध नाही.ऊर्जेच्या या मुद्द्यांची दाखल घेण्यात भारताने आघाडी घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

भारत,जगातली वेगाने विकसित होणारी मोठी अर्थव्यवस्था असून 2030 पर्यंत,जगातली दुसरी मोठी अर्थव्यवस्था आणि जगातला सर्वात मोठा, तिसरा ऊर्जा वापर करणारा देश ठरू शकतो.2040 पर्यंत ऊर्जेच्या मागणीत दुप्पट वाढ अपेक्षित असून ऊर्जा कंपन्यांसाठी भारत हा आकर्षक बाजारपेठ राहणार आहे.

2016 मधल्या पेट्रोटेक परिषदेचे स्मरण करत यावेळी भारताच्या ऊर्जा विषयक भविष्याच्या चार स्तंभांचा उल्लेख केला होता असे त्यांनी सांगितले.ऊर्जा उपलब्धता,ऊर्जा कार्यक्षमता,ऊर्जा शाश्वतता आणि ऊर्जा सुरक्षितता हे ते चार स्तंभ होत.उर्जाविषयक न्याय हे सुद्धा एक उद्दिष्ट असून याला भारतात सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे.आपण अनेक शोरने विकसित केली असून त्यांची अंमलबजावणी केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या प्रयत्नांचे परिणाम आता दिसू लागले आहेत.आपल्या सर्व ग्रामीण भागापर्यंत वीज पोहोचली आहे.जनतेचा आपल्या सामूहिक शक्तीवर विश्वास असेल तेव्हाच ऊर्जा विषयक न्याय साध्य होऊ शकतो असे ते म्हणाले.

ब्लू फ्लेम क्रांती सध्या सुरू आहे.पाच वर्षापूर्वी एलपीजी जाळे 55 टक्क्यांपर्यंत होते आता त्याचा 90 टक्के पेक्षा जास्त विस्तार झाला आहे. भारताच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात गेल्या पाच वर्षात महत्वाच्या सुधारणा झाल्याचे त्यांनी नमूद केले.भारत हा जगात तेल शोध विषयक क्षमता असणारा चौथा मोठा देश असून 2030 पर्यंत यात 200 दशलक्ष मेट्रिक टनाची भर पडणार आहे.

वायुवर आधारित अर्थव्यवस्थेकडे भारताची वेगाने वाटचाल सुरू आहे. 16,000 किलोमीटरच्या गॅस पाईपलाईन निर्माण करण्यात आल्या असून आणखी 11000 किलोमीटर ची निर्मिती सुरू आहे.

पेट्रोटेक 2019 मध्ये तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातले दिग्गज सहभागी झाले आहेत.ऊर्जा क्षेत्रातल्या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठीचा एक मंच म्हणून गेल्या पाव शतकात पेट्रोटेकने कामगिरी बजावली आहे.ऊर्जा क्षेत्रातील भविषयातील गुंतवणूक,बाजार स्थिरता यासाठी धोरण आणि नवं तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर विचार करण्यासाठी हा मंच उपयुक्त ठरत आहे.

Click here to read full text of speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Indian economy ends 2024 with strong growth as PMI hits 60.7 in December

Media Coverage

Indian economy ends 2024 with strong growth as PMI hits 60.7 in December
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government